जिमी झोंग एक साधा मुलगा ज्याला सुरुवातीला कोणी भाव सुद्धा देतं नव्हतं, पण तो अचानक त्याच्या मित्रांमध्ये सगळ्यांचा खूप लाडका झाला होता. कारण त्याने मित्रांना आलिशान पार्ट्या द्यायला सुरुवात केली होती. आलिशान म्हणजे, तो ज्या बारमध्ये जायचा तिथे असणाऱ्या प्रत्येक माणसाचं बिल तो स्वत: भरायचा एका पार्टीत हा माणूस सवा कोटी रुपये उडवायचा! म्हणून लोकं त्याला पार्टी बॉय म्हणून ओळखू लागले होते. त्याच्याकडे अगदी कमी वयात अचानक खूप जास्त पैसा आला होता. पण जसं त्याचं नशीब अचानक चमकलं होतं, तसंच ते एका फोन कॉलमुळे 360 डीग्री फिरलं. पैसे चोरीला गेले म्हणून त्याने पोलिसांना कॉल केला, घरातून 4 लाख डॉलर्स चोरी झाल्याची तक्रार करताना त्यानं स्वतःला 29 हजार कोटींच्या चोरीच्या जाळ्यात अडकवलं. जे त्याने चीटोसच्या एका छोट्या डब्यात लपवले होते. पण कसे? आणि त्याच्याकडे 29 हजार कोटी रुपये कसे आले? हे जाणून घेऊ. (Jimmy Zhong)
एथन्स, हे जॉर्जिया देशातील छोटं शहर आहे, जिथं जिमी झोंग नावाचा हा तरुण राहायचा. हा जिमी जॉर्जिया युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट होता, पण त्याच्यापेक्षा जास्त तो आधी सांगितल्याप्रमाणे ओळखला जायचा त्याच्या पार्टीबॉय स्टाईलमुळे. पण एवढा पैसा येतोय कुठून? हा प्रश्न फक्त सगळ्यांना पडला होता, जिमी सगळ्यांना सांगायचा, “मी बिटकॉइन ट्रेडर आहे, क्रिप्टो इन्व्हेस्टर आहे.” त्या काळात बिटकॉइनच्या किंमती आकाशाला भिडत होत्या, त्यामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायचे. पण जेव्हा त्याच्या घरातून 4 लाख डॉलर्स चोरी झाल्याची तक्रार आली, तेव्हा पोलिसांना काही तरी गडबड वाटली. जिमीच्या घरात हायटेक सिक्युरिटी सिस्टीम होती, सीसीटीव्ही फुटेजही होतं, ज्यात एक चोर चेहरा झाकून घरात शिरताना दिसत होता. पण पोलिसांना चोर सापडला नाही, म्हणून जिमीनं प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हायर केलं. त्याने जिमीच्या आयुष्य बारकाईने तपासायला सुरुवात केली. (Top Stories)
त्याचे सोशल मीडियावरचे फोटो, बँक अकाउंट्सच्या ट्रान्झॅक्शन्स. सगळं पाहिलं, हा प्रायव्हेट डिटेक्टिव्हही गोंधळात पडला की एवढ्या कमी वयात इतका खर्च करणाऱ्या जिमीचा इन्कमचा सोर्स नेमका काय आहे? पण हा प्रश्न बाजूला ठेवून डिटेक्टिव्हने एक महत्त्वाची गोष्ट शोधून काढली होती, ती म्हणजे जीमीच्या घरात झालेली चोरी जिमीच्या जवळच्या मित्रानेच केली असणार, कारण चोराला जिमी कधी घरी नसतो, याची परफेक्ट माहिती होती. तसं एथेन्स पोलिसांचा जिमीशी हा पहिल्यांदा संबंध आला नव्हता. याआधीही काही वर्षांपूर्वी तो कोकेन केसमध्ये पकडला गेला होता. तेव्हापासून जिमीचं पोलिस ऑफिसर्ससोबत चांगलं वागणं होतं. एथेन्स पोलिस अनेकदा जिमीच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून दुसऱ्या कुठल्या केसच्या तपासासाठीही माहिती घ्यायचे. पण यावेळी 911 वर केलेल्या कॉलमुळे जिमी पोलिसांच्या नजरेत खूप हायलाइट झाला होता. (Jimmy Zhong)
याच दरम्यान रीजनल सायबर क्राइम युनिटलाही कळालं की जिमीच्या घरी 4 लाख डॉलर्सची चोरी झाली आहे आणि तो स्वतःला बिटकॉइन ट्रेडर म्हणवतो. त्यांना शंका आली की जिमीकडे बिटकॉइन असलं तरी एवढे सगळे पैसे नेमके कुठून आले? ही रीजनल सायबर क्राइम युनिट गेल्या सात वर्षांपासून एका क्रिप्टो चोरीचा तपास करत होते, पण इतक्या वर्षात त्यांना एकही क्ल्यू मिळाला नव्हता. सिल्क रोड ही एक ऑनलाइन वेबसाइट होती, जिथे सगळे बेकायदेशीर धंदे चालायचे. वेगवेगळ्या weapons पासून ड्रग्सपर्यंत सगळ्या बेकायदेशीर गोष्टींची खरेदी-विक्री तिथे व्हायची आणि त्यांचे व्यवहार बिटकॉइन्समध्ये व्हायचे. (Top Stories)
