Home » Rogue Elephant : एका हत्तीमुळे घरं उद्ध्वस्त झाली, माणसं मेली पण शेवटी…

Rogue Elephant : एका हत्तीमुळे घरं उद्ध्वस्त झाली, माणसं मेली पण शेवटी…

by Team Gajawaja
0 comment
Rogue Elephant
Share

तामिळनाडूच्या पानापट्टी भागातल्या त्या हत्तीची हाइट जमिनीपासून फक्त साडेसात फुट होती, तो अंदाज त्याच्या पायाच्या ठश्यावरून बांधला गेला. आता कमपॅरिजन करून जर पाहिलं तर, इतर लढाकू हत्तींपेक्षा तो तसा दिसायला, त्यांच्या पुढ्यात लहानच. पण त्याचा कॉन्फिडंस, स्मार्टनेस त्याला तोडच नव्हती. हा पण त्याचा माणसांवर काय राग होता, काय माहित. त्याला पाहून असं वाटायचं त्याला सगळ्या माणसांनाच संपवून टाकायचं आहे. तो इतका खतरनाक होता की, त्याने बऱ्याच माणसांना आणि प्राण्यांना मारलं होतं. त्याची एकदा हत्तींच्या कळपातली लीडर हत्तीसोबत जोरदार फाइट झाली होती. त्यात त्याचा एक दात तुटला. हा हत्ती Rogue Elephant of Panapatti म्हणून ओळखला जायचा. आता rogue हत्ती म्हणजे काय, तर हत्ती ग्रुप पासून वेगळा वागणारा, त्रास देणारा आणि विनाशकारी प्रवृत्ती असलेला असा. (Rogue Elephant)

एकदा हत्तींचा प्रजननाचा काळ आला होता, तेव्हा याने काही फिमेल हत्तींसोबत जबरदस्ती सेक्स करायचा प्रयत्न केला. त्यांच्या झुंडीतल्या इतर हत्तींनी त्याला नीट रहा म्हणून इशारा दिला, पण तो ऐकत नव्हता आणि त्याची मनमानी सुरूच राहिली. शेवटी त्याच्या या स्वभावामुळे त्यांच्या ग्रुप लीडरने टस्कर नावाच्या बलाढ्य हत्तीने त्याला खूप मारलं आणि यानंतर मोठी फाइट झाली. पण टस्कर वयाने आणि अनुभवाने बराच मोठा होता. टस्करने या rogue हत्तीला चांगलाच चोपला. यातच त्याचा एक दात तुटला. त्याला बऱ्याच गंभीर जखमा झाल्या. त्याच उदास आणि जखमी अवस्थेत तो जंगलात भटकत राहिला, पण पुन्हा कळपात परत जायची त्याची हिम्मत झाली नाही. (Top Stories)

या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या मनात भरपूर राग वाढला होता. आता तो काढायचा कुठे? तर असंच एकदा तो भटकत असताना त्याला बांबूंनी भरलेली एक म्हैसगाडी दिसली. गाडी पाहून तो वेड्यासारखा गाडीवर धावत गेला. गाडी चालवणारा माणूस हत्तीला धावत येताना पाहून घाबरला आणि उडी मारून पळाला. पण गाडीला जखडलेल्या त्या दोन म्हशींचं काय? त्या कश्या पळणार? तो हत्ती आला, त्याने आधी गाडीला चिरडलं. नंतर एका म्हशीला त्याने हवेत उडवलं; दुसऱ्या दिवशी त्या म्हशीचं शिंग मुळासकट उपटलेलं, हाडं तुटलेली आढळली. दुसरी म्हैस त्याच्या एका सुळ्याच्या वारातून नशिबाने वाचली आणि पळून गेली. या घटनेनंतर हत्तीची दहशत आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली. त्याने नदीकडे जाणाऱ्या लोकांना अक्षरशः चिरडलंं, काहींना सोंडेने उचलून हवेत उडवलं, काहींना झाडावर आपटून मारलं. नंतर या हत्तीची दहशत इतकी वाढली की, त्याला मारण्यासाठी सरकारने रोख बक्षीससुद्धा ठेवलं होतं. काही काळाने त्या दहशत माजवणाऱ्या हत्तीचा अंत झाला,पण तो कसा झाला? हे जाणून घेऊ. (Rogue Elephant)

