साल १९१०, रात्रीची वेळ होती. ही रात्र तशी रोजसारखी रात्र नव्हती. उत्तराखंड राज्यात अल्मोड़ा जिल्ह्यात एक नवविवाहित जोडपं, आपल्या दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर झोपलं होतं. आता त्याकाळी पंखे नव्हते म्हणून गर्मीमुळे लोक खिडक्या आणि दारं उघडी ठेवून झोपायचे. आता त्या रात्री हे जोडपंसुद्धा खिडक्या उघड्या ठेवून झोपलं होतं. रात्रीच्या अंधारात एक बिबट्या खिडकीतून उडी मारून त्या जोडप्याच्या घरात शिरला. मग दबक्या पावलांनी चालत, पुढच्याच क्षणी त्याने झोपलेल्या बाईवर हल्ला केला. तिची मान आपल्या जबड्यात पकडली. तिला वाटलं, कोणीतरी तिच्या मानेवर चाकूने वार करतंय. म्हणून ती जोरात ओरडायला लागली. तिचा नवरा दचकून उठला आणि बघतो तर काय…(Panar Leopard)
एक बिबट्या त्याच्या बायकोला खेचत बाहेर नेतोय. बायको जोरात ओरडत होती, याची फुल फाटली होती. कारण असा प्रसंग त्याने त्याच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. त्याने तिला वाचवायला त्याने तिचे पाय धरले. काही वेळ ही झटापट सुरु होती आणि… काय नशीब होतं तिचं काय माहित? त्या झटापटीत ती वाचली आणि त्या बिबट्याने खिडकीच्या बाहेर उडी मारली. तो आता पळून गेला होता. तिच्या नवऱ्याने दारं खिडक्या बंद केले. त्यात तिचं खूप रक्त गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावकऱ्यांनी घाबरून घराबाहेर पडणं बंद केलं. याचं कारण हा बिबट्या दुसरा तिसरा कोणी नसून पनारचा नरभक्षी बिबट्या होता. आता या पनारच्या बिबट्याची किती दहशत होती आणि त्याचा अंत कसा झाला हे जाणून घेऊ. (Top Stories)
२० व्या शतकाच्या सुरुवातीला पनारच्या बिबट्याची दहशत होती, जो इतिहासातल्या सर्वात डेंजरस प्राण्यांमध्ये आजही तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या आयुष्यात ४०० पेक्षा जास्त माणसांचे बळी घेतलेत. आता पहिल्या क्रमांकाचं सर्वात डेंजरस नाव आजही चंपावत वाघिणी आहे, जिने ४३६ माणसांचे बळी घेतलेत आणि हा पनारचा नरभक्षी बिबट्या तिच्यानंतर दुसरा. आता वाघ आणि बिबट्यांमध्ये जर तुलना केली, तर बिबट्या त्या मानाने कमी नरभक्षी असतात आणि वाघ त्यापेक्षा जास्त. पण तरीसुद्धा 1875 ते 1912 या काळात भारतात बिबट्यांचा इतका दरारा होता की, या काळात ११९०९ माणसांचे मृत्यू फक्त बिबट्यांच्याच हल्ल्यांमुळे झालेत आणि त्यात तर या उत्तर भारतातल्या पनारच्या बिबट्यानेच ४०० लोकांचे बळी घेतले होते.(Panar Leopard)
आता हा बिबट्या नरभक्षी होण्यामागे एक कारण आहे? तर झालं असं की, २० व्या शतकात काॅलराची साथ खूपच वाढली होती. त्यावेळी कॉलरा म्हणजे अंधश्रद्धाच… यावेळी लोकं कॉलरामुळे मेलेल्यांना कुठेतरी जंगलात टाकून द्यायचे किंवा नदीत सोडायचे… याचं आजारी मृतदेहाचे मांस खायला या बिबट्याने सुरुवात केली होती. पण जेव्हा या काॅलराची साथ थांबली, तेव्हा त्या बिबट्याचा प्रॉब्लम झाला. कारण आता आयते मृतदेहांचं मांस मिळणं बंद झालं आणि तेव्हा तो बिबट्या अस्वस्थ व्हायला लागला. तो मग जंगलात माणूस दिसला रे दिसला की, त्याच्यावर हल्ला करायचा. जर जंगलात कोणी सापडलं नाही, तर गावात जावून शिकार करायचा. त्यामुळे या पनारच्या बिबट्याची दहशत सगळीकडे वाढायला लागली आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांची चिंता वाढायला लागली. (Top Stories)
पुढची काही वर्ष गावकऱ्यांनी या बिबट्याला पकडण्याचा आणि शिकार करण्याचा बराच प्रयत्न केला, पण प्रत्येकच वेळेस तो असफल ठरत होता. हा बिबट्या इतका हुशार होता की, गावकऱ्यांच्या सापळ्यातून कायम सुटायचा आणि त्याच्यावर हल्ला करेपर्यंत तो निघून जायचा. यातच त्याने उत्तराखंडमध्ये त्या स्त्रीवर हल्ला केला होता, आता नशिबाने एक तर ती वाचली होती, पण त्या बिबट्याचा निकाल लावणं आता जास्त गरजेचं होतं आणि याचवेळेस स्टोरीमध्ये एन्ट्री होते जिम कॉर्बेटची. शिकारीच्या बाबतीत जगातलं सर्वात फेमस नाव ! याच काळात जिम कॉर्बेट चंपावती वाघाच्या शिकारीत बिझी होता. त्याला जेव्हा या पनारचा नरभक्षी बिबट्याबद्दल खबर लागली, तेव्हा तो लगेच त्या जोडप्याच्या घरी गेला.(Panar Leopard)