2012 मध्ये ही साइट हॅक झाली,आणि कोणीतरी 51,680 बिटकॉइन्स चोरले त्यावेळची किंमत लाखो डॉलर्स होती पण 2020 पर्यंत ती 3.5 बिलियन डॉलर्स झाली होती! म्हणजे जवळ जवळ 29 हजार कोटी रुपये. आता एवढे पैसे चोरी झाल्यानंतर कोणीतरी त्याची complainet करायला हवी होती. पण कारण ही एक बेकायदेशीर डार्क वेबसाइट होती, म्हणून कोणीही या चोरीची तक्रार केली नाही. त्याच्या पुढच्या वर्षी सिल्क रोड वेबसाईटचा मालक पकडला गेला, त्याच्याकडून 170,000 बिटकॉइन्स जप्त झाले, पण हे 51,680 बिटकॉइन्स म्हणजे 29 हजार कोटी रुपये कुठे गेले, याचा काही पत्ता नव्हता. सायबर क्राइम युनिटला शंका आली – जिमीचं याच्याशी काहीतरी कनेक्शन आहे का? (Jimmy Zhong)
कारण तो स्वतःला बिटकॉइन ट्रेडर म्हणतोय, आणि त्याच्याकडे इतका पैसा आहे. मग त्यांनी एथन्स पोलिसांशी हातमिळवणी केली आणि जिमीला भेटायचं ठरवलं. तीन ऑफिसर्स जिमीच्या घरी गेले, त्यांनी जिमीला सांगितलं, “आम्ही तुझ्या 4 लाख डॉलर्सच्या चोरीच्या केससाठी आलोय.” पण खरं तर त्यांना जिमीच्या बिटकॉइन अकाउंटचा अॅड्रेस हवा होता. गप्पांमध्ये जिमीनं त्यांना त्याच्या रूममधल्या दोन बिटकॉइन मायनिंग मशीन्स दाखवल्या. पण युनिटमधल्या ब्लॉकचेन एक्सपर्टला लगेच कळलं, की या मशीन्समधून इतका पैसा येणं अशक्य आहे. मग एका ऑफिसरनं जिमीला बोलतं ठेवलं, आणि दुसऱ्यानं त्याच्या लॅपटॉपमधून बिटकॉइन अॅड्रेस कॉपी केला. आणि त्या अॅड्रेसची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सिल्क रोडच्या हॅकशी मॅच झाली. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Russia : रोमन स्टारोवोइट आत्महत्या आणि पुतिन !
=================
पोलिसांनी सर्च वॉरंट काढलं आणि ते जिमीच्या घरी पुन्हा गेले. त्यांनी घराचा एक-एक कोपरा तपासला. शेवटी त्यांना चीटोसच्या एका डब्यात एक टॉवेल सापडलं. टॉवेलखाली होती एक छोटीशी कंप्युटर चिप होती – त्यात होते तब्बल 51000 बिटकॉइन्स, ज्यांची किंमत 2020 मध्ये किंमत होती 29 हजार कोटी रुपये. जिमीनं सांगितलं, की तो सिल्क रोडवर ड्रग्स खरेदी करायचा. 2012 मध्ये त्याला साइटवर एक लूपहोल सापडला, आणि त्यानं त्या लूपहोलचा फायदा घेत 51680 बिटकॉइन्स चोरले. त्यावेळी त्यांची किंमत लाखो डॉलर्स होती. सिल्क रोडच्या मालकाला याची खबर लागली, पण तो पोलिसांकडे जाऊ शकत नव्हता, कारण साइटच इलिगल होती. त्यानं जिमीला मेसेज केला, लूपहोल काय आहे ते विचारलं. जिमीनं सांगितलं, आणि बदल्यात मालकानं त्याला माफ केलं. (Jimmy Zhong)
पण जिमीचा तो 911 वरचा कॉल त्याला भोवला. 4 लाख डॉलर्सच्या चोराला पकडायच्या नादात त्यानं स्वतःला 3.5 बिलियन डॉलर्सच्या चोरीत अडकवलं. 2023 मध्ये जिमीला वायर फ्रॉडच्या केसमध्ये एक वर्ष आणि एक दिवसाची शिक्षा झाली. पण गंमत बघा – FBI नं जाहीर केलं, की ज्यांचे हे बिटकॉइन्स होते, त्यांनी पुढे येऊन क्लेम करावं. पण एकही माणूस पुढे आला नाही! का? कारण सिल्क रोडवर अकाउंट असणं म्हणजे क्रिमिनल अॅक्टिव्हिटीशी कनेक्शन असणं. जर जिमीनं त्या दिवशी 911 वर कॉल केला नसता, तर कदाचित तो आजही अब्जावधींच्या बिटकॉइन्ससह मजेत फिरत असता. पार्ट्या करत असता, पण एका कॉलनं त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics