१९२५ चा तो काळ… आपण सर्वांनीच काकोरी ट्रेन कांडबद्दल ऐकलच असेल. क्रांतीकारकांची ही मोहीम यशस्वी झाली खरी… पण पोलिसांनी नंतर जो राडा घातला, जी नाकाबंदी लावली, जे छापे टाकले. त्यामुळे एक एक करून सगळेच फरार असलेले क्रांतिकारी पकडले गेले. अपवाद एक चंद्रशेखर सीताराम तिवारी उर्फ चंद्रशेखर आजाद. ब्रिटीश त्यांना क़्विक सिल्व्हर म्हणायचे का तर हा माणूस कसा यायचा आणि कसा गायब व्हायचा कोणालाच कळत नव्हतं आणि अखेरपर्यंत कळलं नव्हतं. तरी ब्रिटीशांचे गुप्तहेर त्यांच्या मागे लागलेलेच असायचे आणि हे वेषांतर करून भलतीकडच असायचे. (Chandrashekhar Azad)
पोलीस आणि गुप्तहेरांनी ५ वर्ष त्यांचा पाठलाग काही सोडला नाही आणि ह्यो माणूस त्यांचा हाताला कधीच लागला नाही. १९३० उजाडलं तो फेब्रुवारीचा महिना होता. थंडी पडली होती. त्यात आजच्या सारखाच अवकाळी पाउस तिथे सुरु झालेला. रात्री १० वाजता लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनवर प्रवाशांपेक्षा जास्त पोलीसच होते. अर्धे वर्दीवर तर अर्धे सिव्हीलवर… त्यांना टीप लागली होती, की सव्वा दहा वाजता जी देहरादून एक्सप्रेस platफॉर्म नंबर १ वर येणार आहे, त्यात चंद्रशेखर आजाद आहे. त्यामुळे आता त्याला सोडायचं नाय, हाच ब्रिटीशांचा प्लान होता. ट्रेन आली, पोलीस कामाला लागले, एक एक डब्बा शोधला. पण आजाद काही त्यांच्या हाताला लागले नाहीत. आता आपण संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Top Stories)
मग काय शुरू पकडा-पकडी का खेल गाडी सुटायच्या आधी आजाद सापडले नाही, तर नाचक्की पक्की होती. त्यातच अचानक एक शिपाई धापा टाकत ऑफिसर जवळ आला आणि म्हणाला की आजाद एका साहेब-बहादूरच्या वेशात बाहेर कधीच निसटून गेला. मला हे तिकीट मिळालय. त्या ऑफिसरने ते तिकीट घेतलं. ते फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. त्याच्या मागे लिहिलं होतं. मुझे जीवित पकडना असंभव है…-आजाद… विचार करा ना काय कॉन्फीडेन्स असेल त्या माणसाचा एवढ मोठ जवळपास अख्या जगावर राज्य करणारं ब्रिटीश साम्राज्य एका माणसाला पकडू शकत नव्हते. ऑफिसर तनतनला. रागाने लाल झाला. आता याला काहीही करून मी पकडणारच अशी शपथच त्याने घेतली आणि सगळे पोलीस स्टेशनबाहेर पाठवले… (Chandrashekhar Azad)
आजाद आपला सुटकेस घेऊन जेन्टलमनसारखे चालत पुढे जात होते. तेवढ्यात त्यांना मागून कोणीतरी पळत येतायत, असा आवाज आला. ते मागे वळले आणि ए भली मोठी पोलिसांची फौज त्यांनाच पकडायला येत होती. मग काय आजादांनी आपलं क्विक सिल्व्हर वालं रूप धारण केलं आणि इकडच्या तिकडच्या गल्लींमध्ये ते वळण घ्यायला लागले. तेवढ्यात जबरदस्त पाउस सुरु झाला. पोलिसांना इथे चकवा देता येणार नाही, त्यामुळे त्यांनी ठरवलं, की आता कोणाच्या तरी घरातच शिरलं पाहिजे. मागे पाहिलं. पोलीस प्रत्येक गल्ल्यांमध्ये पसरलेले होते. त्यामुळे अचानक त्यांनी एक दरवाजा थेट ठोकवला आणि एका साठीतल्या म्हाताऱ्या बाईने दार उघडलं.
