काशी नगरीला वाराणसी, बनारस या नावानंही ओळखलं जातं. पण भगवान शंकराचे भक्त या नगरीला बाबा विश्वनाथांची नगरी म्हणून ओळखतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी या नगरीत रोज हजारो भाविक येतात. याशिवाय काशीमध्ये भगवान शंकर यांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. काशी नगरीच्या प्रत्येक गल्लीमध्ये भगवान शंकराचे मंदिर आहे. असे मानले जाते की, या नगरीमध्ये तब्बल 1500 मंदिरे आहेत, आणि प्रत्येक मंदिरामागे इतिहास आहे. (Varanasi)
याच मंदिरापैकी एक मंदिर आहे, तिळभांडेश्वर मंदिर. या तिळभांडेश्वर मंदिरातील शिवलिंग हे दरवर्षी एका तिळानं वाढते, असे सांगितले जाते. या मंदिरात भाविकांची अखंड गर्दी असते. मात्र श्रावण महिना सुरु झाल्यावर या गर्दीमध्ये मोठी वाढ होते, कारण श्रावण महिन्यात तिळभांडेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याने अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते, अशी कथा पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आली आहे. बाबा विश्वानाथांची नगरी असलेल्या काशीमध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे. गंगा नदीनं काशीच्या घाटांवर आक्रमण केले आहे. पण निसर्गानं कितीही रौद्र रुप घेतलं, तरी या नगरीमधील भाविकांची संख्या कमी होत नाही. सध्या श्रावण महिन्यात बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. (Latest News)
बाबा विश्वनाथांप्रमाणेच हे भाविक येथील तिळभांडेश्वर महादेवाचे मंदिरातही आवर्जून जात आहेत. शिवपुराणातील काशी विभागात या मंदिराबाबत कथा सांगण्यात आली आहे. या मंदिरातील स्वयंप्रकाशित शिवलिंग दरवर्षी एका तिळाएवढे वाढते, असा उल्लेख शिवपुराणात असून श्रावण महिन्यात या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी भावना आहे. काशी विश्वनाथ मंदिरापासून फक्त 500 मीटर अंतरावर पांडे हवेलीमध्ये असलेल्या या तिळभांडेश्वर मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास अश्वमेध यज्ञाइतके पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर विभांडक ऋषींनी ज्या ठिकाणी घोर तपश्चर्या केली, त्या ठिकाणी बांधल्याची माहिती आहे. काशीमध्ये विभांडक ऋषींनी तपश्चर्या केली होती. ते याच मंदिराच्या ठिकाणी भगवान शंकराचेच ध्यान आणि पूजा करत असत. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, प्रत्यक्षा भगवान शंकरांनी त्यांना शिवलिंग दिले. (Varanasi)
या शिवलिंगाचा आकार दरवर्षी तिळानं वाढणार, असा आशीर्वादही दिला. त्यानुसार तिळभांडेश्वर शिवलिंग दरवर्षी एका तीळाच्या आकारानं वाढत आहे. तिळाप्रमाणे शिवलिंग वाढल्यामुळे आणि विभांडक ऋषींच्या नावावरून या मंदिराला तिळभांडेश्वर हे नाव पडले आहे. कलियुगात या मंदिराचे महत्त्व अधिक वाढणार असल्याचा आशीर्वादही भगवान शंकरांनी दिला आहे. कालसर्प दोषाच्या शांतीसाठी या तिळभांडेश्वर मंदिरात अनेक भाविक येतात. विशेषतः श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येनं भाविक येतात. श्रावण महिन्यात येथे पुजा केल्यास भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 18 व्या शतकात बांधलेल्या या मंदिराची बांधणीही वैशिष्टपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंग हे काशीतील तीन सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक आहे. त्यातही दरवर्षी तीळाच्या आकारानं वाढ होत असल्यामुळे भविष्यात काशीमधील सर्वात मोठे शिवलिंग म्हणून याच मंदिराची ओळख होणार आहे. (Latest News)
========
हे देखील वाचा :
Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा आणि कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवा
Shravan : श्रावणातल्या रविवारी करा आदित्यराणूबाईचे व्रत
=========
द्वापार काळातील या मंदिरातील शिवलिंगाची काही चित्रकारांनी हातानी चित्रे काढलेली आहेत. त्यात मंदिराच्या शिवलिंगाचा आकार सध्या पेक्षा लहान आहे. जागृत असलेल्या या मंदिराला मुघल राजवटीत हे शिवलिंग फोडण्याचाही प्रयत्न झाला. या मंदिरावर तीनवेळा हल्ला करण्यात आला. मात्र शिवलिंगाला त्या हल्ल्याची झळ बसली नाही. त्यानंतर या मंदिराची किर्ती इंग्रजांच्याही कानावर गेली. मंदिराची सत्यता पडताळून बघण्यासाठी इंग्रजांना तिळभांडेश्वर शिवलिंगाभोवती दोराही बांधला होता. मात्र हा दोरा ठराविक अवधीनंतर तुटू लागला. तेव्हा इंग्रजांनाही या मंदिराची पवित्रता पुन्हा कधीही भंग कऱण्याचा प्रयत्नही केला नाही. या तिळभांडेश्वर मंदिरात भगवान शंकराची आराधनाही वेगळ्या पद्धतीनं होते. येथे भगवान शंकराची दिवसातून चारवेळा पूजा केली जाते. यावेळी जो खिचडीचा प्रसाद दाखवला जातो त्यावेळी, स्वतः भगवान महादेव मंदिरात उपस्थित असतात, असे सांगितले जाते. हा रोजचा सोहळा बघण्यासाठीही मंदिरात हजारो भाविक उपस्थित असतात. (Varanasi)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics