पश्चिम आशियाई देश जॉर्डनच्या क्राउन प्रिन्सच्या लग्नाचा शाही समारंभ नुकताच पार पडला. या लग्नासाठी जगभरातील प्रतिष्ठित राजघराण्यातील सदस्यांनी हजेरी लावली होती. या रॉयल वेडिंगमुळे अवघ्या जॉर्डनला सजवण्यात आले होते. क्राऊन प्रिन्स हुसेन यांचा विवाह सौदी कुटुंबातील राजकुमारी रजवा अल सैफ हिच्याबरोबर झाला. या शाही लग्नाच्या थाटाबाबत जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा त्यासाठी आलेल्या पाहुण्याची होती. सोबतच जॉर्डनची राणी रानिया हिच्या सौदर्याची चर्चाही होती. काळ्या आणि चंदेरी रंगाच्या गाऊनमध्ये पाहुण्यांचे स्वागत करणारी जॉर्डनची राणी रानिया हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Crown Prince)

जॉर्डनचे प्रिन्स अल हुसेन आणि सौदी राजकुमारी राजवा अल हुसेन यांच्या लग्नाच्या शाही समारंभ होऊन आठवडा झाला तरी त्याची चर्चा अद्यापही चालू आहे. जॉर्डनचे क्राउन प्रिन्स हुसेन, म्हणजेच जॉर्डनचे राजकुमार 28 वर्षांचे आहेत. भविष्यात जॉर्डनचा राजा म्हून प्रिन्स हुसेन यांचेच नाव आहे. त्याची राणी बानी रज्वा अल सैफ ही 29 वर्षांची आहे. त्यांच्या लग्नसमारंभात जगभरातील राजघराण्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. संपूर्ण जॉर्डन या रॉयल वेडिंगच्या संदर्भात जल्लोषात मग्न होता. ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नी केटसह या समारंभात उपस्थित होते. ब्रिटिश राजघराण्याव्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या पत्नी जिल बिडेन यांनीही येथे हजेरी लावली. स्पेनचा माजी राजा जुआन कार्लोस आणि पत्नी राणी सोफिया, नेदरलँडची राजकुमारी कॅथरीना-अमालिया, क्राऊन प्रिन्सेस व्हिक्टोरिया, स्वीडनचा प्रिन्स डॅनियल आणि नेदरलँडचा राजा विलेम-अलेक्झांडर आपली पत्नी मॅक्झिमासह या शाही लग्नाला उपस्थित होते. (Crown Prince)
या लग्नसरंभासाठी जॉर्डनमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. या शाही विवाहाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले. सोबतच शहरात स्क्रिनही लावण्यात आले होते. जॉर्डनच्या अम्मानमधील झहरान पॅलेसमध्ये हा सोहळा पार पडला. राजे अब्दुल्ला आणि राणी रानिया यांनी उपस्थित शाही पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी राणी रानिया यांच्या सहज उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रिन्स हुसेन बिन अब्दुल्ला यांची आई आणि जॉर्डनची सध्याची राणी रानिया अल अब्दुल्ला सध्या 52 वर्षाची आहे. मात्र राणी रानिया यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही. राणी रानिया, त्यांची सून रजवा अल सैफ हिच्याहून अधिक सुंदर दिसत असल्याची चर्चा समाजमाध्यमात रंगली होती. आपल्या मुलाच्या लग्नासाठी जगभरातून जमलेल्या शाही पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी, राणीने परिधान केलेल्या पोशाखाचेही कौतुक होत आहे. राणी रानियाया काळ्या रंगाचा फ्लोअरलेंथ पॅटर्नच्या गाऊनमध्ये उपस्थित होत्या. उंच आणि सुडौल बांधा असणा-या राणी रानिया या या पोशाखामध्ये खुलून दिसत होत्या. या पोशाखाची कॉलर आणि हँडकफमध्ये सोन्याच्या धाग्यांनी बारीक हाताने भरतकाम केले होते. राणी रानिया अल अब्दुल्ला यांनी निवडलेल्या पोशाखात उंच नेकलाइनसह फुल स्लीव्हज होते. या पोशाखासह हलक्या रंगाचा मेकअप केलेल्या राणी रानिया या सर्व समारंभात अथिशय सुंदर दिसत होत्या. (Crown Prince)
=======
हे देखील वाचा : चीन खोदतोय पृथ्वीच्या गर्भात खोल खड्डा; कारण ऐकून व्हाल हैराण
=======
ज्या शाही जोडप्याचे लग्न होते त्या क्राउन प्रिन्स हुसैन बिन अब्दुल्ला यांच्या पत्नी रजवा अल सैफ यांनी यावेळी प्रसिद्ध लेबनीज फॅशन डिझायनर एली साब यांनी डिझाइन केलेला एक अतिशय सुंदर पांढ-या रंगाचा गाऊन घातला होता. नववधूने तिचा लूक डायमंड जडलेल्या मुकुटाने पूर्ण केला होता. तसेच तिने कानात ड्रॉप डाउन इअररिंग्ज घातल्या होत्या.
या लग्न समारंभासाठी संपूर्ण जॉर्डन सजवण्यात आले आहे. तसेच सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजकुमाराच्या लग्नाचा मुख्य समारंभ एक दिवसाचा असला तरी या निमित्त अन्य कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. या सर्वांसाठी पुढचा आठवडाही जॉर्डनमध्ये एखाद्या उत्सवासारखा साजरा होणार आहे. क्राउन प्रिन्स हुसैन बिन अब्दुल्ला यांच्या पत्नी रजवा अल सैफ यांना शुभेच्छा देण्यासाठी जॉर्डनमध्ये आलेल्या परदेशी पाहुण्यांची चहलपहल सुरु आहे. या सर्वातच राणी रानियाच्या लूकचीही चर्चा सुरु आहे.
सई बने