तिने विचारलं कोण आपण ? आजाद इथून बोलले. पाऊस खूप पडतोय, भिजलो सुद्धा आहे. थोडा वेळ तुमच्या घरी थांबू शकतो का ? आजीने कसलाही विचार केला नाही. म्हणाल्या ‘आत ये बाळा…! ते जसे आत आले तशी त्यांनी डायरेक्ट कडीच लावून घेतली. म्हातारी बाई त्यांच्याकडे पाहतच राहिली. आजाद एका ठिकाणी बसले आणि नंतर त्या आजीबाईने त्यांना टॉवेल आणि धोतर आणून दिलं. आजादांनी दोन्ही गोष्टी घेतल्या. पण ते धोतर नव्हतं तर बायकांचं लुगड होतं. ते पाहूनच आजादांना हसू आलं. तेवढ्यात आजीबाई थेट बोलली. माझ्या पोरीचं आहे ते. घरात एकही मर्द नाही, आम्ही दोघीच असतो. आजादांनी फक्त टॉवेल घेतला. (Top Stories)
एवढ्यात आजीबाईने त्यांना नाव विचारलं, आजाद बोलले. आयुष्यात कधी खोट बोललो नाही, पण आता खरं बोलायची इच्छा नाही. आजीबाई म्हणाली, खर बोलायला कसली भीती, काहीही असो.. खरं बोललच पाहिजे. त्यांनी नाव सांगितलं… चंद्रशेखर आजाद ! आजीच्या मुखावर क़्वेशन मार्क आला आणि बोलली… तोच आजाद का जो फरार आहे, ज्याच्यावर सरकारने १५ हजारांचं बक्षीस ठेवलं आहे. आजाद म्हणाले…हो तो मीच आहे… यावर आजीबाईने विचारलं… पण तुझा अपराध नेमका आहे तरी काय ? आजाद उत्तरले… देशभक्ती हाच माझा अपराध आहे. मी कोणत्याही भारतीय नागरिकाला दैनंदिन गोष्टींसाठी इथे तिथे भटकताना पाहू शकत नाही. मला ब्रिटीशांचे हे अत्याचार बिलकुल सहन होत नाहीत. भारत मातेच्या पायात जे साखळदंड आहेत, तेच मला काढायचे आहेत… यासाठी मी लढतोय आणि हाच माझा अपराध आहे. (Chandrashekhar Azad)
आजीबाई नरमली… ती म्हणाली… धन्य आहे ती आई जिने तुझ्यासारखं मुल आपल्या पोटात वाढवलं. तुझ दर्शन झालं पोरा, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. एवढ्यात तिला खोकला सुरु झाला… तेवढ्यात वरच्या खोलीतून कोणतरी धावत तिकडे आलं. तेवढ्यात आजाद एका कोपऱ्यात लपले. ती त्या आजीची मुलगी कल्पना होती. वरच्या खोलीत अभ्यास करत होती. तिने आजीबाईला पाणी पाजलं. थोडा धीर दिला. आजीला बरं वाटलं तसं ती इकडे तिकडे पाहू लागली. तेवढ्यात मुलीने विचारलं… काय झालं ? कुणाला बघतेयस ? तेवढ्यात आजीबाई म्हणाली… अगं आता तर माझ्याशी बोलत होता, अचानक कुठे गेला. कल्पनाला काहीच कळल नाही. ती एकदम टेन्शनमध्ये आली की आई असं का बडबडतेय… एवढ्यात आजाद त्या कोपऱ्यातून बाहेर आले आणि म्हणाले, मी इथेच आहे… फक्त त्यांच्या धावत येण्याचा आवाज ऐकून लपलो होतो. (Chandrashekhar Azad)