Rogue Elephant

केनेथ अँडरसन या प्रसिद्ध लेखक आणि शिकारीने त्याच्या नाइन मॅन- ईटर्स अँड वन रोग या पुस्तकात या हत्तीबद्दलचा अनुभव लिहिला आहे. तर एकदा वीकएंडला हा अँडरसन कावेरी नदीजवळ फिशिंग करायला आला. त्याने या Rogue हत्तीच्या दहशतीबद्दल ऐकलं होतं, पण तो त्या परिसरात नाही, याची खात्री त्याला होती. थोडा वेळ फिशिंग केल्यानंतर तो फॉरेस्ट रेस्टहाऊसवर चहा प्यायला गेला. तेव्हा त्याला मोराचा आवाज ऐकू आला. त्याची इच्छा झाली आज मोराची शिकार करूयात. तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला. पण मोराचं लोकेशन त्याला कळत नव्हतं, म्हणून त्याने अंधाधुन तीन-चार गोळ्या हवेत मारल्या. त्यामुळे मोर आवाजाने पळायला लागला. आता अँडरसन त्या मोरावर नेम धरणार तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. त्या rogue हत्तीने आपल्या सोंडेने फुत्कार मारली, जो तिथेच जवळपास होता आणि अँडरसनला तो आपल्या दिशेने जोरात धावताना दिसला. अँडरसनला अंदाज होता की, आपल्याला जास्त लांब पळता नाही येणार, म्हणून त्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. जोरदार आवाजाने हत्ती घाबरला, कावराबावरा झाला.
पण अँडरसनच्या गोळ्या संपल्या, लगेच तो तिथून पळाला. पळता पळता तो फॉरेस्ट बंगलोमध्ये पोहोचला. दुसरी रायफल घेतली आणि बाहेर आला, पण तोपर्यंत हत्ती नदी पार करून पळून गेला होता. (Top Stories)

दुसऱ्या दिवशी अँडरसनला बेंगलोरला जायचं होतं, म्हणून त्याने त्या हत्तीचा विषय सोडून दिला. दरम्यान, गवर्नमेंटने त्यातच जो कोणी त्या हत्तीला मारेल त्याला ५०० रु बक्षीस जाहीर केलं. ही बातमी ऐकून एक उत्साही शिकारी आपल्या साथीदारांसह त्या हत्तीच्या मागावर गेला. पहिला दिवस झाला, त्याला तो हत्ती सापडला नाही. दूसरा दिवस पण असाच गेला. शेवटी रात्री थकून त्यांनी जंगलात टेंट बांधला आणि ते टेंटमध्ये झोपले. मध्यरात्री अचानक त्यांना मोठमोठ्याने तंबू हलण्याचा आवाज आला ते उठले. तो हत्ती त्या टेंटजवळ धावत आला होता. त्याने टेंट उद्ध्वस्त केला. त्या शिकाऱ्याला त्याने सोंडेने उचललं आणि जोरजोरात जमिनीवर आपटायलं. त्या शिकाऱ्याचा मांसाचा गोळा झाला. त्या हत्तीने रागात लाथ मारून त्या शिकाऱ्याला उडवून दिलं आणि पुन्हा जंगलात पळून गेला. (Rogue Elephant)

