Home » दुसऱ्या महायुद्धात चक्क एक ‘अस्वल’ सैनिक म्हणून लढलं! 

दुसऱ्या महायुद्धात चक्क एक ‘अस्वल’ सैनिक म्हणून लढलं! 

by Team Gajawaja
0 comment
Wojtek bear
Share

दुसरं महायुद्ध… मानवी इतिहासात लढलं गेलेलं भीषण युद्ध…! जीवितहानी, वित्तहानी अश्या सगळ्याच बाबतीत भयाण वास्तव सांगणारं युद्ध, ज्याला संहारक युद्ध म्हणत येईल असं हे युद्ध! तसंच अण्वस्त्र ज्या युद्धात वापरले गेले असं हे युद्ध! 

दुसऱ्या महायुद्धाच्या अनेक कहाण्या आज आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचतो, ऐकतो… पण या आहेत नोंद ठेवलेल्या आणि नोंद घेतलेल्या लोकप्रिय कहाण्या. पण आजही अशा अनेक कहाण्या आहेत ज्याची इतिहासात दखल घेतली गेली नाही, पण ज्या प्रत्यक्ष रणक्षेत्रावर घडल्या आहेत. 

अशीच ही एक कहाणी आहे, दुसऱ्या महायुद्धात युद्ध लढलेल्या अस्वलाची! हो तुम्ही बरोबर वाचलत… ‘वॉयटेक (Wojtek bear)’ नावाच्या अस्वलाने दुसऱ्या महायुद्धात पोलंडकडून लढाई लढली होती. 

या अस्वलाच्या ‘वॉयटेक’ या नावामागे सुद्धा अर्थ आहे. ‘स्लाव’ भाषेत ‘वोटेक’ या शब्दाचा अर्थ आहे एक ‘आनंदी योद्धा’. हे नाव पोलंड मध्ये वापरलं जाणारं अत्यंत सामान्य नाव आहे, तर इराणमध्ये पॉलिश सैनिक लढत असताना त्यांना ‘हमादान’ रेल्वे स्थानकाजवळ एका मुलाच्या हातात हे अस्वलाचं पिल्लू दिसलं. ते त्यांनी विकत घेतलं.

आता या लहान अस्वलाला अन्न पाणी द्यायचं म्हणजे त्याची सगळी काळजी घायची, तर त्याला अधिकृतरित्या ‘सैनिक’ म्हणूनच भरती करून घ्यावा लागेल, असं ठरल्यामुळे त्याला ‘प्रायव्हेट’(म्हणजे एक सामान्य सैनिक) हा पोलिश सैन्यातला त्यावेळेसचा रॅंक देण्यात आला. याची काळजी घेण्यासाठी सैनिकांची नेमणूक करण्यात आली. 

हा लहान वॉयटेक (Wojtek bear) हळू हळू मग त्याच्या बरोबर असणाऱ्या सैनिकांच्या सवयी आणि लकबी आत्मसात करून त्याप्रमाणे नक्कल करायला लागला. वॉयटेक, बियर प्यायला लागला, तसंच सिगारेट ओढायला लागला आणि हे कमी म्हणून की काय, तो इतर सैनिकां मारचिंग पाहून ते देखील करायला लागला. 

इजिप्तमध्ये असताना त्याला एका सामान्य सैनिकाचा दर्जा देण्यात आला. पण खरा सैनिक म्हणून वॉयटेक ‘मोंटे कॅसिनो’ या इटलीतल्या लढाईत लढला. तो इतर सैनिकांप्रमाणे त्यांच्या बरोबर सैनिकी छावण्यांमद्धे राहायचा. ‘२२ आऱ्टीलरी सप्लाय कंपनीमध्ये’ ‘वॉयटेक’ची (Wojtek bear) नोंदणी झाली. 

वॉयटेककडे खास काम देण्यात आलं. मोंटे कॅसिनोच्या लढाईमध्ये वॉयटेकने ४५ किलो वजन असलेला दारुगोळा सैनिकाना पुरवण्याचं काम केलं आणि तेही एकही दारुगोळा न पाडता! इतर सैनिकांचं बघून वॉयटेकसुद्धा दारुगोळा ट्रकमद्धे किंवा बॉक्समध्ये ठेवण्याची कामं करू लागला. 

पुढे पुढे तर जिथे एक बॉक्स उचलायला चार सैनिक लागत असतील, तिथे वॉयटेक एकटा दारुगोळा साहित्य उचलू लागला. कालांतराने मोंटे कॅसिनो इथल्या त्याच्या कामगिरीमुळे तर चक्क वॉयटेकची बढती (promotion) होऊन त्याला ‘कॉर्पोरल (म्हणजे भारतीय सैन्यातला रॅंक ‘नायक’) बनवण्यात आलं. 

====

हे देखील वाचा: ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे अमेरिकेन आर्मीमध्ये वकील

====

वॉयटेक अस्वलाने एकूण दोन वर्ष म्हणजे १९४३-१९४५ अशी पोलिश दलातला एक सैनिक म्हणून कामगिरी बजावली. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर, वॉयटेकला (Wojtek bear) ‘एडिनबर प्राणिसंग्रहलयात’ पाठवण्यात आलं. इथेच त्याने आयुष्यातली शेवटची वर्ष घालवली. 

वॉयटेक कित्येक लोकांच्या कुतुहलाचा विषय बनला होता. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की, बीबीसी वाहिनीच्या लहान मुलांसाठी बनवलेल्या ‘ब्ल्यू पिटर’ या कार्यक्रमात वॉयटेक वरचेवर यायला लागला. १९४२ साली जन्माला आलेला वॉयटेक(Wojtek bear) २१ वर्ष जगला, १९६३ मध्ये त्याचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत कुठल्याच युद्धात अशाप्रकारे अस्वलाने एक सैनिक म्हणून काम केला नव्हतं, जे काम वॉयटेकने केलं. वॉयटेक कायमचा स्मरणात राहिला. अर्थात प्राण्यांचा युद्धात वापर होणं गैर नाही. पण एखाद्या अस्वलाने युद्धात भाग घेणं हे नवीनच आहे. सहसा आपण सैन्यात घोडे, हत्ती, उंट पाहतो किंवा आता तर कुत्रे सैन्यात असतात, पण अस्वलाने (Wojtek bear)सैनिक म्हणून युद्ध लढणं, आणि नुसतंच लढणं नाही, तर त्याचं चक्क प्रमोशन होणं हे इतिहासात पहिल्यांदाच झालं असेल.

====

हे देखील वाचा: Camilla, Duchess of Cornwall: ब्रिटनच्या लोकांचा ‘कैमिला शैंड’ वर एवढा राग का आहे?

====

पोलंडमध्ये आणि ब्रिटनमध्ये वॉयटेकचे बागांमद्धे, रस्त्यांवर, पुतळे उभारण्यात आले आहेत… वॉयटेक एक सैनिकाचं आयुष्य जगला. सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून वॉयटेक अस्वल युद्ध लढले. इतिहास वॉयटेकची दखल घेईल… इतकंच!

-निखिल कासखेडीकर 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.