वासुकी नागासंदर्भात भारतीय पौराणिक ग्रंथात अनेक कथा सांगितल्या आहेत. वासुकीला सर्पराज अशी उपाधी देण्यात आली आहे. असे मानले जाते की, वासुकी हा एखाद्या डायनासॉरपेक्षाही मोठा नाग होता. त्याच्याबद्दल अशा अनेक असलेल्या कथा या ख-या असल्याचा पुरावा नुकताच सापडला आहे. या पुराव्यानुसार ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतातील गुजरात राज्यात वासुकी नाग राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Vasuki Naag)
गुजरातच्या कच्छमधील एका कोळशाच्या खाणीत काही वर्षापूर्वी खाणीत या महाकाय नागाचे एकूण २७ जीवाश्म सापडले. ज्या संशोधकांना हे जीवाश्म सापडले, त्यांना ते एखाद्या मगरीचे असल्याचे वाटले. त्यामुळे त्याच्यावर संशोधन झाले नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी या जीवाश्मांची आयआयटी रुडकीमधील संशोधकांनी तपासणी केली. त्यातूनच हा धक्कादायक अहवाल काढण्यात आला. हे जीवाश्म एखाद्या भीमकाय नागाचे असल्याचे स्पष्ट झाले. आता या जीवाश्मांचा अधिक तपास करण्यात येत असून वासुकी नागासंदर्भात अधिक माहिती त्यातून उघड होणार आहे.
गुजरातमधील कच्छमधील एका कोळशाच्या खाणीत पुरातत्वशास्त्रज्ञांना ४९ फूट लांबीच्या नागाचे अवशेष सापडले आहे. भारतीय पुराणात ज्या नागाचा वासुकी नाग म्हणून उल्लेख करण्यात येत होता, तोच हा वासुकी नाग असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. वासुकी नागासंदर्भात अनेक कथा सांगितल्या आहेत. त्याच नागाचे हे अवशेष कच्छमधील कोळशाच्या खाणीत सापडले आहेत. हा वासुकी नाग ४० फूट लांबीचा होता. म्हणजेच त्याची लांबी डायनासोरपेक्षा अधिक होती. सुमारे ४७ दशलक्ष वर्षांपूर्वी भारतात हा वासुकी नाग होता, हे त्यातून स्पष्ट झाले आहे. ज्या कोळशाच्या खाणीतून हे अवशेष सापडले आहेत ती गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील पांधरोजवळ असून आता या संपूर्ण खाणीचे उत्खलन करण्यात येत आहे. हजारो वर्षापूर्वी हा भाग घनदाट जंगलांचा होता, असे सांगण्यात येते. (Vasuki Naag)
संशोधकांनी या वासुकी नागाच्या जीवाश्मांना वासुकी इंडिकस असे नाव दिले आहे. आतापर्यंत सापडलेला हा जगातील सर्वात मोठा प्राचीन नाग असल्याचे मानले जाते. आज पृथ्वीवर जे अजगर आहेत, ते सुमारे ६ मीटर लांब आहेत. पण हा वासुकी नाग त्यांच्यापेक्षाही अधिक लांब होता. त्याची लांबी १५ मीटर मोजण्यात आल्यानं संशोधकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. प्रत्यक्षात हा नाग किती मोठा दिसत असेल, याचे चित्र संशोधकांनी तयार केल्यावर त्याचा दरारा किती होता, हे उघड झाले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, वासुकी हे भगवान शंकराच्या गळ्यात असलेल्या नागाचे नाव आहे.
या वासुकी नागासंदर्भात आयआयटी रुडकीचे डॉ. देबाजित दत्ता, संशोधन करत आहेत. ते स्वतः एवढा मोठा नागाचा आकार बघून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. २००५ मध्ये हे जीवाश्म मिळाले होते. तेव्हापासून हे वासुकी नागाचे अवशेष मगरीचे अवशेष म्हणून दाखवण्यात येत होते. पण डॉ. दत्ता यांनी पुढाकार घेत हे जीवाश्म जिथे आहेत, त्या जागेची पाहणी केली. तसेच त्या अवशेषांना जोडल्यावर हे अवशेष मगरीचे नसून विशाल नागाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Vasuki Naag)
डॉ. वासुकी यांच्यामते या वासुकी नागाचा आकार प्रचंड होता. वासुकी हा एक अतिशय संथ गतीने चालणारा शिकारी होता. या नागाचा मृत्यू झाला तेव्हा त्यानं आपली शिकार गिळंकृत केली होती. किनारी भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या दलदलीत तो त्यामुळे फसला गेला असावा. कारण त्यावेळचे तापमान आजच्या तुलनेत खूप जास्त होते. जसे ॲनाकोंडा आणि अजगर करतात, तशीच वासुकी नागाची शिकार करण्याची पद्धत होती.
==============
हे देखील वाचा : चंद्राला काबीज करु पाहणाऱ्या चीनची जमीन खचू लागली…
==============
मात्र या नागाचा त्यामुळेच मृत्यू झाल्याचे डॉ. दत्ता यांनी सांगितले आहे. २०२३ पासून डॉ. दत्ता या वासुकी नागांच्या अवशेषांची पाहणी करत आहेत. हा नाग ३६ ते ५० फूट लांबीचा होता. तो पाण्यात अधिक राहत होता, कारण त्याचा आकार इतका होता की, तो झाडावर राहण्याची शक्यता कमीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. वासुकी नागाचे अवशेष सापडेपर्यंत आतापर्यंत ज्ञात असलेला सर्वात मोठा साप टिटानोबोआ होता. कोलंबियामध्ये त्याचे अवशेष सापडले होते. त्याची एकूण लांबी १३ मीटर होती. तर वजन ११४० किलो होते.(Vasuki Naag)
मात्र वासुकी नागाचे अवशेष सापडल्यामुळे आता जगातीस सर्वात मोठा नाग म्हणून त्याचा उल्लेख कऱण्यात येत आहे. या अवशेषांचा जसा अधिक तपास होईल, तसे वासुकी नागाभोवतीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.
सई बने