पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका आणि इजिप्तच्या यशस्वी दौ-यानंतर भारतात परतले आहेत. त्यांचा हा दौरा कमालीचा यशस्वी झाला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका आणि भारत यांच्या मैत्रीचा पुढचा अध्याय असे या दौं-याचे वर्णन केले आहे. तिथेच इजिप्तसारख्या मुस्लिम बहुल देशानंही पंतप्रधान मोदी यांचे जोरदार स्वागत केले. शिवाय त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार देऊन मोदींचा सन्मान केला. मोदीमय जग झालं असतांना यात अमेरिकेच्या माजी अध्यक्षांची भूमिका मात्र अनेकांना चकीत करुन गेली आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे पंतप्रधान मोदी यांचे मित्र मानले जातात. मात्र तेच ओबामा (Barack Obama), पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे नाराज झाले की काय, अशी शंकाच व्यक्त करण्यात येत आहे. कारण ओबामांनी एका जाहीर मुलाखतीमध्ये भारतामध्ये मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र भारतातील मुस्लिमांची स्थिती कशी आहे, हे सांगतांना पाकिस्तानमध्ये रोज हिंदू मुलींवर अत्याचार होत आहेत, शिख बांधवांची हत्या होत आहे, हे सांगायला ओबामा विसरले.

शिवाय फक्त मुस्लिम समुदयाचा त्यांना पुळका असेल तर भारतात नाही पण चिनमध्ये मुस्लिमांच्या मतांचा कुठलाही विचार करण्यात येत नाही हे सांगायलाही बराक ओबामा विसरले आहेत. त्यामुळेच बराक ओबामा यांच्या भूमिकेवर सध्या संशय घेण्यात येत आहे. भारतात ओबामा (Barack Obama) यांच्या वक्तव्यावर चांगलेच पडसाद उमटले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना उत्तर दिले आहे. मात्र पंतप्रधान मोदी यांनी ओबामांच्या वक्तव्याची कुठलेही दखल घेतली नाही. उलट त्यावेळी मोदी इजिप्त येथील मशिदींना भेट देत होते, आणि तेथील मुस्लिम बांधव भारताचे गुणगान करीत होते. त्यामुळे मोदी यांनी कृतीतून ओबामांना उत्तर दिले आहे, असे स्पष्ट होत आहे. पण तरीही बराक ओबामा यांची भूमिका का बदलली त्यामागे त्यांचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे का? याची चर्चा सुरु आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा यशस्वी झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री अवघ्या जगानं पाहिली. अशावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी जो बायडेन यांना एका मुलाखतीद्वारे सल्ला दिला. या सल्ल्यामुळे बराक ओबामां यांच्या भूमिका बदलाची चर्चा सुरु झाली आहे. बराक ओबामा यांनी सीएनएनला एका मुलाखतीत भारतातील मुस्लिम समाजाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भारतात खळबळ उडाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर बराक ओबामा यांना स्वतःच्या कृतीचे आधी स्पष्टीकरण द्या असे खडसावले आहे. तुमच्या सरकारमध्ये 6 मुस्लिम देशांवर 26,000 बॉम्ब पडले, तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्नच सीतारामन यांनी ओबामा यांना विचारला आहे. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 13 सन्मान मिळाले आहेत. यामध्ये मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशांतील 6 सन्मानांचा समावेश आहे, हे ही सीतारामन यांनी ओबामा यांना दाखवून दिले आहे. सीतारामन यांच्यापोठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनीही ओबामा यांनी आरसा दाखवला आहे.
========
हे देखील वाचा : इंदिरा गांधी कालव्याची पाकिस्तानला धास्ती…
========
मुळात बराक ओबामा (Barack Obama) आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे दांम्पत्य पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक आहे. मिशेल ओबामा या महिला उमेदवार म्हणून या निवडणुकीसाठी अधिक उत्सुक आहेत. पण त्यातही जो बायडेन यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असे संकेत दिल्यानं ओबामा यांची पंचायत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वपक्षिय जो बायडेन यांना अलिकडे बराक ओबामा अनेक सल्ले देत आहेत. त्यामध्येच भारत अमेरिका संबंधाबाबतही सल्ला त्यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भारतातील मुस्लिम समुदायाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र भारतात मुस्लिम समुदायाची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. भारत हा हिंदू बहुसंख्यांचा देश आहे. (Barack Obama)
मात्र तिथल्या मुस्लिम अल्पसंख्यांकांची सुरक्षा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. असे तारे त्यांनी सीएनएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तोडले आहेत. मोदी यांना सल्ला देणारे ओबामा यांची ही मुलाखत मात्र सीएनएन ने मोदी आणि बायडेन यांची पत्रकार परिषद झाल्यावर प्रदर्शित केली. ही मुलाखत प्रदर्शित झाली तेव्हा पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौ-यावर रवाना झाले होते. इजिप्तचे पंतप्रधान मुस्ताफा हे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. त्यामुळे आपल्या जुन्या मित्राला पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिल्याचे बोलले जात आहे. अर्थात अमेरिकेच्या निवडणुकां पुढच्या वर्षात होत आहेत, तोपर्यंत बराक ओबामा यांची मोदींबाबतची भूमिका का बदलली हे स्पष्ट होणार आहे.
सई बने