सध्या एक विचित्र आणि भयानक दिसणाऱ्या बाहुलीची अक्ख्या जगाला भुरळ पडलीये जिचं नाव आहे ‘Labubu Doll’. हीचा चेहरा एकदम कुरूप आणि विचित्र आहे. पण तरी इंटरनेटवर याबाबत म्हणजे ही बाहुली गोंडस आहे की विचित्र याबाबत मतमतांतरं आहेत. लबूबू बाहुल्या ‘द मॉन्टर्स’ च्या अनेक सिरीजमध्ये दिसल्या आहेत. अशीच आणखी एक विचित्र बाहुली जिच्यावर मूवीसुद्धा बनवला गेला ती म्हणजे एनाबेला! आता मी या सगळ्यांबद्दल बोलतेय कारण भलेही आपण भूत-प्रेत यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत असलो नसलो, तरीही जगात काही गोष्टी अशा आहेत, ज्या अदृश्य शक्ती असल्याचे संकेत देतात. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे, पण ही गोष्ट ना कुठल्या खेळण्याची आहे, ना बाहुलीची आहे तर ही गोष्ट आहे एका शापित पेंटिंगची! आता तुम्ही विचार करत असाल की, एका पेंटिंग ने कायच होईल? (Scariest Paintings)
तर ते पेंटिंग एका लहान मुलाचं होतं.ज्याचं नावच होतं द क्राइंग बॉय ! एनाबेले सारखच हे चित्र गूढ आणि भयानक आहे. हे पेंटिंग होतं इटलीच्या प्रसिद्ध चित्रकार जीयोवनी ब्रागोलिन यांचं. या पेंटिंगमध्ये एक लहान मुलगा आहे ज्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असतात, चेहऱ्यावर एक विचित्रच दुःख जाणवतं कसलीतरी भीती जाणवते. १९५० च्या दशकात हे पेंटिंग बनवण्यात आलं होतं. त्यांनी केवळ हे एकच पेंटिंग बनवलं नव्हतं, तर त्यांनी या पेंटिंग्जची एक सिरीज तयार केली होती. नंतर या पेंटिंगची इतकी क्रेझ आली की याच्या जवळपास ५० हजार प्रति छापण्यात आल्या. लोकांनी खूप उत्साहाने आपल्या घरातल्या भिंतींवर हे पेंटिंग लावायला सुरुवात केली. पण काही दिवसातच अनेक विचित्र घटना घडायला लागल्या. या पेंटिंगने जीयोवनी ब्रागोलिन यांना खूप प्रसिद्धी आणि बक्कळ पैसाही मिळवून दिला. पण त्यासोबतच त्यांना आणखी एक गोष्ट मिळाली ती म्हणजे बदनामी कारण हे चित्र जिथेही लावण्यात आलं, तिथे विनाश झाला असं सांगण्यात येत. (Top Stories)
हे चित्र ज्या ज्या घरांमध्ये होत अशा अनेक घरांत अचानक आग लागायाला सुरुवात झाली. आगीनं सगळं घर जळून खाक व्हायचं, फर्निचर, पडदे, फोटोफ्रेम्स, कपडे अगदी सगळं. पण हे एकच पेंटिंग असं होतं जे कधीच जळत नव्हतं! या चित्राबद्दलच्या अनेक स्टोरीएस प्रसिद्ध झाल्या. फायर ब्रिगेडमधील एका कर्मचाऱ्यानं असं सांगितलं होत, की तो जवळपास १५ घरांमध्ये आग विझवायला गेला आणि प्रत्येक ठिकाणी त्याला हेच पेंटिंग दिसलं. म्हणजेच जिथे जिथे हे पेंटिंग, तिथे आग लागलीच म्ह्णून समजा असं काहीस झालं होतं. मग मात्र लोक घाबरायला लागली, आणि शेवटी लोकांनी आपल्या घरातून हे पेंटिंग काढून टाकलं. (Scariest Paintings)
एका वृत्तपत्रानुसार, हॅलोविनच्या दिवशी शेकडो लोकांनी हे पेंटिंग बोनफायरमध्ये जाळून टाकलं आणि गंमत म्हणजे त्यानंतर अशा अपघाती घटना काही प्रमाणात कमी झाल्या म्हणे! पण प्रश्न एकच आहे खरंच हे पेंटिंग शापित होतं का? की हे सगळं निव्वळ योगायोग होतं? काही तज्ज्ञांचं असं मत आहे की, या पेंटिंगवर खास लाकडी फ्रेम वापरली होती ज्यावर फायर रेसिस्टंट कोटिंग होतं त्यामुळे ते जळत नसायचं. पण लोकांच्या मनात मात्र त्या पेंटिंगबद्दल तेच मत कायम राहिलं. (Top Stories)