आता जिम कॉर्बेटची खरंतर वेगळी अशी ओळख सांगायची गरज नाही. तो एक अप्रतिम शिकारी, निसर्गवादी, लेखक आणि वन्यजीवप्रेमी होता. त्याने त्याच्या द मॅन-ईटर्स ऑफ लेपर्ड्स या पुस्तकात त्या रात्रीचा उल्लेख केला आहे. त्यात तो असं म्हणाला की, “त्या तरुण स्त्रीच्या गळ्यावर आणि छातीवरच्या जखमा सडू लागल्या होत्या. गळ्यावर दातांचे खोल घाव, तर छातीवर नखांनी उकरलेल्या क्रूर खुणा होत्या. वैद्यकीय मदत मिळाली तरी ती वाचेल, याची शक्यता फारच कमी होती. त्यात ती स्त्री साधारण 17-18 वर्षांची असावी.” यानंतर कॉर्बेटने रात्री त्या घराजवळ पहारा दिला. (Top Stories)
कॉर्बेट म्हणतो की, त्याला कोणत्याही प्राण्यावर उगाच बंदूक चालवायची इच्छा नसते, पण जेव्हा प्राणी माणसांना भक्ष्य बनवतो, तेव्हा मला बंदूक उचलावी लागते आणि यातच पनारच्या नरभक्षी बिबट्याची वेळ आली होती. कॉर्बेटने एप्रिल १९१० मध्ये या पनारच्या नरभक्षी बिबट्याला मारण्याचा पहिला प्रयत्न केला. तो पहारा देत असताना आजूबाजूला अंधार आणि कोल्ह्यांचे भयानक आवाज सुरु होते. त्याने सगळीकडे फिरला पण त्याला तो बिबट्या सापडला नाही. त्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये, कॉर्बेट ३० मैल जंगलातून चालत एका गावात पोहोचला. तिथेच त्याला नदीच्या पलीकडे असेल्या गावात हल्लीच त्या बिबट्याने हल्ला केल्याची खबर आली होती. मग टेकडीवर चढून नदी पार करत तो पलीकडच्या गावी पोहोचला. याचं गावात त्या बिबट्याने चार माणसं मारली होती. आता या पनारचा नरभक्षी बिबट्याची शिकार करायची म्हणजे मोठा सापळा रचला पाहिजे. त्याने आयडिया केली, त्याने सापळा म्हणून दोन बकऱ्या ठेवल्या आणि आपल्या बंदुकीसह त्याची शिकार करायला तयार होता. काही वेळाने तो बिबट्या आला आणि कोणाच्याही लक्षात न येता पहिली बकरी पळवली. त्यामुळे कॉर्बेटची ही संधी चुकली. (Panar Leopard)
===============
हे देखील वाचा : Six Triple Eight : दुसऱ्या महायुद्धात इतिहास रचणाऱ्या 6888 महिला बटालियन…
===============
मग त्याने दुसरी बकरी ३० यार्ड अंतरावर बांधली आणि दिवस रात्र त्या नरभक्षी बिबट्याची वाट पाहत बसला. मग असेच तीन दिवस निघून गेले आणि तो बिबट्या दुसऱ्या बकरीवर हल्ला करण्यासाठी परत आला. कॉर्बेटचं तिथे लक्ष गेलं. मागच्या वेळेस संधी हुकली पण या वेळेस त्याला ही संधी सोडायची नव्हती. पण अंधार जास्त असल्यामुळे त्याला नेम धरायला त्रास होत होता. तरी त्याने आवाजाच्या दिशेने गोळी झाडली. बिबट्या यात जखमी झाला आणि तो पळायला लागला. पण कॉर्बेटने काही टोर्च घेऊन माणसं तयार ठेवली होती. त्यांना सांगितलं होतं, काही केल्या पळून जायचं नाही. कारण अंधारात बिबट्या दिसला की, त्याला मारणं सोप्पं जाईल जाईल. (Panar Leopard)
आता ज्या दिशेने बिबट्या पळाला होता त्या दिशेने जंगलात शोध सुरू केला. तेवढ्यात अचानक त्या बिबट्याने झाडींमधून उडी मारली आणि तो कॉर्बेटवर हल्ला करायला धावला. तो बघून त्याच्या सोबत आलेल्या माणसांची फाटली आणि ते टोर्च सोडून पळाले. त्यातच एका टोर्चच्या प्रकाशात तो बिबट्या कॉर्बेटला दिसला आणि तो कॉर्बेटजवळ पोहोचणार इतक्यात कॉर्बेटने गोळी मारली. ती गोळी त्या बिबट्याच्या छातीवर लागली आणि यातच इतिहासातल्या सर्वात डेंजरस प्राण्यांमधला एक पनारचा नरभक्षी बिबट्याचा अंत झाला आणि हा कॉर्बेट याने ठार केलेला पहिला मनुष्यभक्षी बिबट्या होता. कॉर्बेटने जर या पनारच्या या नरभक्षी बिबट्याला मारलं नसतं, तर कदाचित त्या बिबट्याने आणखी माणसं मारली असती.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
