Home » ‘या’ मंदिराच्या आकारात आहे नवे संसद भवन…

‘या’ मंदिराच्या आकारात आहे नवे संसद भवन…

by Team Gajawaja
0 comment
New Parliament
Share

देशाची नवीन संसद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना बहाल केली. या भव्य इमारतीच्या (New Parliament) उभारणीची सुरुवात 10 डिसेंबर 2020 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. बरोबर 29 महिन्यांनी 973 कोटी रुपये खर्च करून नवी भव्य संसद तयार झाली. एकूण 64,500 चौरस मीटर परिसरात उभीर राहिलेली चार मजली संसद भवन इमारत अत्याधुनिक साधनांनी युक्त अशी आहे.  जगभरातील मोजक्या ससंद इमारतींमध्ये भारताच्या या इमारतीचा समावेश होत आहे. ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र या नव्या संसद इमारतीच्या उभारणीवरुन आणि ऩंतर उद्घाटन समारंभावर अनेक वाद झाले. ही नवी संसद इमारत (New Parliament) कशी दिसते यावरही टीका टिप्पणी करण्यात आली. ही भव्य संसद इमारत भारतीय वास्तू शास्त्राचे आधुनिक रुप आहे. मध्यप्रदेशमधील विजय मंदिराचे हे प्रतिरुप असल्याचे सांगितले जाते. नवीन संसद भवनाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. ही नवीन संदस भवन इमारत मध्यप्रदेशच्या विदिशामधील विजय मंदिराची प्रतिकृती असल्याची चर्चा आहे.  एकेकाळी भारताचे वैभव म्हणून ओळखलेल्या या विजय मंदिरावर अनेकवेळा आक्रमण झाले. ते सोसूनही ही इमारत भक्कमपणे उभी होती. मात्र औरंगाजेबानं या विजय मंदिरावर तोफांनी मारा केला  त्यात नष्ट झालेल्या या विजय मंदिराची आठवणच नवीन संसद मंदिर बघितल्यावर होत आहे. (New Parliament)

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधलेल्या भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन झाले आहे. मात्र ही नवीन संसद भवन (New Parliament) कशी दिसते याची चर्चा अद्यापही सुरु आहे. या चर्चेमध्ये एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे मध्यप्रदेशच्या विदिशामधील विजय मंदिर. या विजय मंदिरासारखेच नवीन संसद भवन असल्याचे जाणकार सांगतात. भारताच्या सुवर्णकाळात हे विजयमंदिर समस्त हिंदूसाठी विजयाचे प्रतिक मानले जायचे.  अतिशय भव्यदिव्य असलेल्या या मंदिराला अनेकवेळा परकीय आक्रांदानी लुटले आणि नष्ट केले. (New Parliament)   

भारताची जुनी संसद भवन इमारत (New Parliament) देखील मध्य प्रदेशातील मोरेना येथील चौसष्ट योगिनी मंदिराच्या रचनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते.  ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्सने यांनी ही इमारत बांधली होती. आता त्याच मध्यप्रदेशधील आणखी एक मंदिर चर्चेत आलं आहे.  या मंदिराच्या धर्तीवर नवीन संसद भवनाची इमारत उभी करण्यात आल्याचे या मंदिराची माहिती असणारे सांगत आहेत. विदिशामधील विजय मंदिर हे खूप वैभवशाली मंदिर होते.  विजय मंदिराची गणना देशातील सर्वात मोठ्या मंदिरांमध्ये केली जाते. परदेशी आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा हे मंदिर लुटले आणि त्यातील मुर्तींची तोडफोड केली.  मोहम्मद घोरीच्या गुलाम अल्तमशपासून औरंगजेबासारख्या क्रूर राज्यकर्त्यांनी या मंदिराला फक्त लुटलेच नाही तर त्यातील मुर्तीही भंग केल्या. या मंदिरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. विजय मंदिर मंदिराचे बांधकाम चालुक्यवंशी राजाने केल्याचा उल्लेख आहे. (New Parliament)

