देवराह बाबा हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील योगी, महान संत आणि महान ऋषी होते. अवघ्या भारतभर देवराह बाबांचे भक्त आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय, पुरुषोत्तमदास टंडन यांच्यासह अनेक मान्यवरही देवराह बाबांचे आशीर्वाद घेत असत. महर्षी पतंजली यांनी सांगितलेल्या अष्टांग योगात देवराह बाबा पारंगत होते. याच देवराह बाबांचे अनेक चमत्कार अजूनही सांगितले जातात. देवराह बाबांचे अस्तित्व अजूनही या भागात जाणवते, असे त्यांचे भक्त सांगतात. या देवराह बाबांच्या एका चमत्काराची प्रयागराजमध्ये आता चर्चा सुरु आहे. हा चमत्कार म्हणजे, देवराह बाबांनी राष्ट्रकल्याणासाठी लावलेली अखंड ज्योत या मुसळधार पावसात आणि भयंकर पूरातही कायम आहे. झुंसी पुलाखाली असलेली ही अखंड ज्योत एवढ्या पावसातही कायम रहिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. हा सर्व देवराह बाबांचा चमत्कार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (Uttar Pradesh)
उत्तरप्रदेशच्या प्रयागराजला गंगा आणि यमुना नद्यांच्या पुराच्या पाण्यानं विळखा घातला आहे. या भागातील सुमारे 80 हजार नागरिक बेघर झाले आहेत. जवळपास आठ दिवस प्रयागराजला पुराच्यापाण्याचा विळखा बसलेला आहे. प्रयागराज महाकुंभ जिथे झाला होता, तो सर्व परिसर पाण्याखाली गेला आहे. प्रयागराजच्या अनेक मंदिरांचीही तशीच परिस्थिती आहे. येथील लेटे हुए हनुमानजी मंदिरातही पुराचे पाणी भरले आहे. याशिवाय या भागातील अनेक आश्रमांमध्येही पाणी आहे. गेल्या अनेक वर्षात अशापद्धतीचा पूर या भागात पाहिला नसल्याचे वयोवृद्ध सांगत आहेत. अशा भीषण पुरातही एक चमत्कार घडल्याचे येथील नागरिक सांगतात. प्रयागराजच्या या पुरामध्ये मचानावरची बाबांची अखंड ज्योत जशी आहे, तशी तेवत असल्याचे भाविकांनी सांगून हा सर्व देवराह बाबांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले आहे. (Social News)
प्रयागराज संगमाचा परिसर आता पूराच्या पाण्यानं व्यापला आहे. संगम परिसराला लागून असलेल्या झुंसी पुलाखाली असलेला एक मंडप याच पुराच्या पाण्यातही शाबूत राहिला आहे. हा छोटा मंडप म्हणजे, एक मचानासारखा आश्रम आहे. यासमोरील अखंड ज्योत ही या मुसळधार पावसातही कायम राहिली आहे. देवराह बाबांनी लावलेली या अखंड ज्योतीनं आत्तापर्यंत असे अनेक पूर आणि वादळे बघितली आहेत. त्यातही ही ज्योत अखंडपणे तेवत असते. त्यामुळेच प्रयागराजला येणारा लाखो भाविक या ज्योतीला नमस्कार करण्यासाठी यास्थळी येतात. ही ज्योत आहे, ते स्थान खूप पवित्र मानले जाते. याच संगमावर दरवर्षी माघ मेळा भरतो. दर 6 वर्षांनी अर्ध कुंभ भरतो. तर 12 वर्षांनी याच संगमावर महाकुंभमेळा भरतो. गेल्यावर्षी याच समंगतीरावर भरलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये गर्दीचा उच्चांक नोंदवला आहे. भारतासह जगभरातील भाविक येथे आले होते. (Uttar Pradesh)
या सर्व मेळ्यासाठी येथे विशाल तंबूंचे शहर उभारले होते. अनेक साधू-संत यांचे भव्य पांडाल उभारण्यात आले होते. लाखो भाविकांच्या सोयीसाठी विश्रामघरे उभारली होती. शिवाय अनेक फूडकोर्ट आणि आरोग्यदालनेही उभारली होती. महाकुंभ मेळा संपल्यावर महिनाभर ही सगळी व्यवस्था जैसे थे होती. मात्र नंतर सर्व तंबू काढण्यात आले. पण या सगळ्यात एक मंडप कायम रहातो, तो म्हणजे, प्रयागराज झुंसी पुलाजवळ, असलेला देवराह बाबांचा आश्रम त्यांनाच माचन वाले बाबा म्हणूनही ओळखकुंभ जाते. देवराह बाबांनी बांबूच्या मदतीने त्यांचा आश्रम बांधला होता, तो जवळजवळ दीड मजली घराएवढा उंच होता. झुंसी पुलाखाली बांधलेला हा आश्रम 10 फूट उंचीवर होता. त्याच्यासमोरच 80 फूट उंजीवर एका लोखंडी खांबावर अखंड ज्योत लावण्यात येते. या अखंड ज्योतीभोवती काचेचे आवरण लावण्यात आले आहे. दरवर्षी प्रयागराजमध्ये पूर आल्यावर याच अखंड ज्योतीबद्दल चर्चा सुरु होते. यावेळी प्रयागराजला आलेला पूर भीषण आहे. (Social News)
===================
हे देखील वाचा : Shravan : श्रावणात शुक्रवारी केल्या जाणाऱ्या वरदलक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती
===================
या पूरात देवराह बाबांचा आश्रमही उद्ध्वस्त झाला आहे. पण त्यांनी लावलेली अखंड ज्योती शाबूत आहे. देवराह बाबांच्या या संपूर्ण आश्रमाची देखभाल देवराह बाबांचे शिष्य रामदास महाराज करत आहेत. रामदास महाराज गेल्या दोन दशकांपासून या अखंड ज्योतीची सेवा करत आहेत. या ज्योतीसाठी देशी तूप वापरले जाते. एरवी या 80 फूट खांबाभोवती असलेल्या पाय-यांवरुन चढून या दिव्यामध्ये तूप घातले जाते. मात्र पूर आल्यावर येथे बोटीनं जावं लागते. यावेळी आलेल्या भीषण पूरातही या ज्योतीची काळजी घेण्यासाठी रामदास महाराज या पवित्र ठिकाणी पोहचत आहेत. देवराह बाबांनी ही अखंड ज्योत देशाच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि मानवी कल्याणासाठी लावली होती. कोणतीही आपत्ती आली तरी ही ज्योत विझवू नये, असा आदेश असल्यामुळे या अखंड ज्योतीची सेवा केली जाते. (Uttar Pradesh)
सई बने