Home » दीर्घायुष्य रहस्य… आता कासव देणार माणसाला शंभर वर्षांचं आयुष्य? 

दीर्घायुष्य रहस्य… आता कासव देणार माणसाला शंभर वर्षांचं आयुष्य? 

by Team Gajawaja
0 comment
Secret of Long life
Share

किती वर्ष जगायचंय? पूर्वी हा प्रश्न कोणालाही विचारला, तर त्याचे उत्तर शंभरी तरी गाठायची आहे, असंच असेल. मृत्यू कोणालाही नको असतो…अमरत्व नको पण शंभर वर्षांचं आयुष्य आपल्याला सुखासमाधानानं जगता यावं, ही प्रत्येक माणसाची अपेक्षा असते. अर्थातच फारच कमी लोकांना हे भाग्य मिळते.  (Secret of Long life)

मनुष्याला शंभर वर्षाचं आयुष्य जगता यावं यासाठी अनेक संशोधक संशोधन करीत आहेत. या सर्वांत अमेरिकेतल्या संशोधकांना आशेचा किरण दिसला आहे. माणसाला अमरत्व देण्यासाठी चक्क कासवाची मदत होणार आहे. आपण कासवला संथ प्राणी म्हणून ओळखतो. पण या संथ प्राण्याचे आयुष्य 150 वर्षांचे असते. याच कासवाचा अभ्यास आता संशोधक करत आहेत.  

वॉशिंग्टनमधील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधक कासवाच्या जीवनमानाचा अभ्यास करीत आहेत. माणसांना अमर करण्यासाठी कासव मदत करु शकते, असे या संशोधकांना वाटते. कासवाच्या जगभरात सुमारे 220 जाती असून त्या सर्वांचे आयुष्यमान शंभरीपार आहे. 

मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांच्या मते सर्वच सरपटणाऱ्या प्राण्यांचे आयुष्य चांगले असते.   कासव आणि मगरी हे सरपटणारे प्राणी स्वतःच्या आकाराच्या प्राण्यांपेक्षा जास्त काळ जगतात. मगरी 70 वर्षे जगू शकतात आणि कासव सुमारे 150 वर्षे किंवा त्याहून अधिक जगू शकतात. आता तज्ज्ञांना आशा आहे की, मानवाचे आयुष्य वाढवण्याचे रहस्य या प्राण्यांमध्ये सापडू शकते. त्यातून माणसाला येणारे वृद्धत्वही दूर होऊ शकते, असाही दावा या अभ्यासकांनी केला आहे. (Secret of Long life)

====

हे देखील वाचा – ‘या’ देशात लावलं गेलंय पैशांचं झाड, पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

====

कासवाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना आशा आहे की, ते या जीवांमध्ये असलेले गुणधर्म शोधू शकतील, जे मानवाचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरू शकतील. या संशोधकांना अद्याप अपेक्षित असे यश आले नसले तरी संशोधक प्रमुख ‘ॲन ब्रोनिकोव्स्की’ आशादायी आहेत.  

ब्रोनिकोव्स्की यांच्या मते, प्राण्यांच्या वयाचे तुलनात्मक संशोधन मानवी वृद्धत्वाशी संबंधित बायोमेडिकल अभ्यासात उपयुक्त ठरू शकते. या अभ्यासाचे सह-लेखक डेव्हिड मिलर म्हणाले, “हे जीव हळूहळू कसे वाढतात, हे जर आपल्याला कळू शकले, तर आपण माणसांचे वृद्धत्व देखील समजू शकेल.” ते पुढे म्हणाले, “या शोधामुळे धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संवर्धनासाठीही मदत होऊ शकते.  अर्थात हे संशोधन सफल झाल्यास त्याचा दिर्घायुष्यासाठी उपयोग होईलच पण दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्यांना या संशोधनाचाही चांगला फायदा होणार आहे.” (Secret of Long life)

तसं बघायला गेलं तर, कुठलेही संशोधन चांगलेच असते, त्याचा वापर कसा आणि कशासाठी होतोय, हे पहाणे महत्त्वाचे आहे. 

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.