विदिशा नगरीचा विजय चिरस्थायी होण्यासाठी हे विजयम मंदिर म्हणजेच सूर्य मंदिर बांधल्याचे सांगण्यात येते. 10 व्या आणि 11व्या शतकात परमार राजांनी या भव्य मंदिराची पुनर्बांधणी केली. मोहम्मद घोरीनंतर मुघल शासक औरंगजेबालाही या मंदिराचे वैभव त्रस्त करत होते.  त्यांनी हे मंदिर लुटलेच पण त्यातील वैभवशाली अशा मुर्ती आणि नक्षीकामाचीही तोडफोड केली. हे मंदिर विजयाचे प्रतिक होते. त्याला सूर्य मंदिर असेही म्हटले जायचे. 11 व्या शतकात परमार शैलीनुसार बांधलेले हे मंदिर 150 यार्ड उंच होती. 1233-34 मध्ये प्रथमच विजय सूर्य मंदिरावर मुहम्मद घोरीचा गुलाम अल्तमश याने हल्ला केला. त्यानं मंदिरातील मुर्तीही भंग केल्या. 1250 मध्ये मंदिर पुन्हा बांधले गेले.  मात्र  1290 मध्ये अलाउद्दीन खिलजीने पुन्हा या मंदिरावर हल्ला करुन त्यातील संपत्ती लुटली आणि मंदिर उध्वस्त केले. यानंतर महमूद खिलजीने 1459-60 मध्ये मंदिराचे नुकसान केले. 1532 मध्ये बहादूरशहानेही विजय मंदिरावर हल्ला केला. (New Parliament)

त्यानंतर औरंगजेबाची नजर या मंदिरातील वैभवावर गेली. अनेकवेळा हल्ला करुनही मंदिर कसे पडत नाही, या कारणांनी औरंगाजेब काळजीत पडला होता.  या मंदिराला पूर्णपणे उध्वस्त करण्याचा आदेशच त्यानं दिला होता. त्याने 1682 मध्ये 11 तोफांचा वापर करून मंदिराचे मोठे नुकसान केले. तोफांच्या साहाय्याने मंदिर पूर्णपणे लुटले गेले आणि तोडले गेले. यात मंदिराली सर्व मुर्ती भंग करण्यात आल्या आणि औरंगाजेबानं जबरदस्तीनं हे मंदिर आपल्या ताब्यात घेतले.  पुढे हा संपूर्ण प्रदेश मराठा शासकांच्या ताब्यात आला. त्यांना मंदिराची माहिती मिळाली.  1934 मध्ये या भागात उत्खनन करण्यात आले. तेव्हा मंदिराचे अवशेष सापडले.  या संपूर्ण परिसराचे उत्खनन केल्यावर एकेकाळी भारताचे वैभव असणा-या विजय मंदिराचे सर्व रुप समोर आले.  या भागावरुन आता वाद सुरु असून या मंदिराची पुन्हा नव्यानं उभारणी करावी अशी विदिशामधील नागरिकांची मागणी आहे. (New Parliament) 

========

हे देखील वाचा : चोल वंशासंबंधित असलेल्या सेंगोलचा इतिहास

========

आता जी नवीन संसदेची इमारत आहे, त्यातील समोरचे दोन भव्य खांब विजय मंदिराच्या खांबांसारखेच आहेत. या विजय मंदिराचे हवाई दृश्य पाहिल्यास ते संसद भवनासारखे दिसते.  दोन्हीचा आकार त्रिकोणी आहे. शिवाय नवीन इमारतीप्रमाणे या विजय मंदिराची उंचीही दिडशे यार्ड असल्याची माहिती जाणकार देतात. त्यामुळेच भारताचे एकेकाळी वैभव समजले जाणा-या विजय मंदिरासारखेच आपले नवे संसद भवन असल्याचा दावा करण्यात येत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.