पण मित्रांनो… ‘दि क्रायिंग बॉय’ हे एकटंच शापित पेंटिंग नाही! जगात अशी अनेक पेंटिंग्ज आहेत ज्यांच्याशी विचित्र, गूढ, भयावह गोष्टी जोडल्या गेल्या आहेत…उदा. Portrait of Bernardo de Gálvez हे पेंटिंग एका स्पॅनिश कर्नलच आहे. असं म्हणतात, की या पेंटिंगला परवानगी न घेता फोटो काढला तर फोटो धूसर येतो आणि काहींना आजारीपणाही येतो! Portrait of Henrietta Nelson – हे पेंटिंग एका वृद्ध बाईचं आहे. ज्या घरी हे पेंटिंग लावलं, तिथं सतत विचित्र आवाज येतात, छायाचित्रं हलताना दिसतात. Mi Novia अर्थात My Girlfriend हे एक स्पॅनिश पेंटिंग आहे. लोक म्हणतात, या पेंटिंगकडे जास्त वेळ पाहिलं तर लोकांना डोकेदुखी, चक्कर, अशांतता जाणवते. Death and the Child या पेंटिंगमध्ये एक लहान मुलगी आणि तिच्या मागे तिच्या आईचा deathbed आहे आणि ती मुलगी आपल्याकडे म्हणजे समोर अगदी घाबरून बघतेय. हे पेंटिंग जिथे लावलं तिथे मृत्यूच्या घटना घडल्याचं सांगितलं जातं. (Scariest Paintings)
=============
हे देखील वाचा : Death Penalty : फाशीची शिक्षा सर्वात आधी कोठे सुरू झाली? घ्या जाणून
=============
Love Letters या पेंटिंगमुळे अनेकांना झोपेत धडधड, घाबरणं, रात्री खूपच विचित्र स्वप्नं पडतात असं म्हणतात! द अँग्विश्ड मॅन या पेंटिंगमध्ये लाल-केशरी रंगात एक वेडसर चेहरा दाखवला आहे. या पेंटिंगबद्दल असं म्हणतात की, चित्रकाराने रंगात स्वतःचं रक्त मिसळलं होतं! हे पेंटिंग घरात ठेवताच रात्री ओरडण्याचे आवाज, छायाचित्रं हलताना दिसतात. तसंच, I Can’t Be a Bride Anymore हे एक कोरियन पेंटिंग आहे ज्यात एका मुलीच पोर्ट्रेट आहे जी स्वतःला नववधू म्हणवणं थांबवते. या पेंटिंगकडे पाहिल्यावर लोकांना रात्री झोप येत नाही, आणि काहींना मानसिक त्रास सुरू होतो.
The Scariest Picture on the Internet (REAL) – इंटरनेटवर अनेक लोकांनी हे पेंटिंग पाहिल्यानंतर अस्वस्थता, डिप्रेशन, अनिद्रा अनुभवली आहे. The Rain Woman – रशियन कलाकाराने काढलेलं हे पेंटिंग एका स्त्रीचं आहे, जिला बघताना लोकांना काहीतरी तिच्या डोळ्यातून बोलतंय असं वाटतं. हे पेंटिंग घरात ठेवलं की नकारात्मक ऊर्जा वाढते, असा लोकांचा अनुभव आहे. Pogo the Clown – जॉन वेन गेसी नावाच्या कुख्यात सिरियल किलरने हे पेंटिंग स्वतः काढलं होतं. लोक म्हणतात, या पेंटिंगकडे पाहिलं की अंगावर शहारे येतात आणि भयावह स्वप्न पडतात. The Hands Resist Him – या पेंटिंगमध्ये एक मुलगा आणि त्याच्या बाजूला एक अंधारलेली बाहुली उभी आहे, मागे काचीतून अनेक हात पुढे येताना दिसतात. हे पेंटिंग जिथे जाईल तिथे लोकांना अपघात, आजारपण किंवा विचित्र स्वप्नांचा त्रास होतो असं सांगण्यात येत. (Scariest Paintings)
तर मंडळी, ही होती द क्रायिंग बॉय आणि इतर शापित पेंटिंग्सची कहाणी ! पण ज्याप्रमाणे भूतं असतात की नसतात हा जितका वादाचा मुद्दा आहे तितकंच ही सगळी पेन्टिंग्स शापित आहेत की नाही हे सुद्धा एक गूढच आहे ज्याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. पण तुम्हाला काय वाटतं? ही पेंटिंग्ज खरंच शापित असतील का ? आम्हला कंमेंट करून नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics