ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडी बीचवर यहूदी सण, हनुक्का साजरा करण्यासाठी जमलेल्या लोंकावर झालेल्या हल्ल्यात आतापर्यंत १६ निष्पापाचा मृत्यू झाला असून ३८ हून अधिक जमखी उपचार घेत आहेत. या घटनेनंतर आता जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवाय हा हल्ला होण्याआधीच ऑस्ट्रेलिया प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे. आता या हल्ल्यानंतर पडद्यामागचे राजकारण रंगले आहे. (Australia)

कारण गेली सहा वर्ष या घटनेतील प्रमुख आरोपींवर ऑस्ट्रेलियन गुप्तचर संघटनांचा संशय होता. आयसिससोबत हे आरोपी काम करत असल्याचा संशय असल्यावर त्यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर ही गंभीर घटना झाली नसती अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर या घटनेनंतर, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीजवर हल्ला केला असून पॅलेस्टाईन राज्याला त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये यहुदीविरोधत भावना भडकल्या गेल्या आहेत. त्याचीच परिणती या हल्ल्यात झाल्याचे नेतन्याहू यांनी सांगितले आहे. मात्र या सर्वात आश्चर्य व्यक्त होत आहे, ते हल्लेखोरांच्या कुटुंबियांचे. बोंडी बीच गोळीबार घटनेनंतर, साजिद आणि त्याच्या मुलाने एकत्र येऊन हा गुन्हा केला आहे. मात्र साजिदच्या पत्नीला यावर विश्वास बसत नाही. तिच्या मते तिचा नवरा आणि मुलगा हे दहशतवादी नाहीत. त्यांना साधी शस्त्र चालवण्याचीही माहिती या दोघांना नसल्याचा दावा साजिदच्या पत्नीनं केला आहे. या घरात अन्य सहा बंदुका आणि आयसिसचा झेंडाही आढळून आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या या हत्याकांडामध्ये अनेक पैलू असल्याचे स्पष्ट होत आहे. (International News)
सिडनीच्या बोंडी बीचवर झालेल्या हल्ल्याला आता दिवस उलटून गे ला असतांना हा हल्ला पूर्वनियोजीत असल्याची माहिती उघड होत आहे. सोबतच हल्लेखोरांच्या कुटुंबियांनाही याबाबत माहिती होती का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हल्लेखोर ५० वर्षीय साजिद अक्रम आणि त्याचा २४ वर्षीय मुलगा नवीद अक्रम असल्याचे स्पष्ट केले आहे. साजिद अक्रम जागीच ठार झाला आहे, तर त्याचा मुलगा नवीद हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्लेखोरांची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पहिल्यांदा त्यांच्या घरावर धाड टाकली. यावेळी जी माहिती आली, त्यामुळे पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. कारण साजिदच्या पत्नीला याबाबत काहीही माहिती नव्हती. साजिद १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियाला आला होता आणि त्याने व्हेरेनाशी लग्न केले. (Australia)
तिचा मुलगा नवीद अक्रम हा चांगला विद्यार्थी होता. २०२४ पासून हे कुटुंब नवीन मोठ्या घरात रहायला लागले होते. ही घटना घडली त्याच्या आधी अर्धातास व्हेरेनाचं आपल्या मुलाबरोबर बोलणं झालं होतं. तेव्हा त्यानं तो जर्विस बे येथे त्याच्या वडिलांसोबत स्कूबा डायव्हिंग करत असल्याचे सांगितले होते. या दोघांकडे सहा बंदुका मिळाल्या असल्या तरी व्हेरेना मात्र या साजिद आणि नवीद यांना बंदुक चालवण्यास येत नसल्याचे सांगत आहे. व्हेरेना म्हणते की, नवीदकडे कोणतेही शस्त्र नव्हते, तो जास्त बाहेर जात नव्हता, मद्यपान करत नव्हता किंवा धूम्रपान करत नव्हता. तो इंटरनेटवरही फारसा सक्रिय नव्हता. तथापि, बोंडी बीचच्या ठिकाणी पोलिसांना आयसिसचे झेंडे सापडले असून असेच झेंडे त्यांच्या घरात सापडल्यानं या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता, याचा तपास आता सुरु झाला आहे. यातही सर्वात धक्कादायक माहिती पुढे आली आहे, ती म्हणजे, ऑस्ट्रेलियाची गुप्तचर संस्था, एएसआयओ, सहा वर्षांपासून नवीदच्या कारवायांवर संशय घेत होती आणि तो एजन्सीच्या रडारवर होता. (International News)

त्यांना नवीद सिडनीमध्ये कार्यरत असलेल्या आयसिसच्या नेटवर्कशी जोडलेला असल्याचा संशय होता. मात्र त्याला वेळीच अटक करण्यात आली नाही, आणि यात १६ निरपराधांना जीव गमवाला लागला आहे. याशिवाय ही घटना घडण्यापूर्वी इस्रायलतर्फे ऑस्ट्रेलियातील सरकारला माहितीही देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनाच या हल्ल्यासाठी जबाबदार धरले. नेतन्याहू यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देण्याच्या धोरणावर जोरदार टीका केली असून यामुळे यहूदीविरोधी आगीत इंधन भरले गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला औपचारिकपणे एक राज्य म्हणून मान्यता दिली आहे. (Australia)
====
हे देखील वाचा : Hanukkah : ज्यू समुदायाच्या प्रकाशोत्सवाला रक्ताचा डाग !
======
नेतन्याहूचे सरकार या घटनेकडे हमाससाठी बक्षीस म्हणून पाहते. गाझामध्ये इस्रायलच्या आक्रमणानंतर ज्यू समुदायाविरुद्धच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा दिल्यावरही ऑस्ट्रेलियानं याकडे दुर्लक्ष केले, याबाबत इस्रायलच्या अन्य नेत्यानीही ऑस्ट्रेलियावर टीका केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये यहूदीविरोधात झालेली ही पहिलीच घटना नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ला केला काही दिवसांनीच, सिडनीमधील एका ज्यू बेकरीसमोर लाल उलटा त्रिकोण रंगवण्यात आला होता. आता या हल्ल्यानंतर जगभरातील ज्य समुदायातील व्यक्तींना सार्वजनिक कार्यक्रमात जातांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
