Home » Dhadichi Pratha : फक्त 10 रुपयाचा करार आणि इथे बायको मिळते भाड्याने !

Dhadichi Pratha : फक्त 10 रुपयाचा करार आणि इथे बायको मिळते भाड्याने !

by Team Gajawaja
0 comment
Dhadichi Pratha
Share

आजवर तुम्ही भाड्याने गाडी, घर आणि इतर सामान्य गोष्टी देताना घेताना पहिल्या असतील, पण भारतातल्या एका गावात एक अशी अनोखी आणि विचित्र प्रथा आहे, ज्यामुळे त्या गावात चक्क बायको भाड्याने मिळते! आता यावर विश्वास ठेवणं कठीण वाटतं, पण हे खरं आहे. ही प्रथा नेमकी काय आहे? या बायका नक्की कोण असतात ? आणि कोण त्यांना भाड्याने घेऊ शकतं? हे सगळं जाणून घेऊ. (Dhadichi Pratha)

बायको भाड्याने देण्याच्या या विचित्र प्रथेला म्हणतात ‘धडीची प्रथा!’ जी मध्य प्रदेशातील शिवपुरी या जिल्ह्यात पाहायला मिळते. आता ही धडीची प्रथा म्हणजे काय? तर इथे, Basically स्त्रिया भाड्यानं मिळतात आणि फक्त अविवाहित मुलीच नाहीत, तर विवाहित स्त्रियाही भाड्यानं दिल्या जातात. या स्त्रिया १५ हजारपासून ते १५ लाख रुपयांपर्यंत ‘भाडेकरारावर’ मिळतात! थोडक्यात या गावात जाऊन तुम्ही काही दिवस ते एक वर्षासाठी बायको भाड्यानं घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला करार करावा लागतो जो एका वर्षापर्यंत मर्यादित असतो पुढे तुम्हाला ते continue करायचं असेल तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नव्यानं करार करावा लागतो. (Top Stories)

 

आता यासाठी नेमकं काय करावं लागतं ? फार काही नाही, फक्त १० किंवा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक करार! या करारात स्पष्ट लिहिलेलं असतं की ही स्त्री किती दिवसांसाठी भाड्याने घेतली जाणार आहे आणि त्यासाठी किती रक्कम द्यावी लागेल आणि वर्षभराचा करार संपला, की पुन्हा नवीन बोली,नवीन करार आणि अर्थात, वाढीव पैसे! इथे महिलेचं रूप, वय, आणि सौंदर्य पाहून तिचं भाडं ठरतं. धक्कादायक बाब म्हणजे, जितकी लहान वयाची मुलगी, तितकी तिची किंमत जास्त! यासाठी काही पालक आपल्या मुलींना अधिक सुंदर आणि आकर्षक दिसाव्या म्हणून वेगवेगळी औषधं देतात, जेणेकरून श्रीमंत ग्राहक आकर्षित होतील आणि जास्त रक्कम मिळवता येईल. एक प्रकारे इथे स्त्रिया वस्तूप्रमाणे विकल्या-खरेदी केल्या जातात.

या स्त्रिया का विकत घेतल्या जातात तर काहीजण त्या स्त्रियांना घरकामासाठी भाड्यानं घेतात, काहीजण लग्नाचं नाटक करण्यासाठी, तर एखादा अविवाहित तरुण, एकटेपणाची सोबत दूर करण्यासाठी. कारण काहीही असो, ही प्रथा पूर्णपणे चुकीची आणि अमानवीय आहे. पण स्त्रियांना विकणारे भाड्याने देणारे कोण असतात? तर त्यांचे वडील, नवरा किंवा कुटुंबातील इतर पुरुषच! पण ते असं का करतात ? पण हे सगळं का होतं? यामागचं मुख्य कारण आहे गरिबी, अशिक्षितपणा, बेरोजगारी, असमान लिंग गुणोत्तर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्त्रियांना आपली मालमत्ता समजण्याची विषारी मानसिकता. या लोकांना वाटतं की, स्त्रियांना भाड्याने देणं हा पैसा कमावण्याचा एक सोपा आणि जलद मार्ग आहे. (Dhadichi Pratha)

आता तुम्हाला वाटेल की यात सहभागी पुरुष हे गरीब किंवा अशिक्षित असतील. पण इथे विडंबना अशी आहे की, या बाजारात भाड्याने स्त्रिया घेण्यासाठी श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबांतील पुरुषही येतात! ही प्रथा फक्त मध्यप्रदेशातच नाही तर गुजरात, राजस्थान, हरियाणा यांसारख्या इतर राज्यांमध्येही काही प्रमाणात आढळते. यामागचं आणखी एक कारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना मुली ओझं वाटतात कारण त्यांच लग्न लावून देणं हे एक प्रकारे महागड प्रकरण आहे कारण जरी भारतात हुंडा मागणं हा कायद्याने गुन्हा असला, तरी अनेक ठिकाणी ही प्रथा अजूनही चालते.

===============

हे देखील वाचा : Rezang La 1962 : जेव्हा १२४ भारतीय जवान ५००० चीनी सैनिकांना भिडले…

===============

त्यामुळे श्रीमंत लोक या कुटुंबांच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेतात.त्यापेक्षा हे करण म्हणजे मुलींना हे अशाप्रकारे विकणं त्यांना सोयीस्कर वाटतं. मध्य प्रदेशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ही प्रथा थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण दुर्दैवाने, अजूनही काही ठिकाणी ही प्रथा दिसून येते आणि या संपूर्ण प्रकरणाची कुठेच कोणीच कायदेशीर तक्रार करत नसल्याने पोलीसही कोणाला अटक करू शकत नाही. पण यातून एक गोष्ट स्पष्ट आहे – या प्रथेमुळे स्त्रियांचं शोषण होतं, त्यांची माणूस म्हणून असलेली प्रतिष्ठा पायदळी तुडवली जाते. (Dhadichi Pratha)

आपण २१व्या शतकात आहोत. स्त्री-पुरुष समानतेचे गोडवे गातो. पण आजही आपल्या देशात ठिकाणी स्त्रियांकडे वस्तूसारखं पाहिलं जातं, हे खरंच दुख:द आहे. ही प्रथा समाजाच्या विकृत मानसिकतेचं आणि गरिबीचं दु:खद वास्तव दाखवते. ही प्रथा थांबवणं आपल्याकडून कितपत शक्य होईल माहित नाही पण आपण निदान याबद्दल जनजागृती नक्कीच करू शकतो. भारतासारख्या प्राचीन संस्कृती, परंपरांनी संपन्न अशा देशात, २१व्या शतकातही हे असे धक्कादायक प्रकार अशा प्रथांच्या नावाखाली चालतात, याबद्दल तुमचं मत काय ? आणि अशा प्रथा कायमस्वरूपी थांबवण्यासाठी आपण काय करू शकतो? तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कंमेंटकरून नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.