भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूंचे आठवे अवतार. भगवान विष्णूंनी द्वापारयुगात कृष्ण रूपात अवतार घेत दृष्ट प्रवृत्तीचा नाश केला. भगवान श्रीकृष्ण यांनी जन्मापासूनच त्यांच्या लीला दाखवण्यास सुरुवात केली होती. बालवयात त्यांनी विविध लीलांनी सर्वांनाच अचंभित केले होते. त्यानंतर त्यांनी तरुण वयात कंसचा वध केला. महाभारतामध्ये पांडवांना साथ देत धर्माच्या बाजूने ते उभे राहिले. मात्र सृष्टीच्या नियमानुसार ज्यांनी जन्म घेतला त्यांचा मृत्यू होणे ते अटळ आहे. मग देव असो किंवा मनुष्य. याला श्रीकृष्ण देखील अपवाद नव्हते. जाणकारांच्या माहितीनुसार वयाच्या १२५ व्या वर्षी भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे अवतार कार्य समाप्त केले. मात्र श्रीकृष्णाचा मृत्यू कुठे झाला? आज ते ठिकाण कुठे आहे? जाणून घेऊया या लेखातून. (Shrikrushna)
भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत ई.स.पूर्व ३११२ दरम्यान झाला. त्यांचे बालपण वृंदावन, बरसाना, नांदगाव, गोकुळ, द्वारका अशा ठिकाणी गेले. असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर ३६ वर्षे राज्य केले, त्यानंतर त्यांनी देह सोडला. त्यावेळी त्यांचे वय १२५ वर्षे होते. खरंतर त्यांच्या मृत्यूमागे दोन शाप आहेत. अठरा दिवस चाललेल्या महाभारताच्या युद्धात रक्तपात झाला. या युद्धात कौरवांचे संपूर्ण कुळ नष्ट झाले, तसेच पाच पांडव वगळता पांडव कुळातील देखील बहुतेक लोकं मारले गेले. पण या युद्धामुळे आणखी एक राजवंश नष्ट झाला, तो म्हणजे श्री कृष्णाचा यदुवंश. हो यदुवंश नष्ट होण्यामागे महाभारताचे युद्धच कारणीभूत असल्याचे मानले जाते. (Marathi)
असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधन आणि त्याच्या सर्व भावांचा अंत झाला तेव्हा त्यांची आई गांधारी खूप संतापली. आपल्या मुलांच्या मृतदेहांजवळ शोक करत असताना गांधारीने कृष्णाला ३६ वर्षांनी युद्धभूमीवर मरण्याचा शाप दिला. हे ऐकून पांडव चकित झाले, पण कृष्णाने हसतमुखाने शाप स्वीकारला. यानंतर बरोबर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा एका शिकाऱ्याच्या हातून मृत्यू झाला. (Todays Marathi Headline)

श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला?
महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्ण ३६ वर्षांनी द्वारकेपासून दूर असलेल्या जंगलात गेले. तेथे ते एका झाडाखाली विसावले. तेव्हा जारा नावाच्या एका शिकाऱ्याने श्रीकृष्णाला हरण समजले आणि त्यांच्यावर विषारी बाण सोडला. जो त्यांच्या डाव्या पायाला लागला. तेव्हा कृष्ण एकटेच होते. जेव्हा शिकारी तिथे पोहोचला आणि कृष्णाला बाण मारलेला पाहून पश्चात्ताप करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाले, यात तुझी चूक नाही. त्रेतायुगात मी राम आणि तू बाली होतास. त्यावेळी तू माझ्यामुळे मारला गेलास. म्हणूनच तू मला बाण मारलास आणि तुझ्या हातून माझा मृत्यू होईल, असे म्हणत कृष्णाने प्राण सोडले. (Top Trending News)
कृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडले ते ठिकाण आता भालका तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचे मंदिर बांधण्यात आले आहे. बलरामांनी देखील समुद्र किनारी देश ठेवला आणि आपले अवतार कार्य समाप्त केले. श्रीमद भागवतानुसार श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या घरी गेल्याची माहिती त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनीही या दु:खामुळे आपला प्राण त्याग केला. देवकी, रोहिणी, वासुदेव, बलरामच्या पत्नी, श्रीकृष्णाच्या पटराणी इत्यादी सर्वांनी देह सोडला. यानंतर अर्जुनाने यदुवंशासाठी पिंडदान आणि श्राद्ध विधी केले. (Latest Marathi Headline)
या विधींनंतर अर्जुन यदुवंशातील उरलेल्या लोकांसह इंद्रप्रस्थला परतला. यानंतर श्रीकृष्णाचे निवासस्थान सोडून बाकी द्वारका समुद्रात बुडाली. त्यानंतर सर्व पांडवांनीही हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासातच पांडवांनीही एक एक करून देह सोडला. शेवटी युधिष्ठिर शरीराने स्वर्गात पोहोचला होता. (Top Marathi News)
=========
Shimga : कोकणात शिमग्याला पुजला जाणारा ‘संकासुर’ आहे तरी कोण?
=========
या ठिकाणाचे नाव भालका तीर्थ आहे. हे ठिकाण गुजरातच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या सौराष्ट्रातील वेरावळमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी प्राण सोडला त्या ठिकाणी भालका तीर्थ नावाचं मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरामागे अशीही कथा आहे की झारा नावाच्या शिकारीच्या बाणाने त्याचा जीव घेतला, त्यानं इथं पूजा सुरू केली. नंतर इथं मंदिर बांधण्यात आले. भालका तीर्थ हे सोमनाथ मंदिरापासून जवळ आहे. सहसा जे लोक सोमनाथ मंदिरात येतात, ते या ठिकाणी दर्शनासाठी येतात. या मंदिराजवळील फलक सांगतो, की हे ते ठिकाण आहे जिथे कृष्णाचा मृत्यू झाला होता. कृष्णाच्या निधनानं युगही बदललं. द्वापर युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. त्याच्या मृत्यूचा दिवस इ.स.पू. १७ फेब्रुवारी ३१०२ असा आहे. सोमनाथ मंदिरापासून भालका तीर्थ फक्त ४ किलोमीटर अंतरावर आहे. त्याचा आणखी विकास करून मोठे पर्यटन केंद्र करण्याचा सरकारचा विचार आहे. हे ठिकाण रेल्वे आणि रस्त्याने खूप चांगले जोडलेले आहे. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