आता या भयानक घटनेनंतर गावकरी घाबरले. आजूबाजूच्या गावात त्याची दहशत आणखी वाढली. त्या हत्तीने आणखी नुकसान करू नये म्हणून गवर्नमेंटने बक्षीसची अमाऊंट ५०० वरुन १००० केली. अँडरसनला वाटलं, मागच्या वेळेस हा माझ्या हातून सुटला होता, हा सेकंड चान्स सोडायचा नाही. अँडरसन त्या ठिकाणी गेला, जिथे त्या हत्तीने शिकाऱ्याला आपटून आपटून मारलं होतं. त्याने त्या जागेचं नीट ऑबजरवेशन केलं. त्याच्या पायाचे ठसे शोधत शोधत तो चिनार नदीपर्यंत गेला. पण तो हत्ती तिथे कुठेच नव्हता. त्याने त्या गावातल्या स्थानिकांची मदत घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. जसा तो पुढे गेला, तिथे मोठमोठं शेत होतं, काही काही तर जवळपास १० फुटापर्यंत होते. ३५ मैलापर्यंत शोध घेतला गेला, पण हा rogue हत्ती सापडला नाही. पाचव्या दिवशी कावेरी नदीकाठी पुन्हा शोध सुरू झाला. तिथे हत्तीचे जुने पायाचे ठसे सापडले. त्यातच पुढे शेणावर एक फुटप्रिंट सापडला. अँडरसनने तो बघितला, त्याने शेण चेक केलं, ते फ्रेश नव्हतं. म्हणजे फुटप्रिंट बराच वेळेआधीचा आहे आणि तो हत्ती आसपास नसणार, हे तो समजला. (Top Stories)

===============

हे देखील वाचा : Dalai Lama : दलाई लामांना भारताने आश्रय तर दिला, पण चीनमुळे …

===============

ते पुढे चालत राहिले, तिथे लास्ट फुटप्रिंट होता आणि पुढे नदी होती. त्याला वाटलं की, पुढे तो हत्ती नदी पोहून पलीकडे गेला असेल. पण तिथेच त्या दोघांना शेणावर फुट प्रिंट सापडला आणि ते शेण ओलं होतं, त्यावरून एक अंदाज आला की, तो जवळपासच आहे. ते पटकन त्याला शोधायला धावले, कारण अँडरसनला ही संधी सोडायची नव्हती. अचानक आवाज यायला सुरुवात झाली. ते आवाजाच्या दिशेने गेले आणि ते बघतात तर काय? एक हत्ती नदीत आंघोळ करत होता. अँडरसन आणि त्याचा साथीदार शांत होते, कारण तो खरंच तोच rogue हत्ती आहे का? ज्याचा शोध ते घेत होते? याची खात्री त्यांना नव्हती. (Rogue Elephant)

हत्ती ओळखण्याची मोठी खून होती, त्याचा एकच दात. अजून यांना त्याचा चेहरा दिसला नव्हता. पण त्यांंना आता वेळ वाया घालवायचा नव्हता, कारण हा परत पळून गेला तर, याला पकडणं मुश्किल होईल. त्यांना त्याचं लक्षं केंद्रित करायचं होतं, म्हणून त्यांनी चुटकी वाजवली. हत्तीचे कान टवकारले. त्याला हे दोघे दिसले, त्याने सोंड आत घेतली, मान उंचावली आणि जोरदार फुत्कार मारत त्यांच्यावर धावला. अँडरसनने आधीच वैतागला होता, त्यात त्याची खात्री पटली होती की, हा तोच rogue हत्ती आहे. त्याला ही संधी सोडायची नव्हती. तो धावत येत असताना त्याने गन काढली. त्या हत्तीच्या दिशेने धरली आणि पहिली गोळी झाडली. ती गोली त्या हत्तीच्या गळ्याजवळ लागली. हत्ती थांबला. दुसरीकडे वळला तेव्हा आणखी दोन गोळ्या निघाल्या. एक त्याच्या कान आणि डोळ्याच्या मध्ये लागली आणि दुसरी कानमागे लागली. तो आता थरथरायला लागला आणि थाडकन पाण्यात पडला. सूर्य जवळपास मावळायला लागला होता, त्यामुळे आकाश लाल झालं होतं आणि खाली पाणी हत्तीच्या रक्ताने लाल झालं होतं आणि अशा पद्धतीने the rogue elephant of Panapatti चा अंत झाला.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.