आता कल्पनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होता, तिने विचारलं… हा कोण आहे आई ? आजीबाई म्हणाली… एका रात्रीचा पाहुणा आहे गं.. चांगला माणूस आहे आणि चांगलं काम करतोय. तेवढ्यात पटकन आजाद म्हणाले… चांगलं काम करतोय पण दिवसभर भुकेला आहे… तेवढ्यात आजीबाईने लवकर तिच्या मुलीला जेवण तयार करायला सांगितलं. तिने जेवण आणलं… आजाद जेवायला बसले आणि हपापल्यासारखे जेवायला लागले जसे कित्येक दिवस भूकेलेच होते. त्यावर कल्पना हसायला लागली. आजादांनी तिच्याकडे बघितलं आणि म्हणाले… माणूस भुकेला असला की असच होता, तू कधीतरी भुकेली राहिली आहेस का ? यावर कल्पना म्हणाली… भुकेलं राहण आमच्यासाठी काय नवीन गोष्ट नाही… कितीतरी दिवस तर आम्ही फक्त एकदाच जेवतो. मग रात्रभर अभ्यास असतो… परीक्षा पण जवळ आल्या आहेत. (Top Stories)
=============
हे देखील वाचा : Indians in Fiji : कालिया नाग सध्या फिजी देशात आहे…
=============
आजादांनी तिला विचारलं, काय शिकतेयस… ती म्हणाली एम ए सेकंड इअर संस्कृत विषय… आजाद बोलले..वाह संस्कृत शिकतेयस म्हणून तर भुकेले पोट राहावं लागतंय आणि दोघांमध्ये हशा पिकला. जेवण झालं… कल्पना तिचा अभ्यास करायला गेली. नंतर परत आजाद आणि आजीबाईचं बोलण सुरु झालं. आजी सांगत होती की, कल्पना पोरांना ट्युशन शिकवते, त्याचे २० रुपये मिळतात.. यातच कुठे थोडंफार आमचं गुजराण होऊन जातं. आता तिचं लग्न पण करायचं आहे… मुलगा बघितलाय पण पैशाची मोठी अडचण… काय करणार ? आता वातावरण थोडं शांत झालं होतं… बाहेर हलका पाउस सुरु होता. आजादांनी थोडा आराम केला, आणि मध्यरात्री दोन वाजता निघायला उठले. आजीबाई म्हणाली, अधून-मधून येत रहा पोरा… आजाद हो म्हणाले आणि कल्पनाला खाली बोलवून घेतलं. ती खाली आली… आजादांना म्हणाली, बाणभट्ट यांची कादंबरी वाचत होती… भयंकर कठीण आहे. (Chandrashekhar Azad)
आजाद तिला म्हणाले, आयुष्यात कोणतीही गोष्ट कठीण नाही. मन लावून अभ्यास कर आणि प्रत्येक विषयात प्रथम ये.. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमी आहे. कल्पना उत्तरली. तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद आहेत म्हणून तर नेहमी पहिली येते आताही नक्कीच येईन. आजादांनी आपला सुटकेस पुढे केला… आणि म्हणाले मग हे आताच घे तुझ्या प्रथम येण्याचं बक्षीस ! सुटकेस कल्पनाकडे दिला… म्हाताऱ्या आजीबाईंच्या पाया पडले. आणि एकही शब्द न बोलता तिथून निघून गेले. कल्पनाने सुटकेस उघडला आणि त्यात जे होतं ते पाहून दोघांचेही डोळेच विस्फारले… त्यामध्ये १००-१०० रुपयांच्या शेकडो नोटा होत्या… कदाचित त्या कल्पनाच्या लग्नासाठी असाव्यात… कदाचित त्या कल्पनाच्या अभ्यासासाठी असाव्यात. (Top Stories)
ते पैसे घेऊन आजीबाई थेट दरवाजाच्या बाहेर आली. पण आता तिथे कुणीच नव्हतं. फक्त अंधार होता… पावसाने अचानक आपला वेग वाढवला. तो धो-धो पडायला लागला. हवासुद्धा प्रचंड सुटली होती आणि पुन्हा एकदा दोघांच्या मुखावर प्रश्नचिन्ह होता.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics