Home » ‘नेदरलँड्स’ ठरला इच्छामरणाला परवानगी देणारा पहिला देश

‘नेदरलँड्स’ ठरला इच्छामरणाला परवानगी देणारा पहिला देश

by Team Gajawaja
0 comment
Netherland
Share

दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांचा, ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे.  अनंत महादेव निर्माते असलेल्या या चित्रपटाची कथा इच्छामरण या विषयाभोवती फिरणार आहे.  यापूर्वीही संजय सूरकर दिग्दर्शित या सुखांत चित्रपट याच विषयावरुन आलेला आहे.  इच्छामरण हा विषय आपल्याकडे वादाचा झाला आहे.  मात्र युरोपमध्ये यावर खुल्यापणानं चर्चा होत असून काही देशात अतिवेदनादायी आयुष्य असलेल्यांना इच्छामरण स्विकारता येत आहे. 

याचसंदर्भात आता नव्यानं चर्चा सुरु झाली आहे.  त्याला कारण ठरले ते नेदरलॅंडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन ऍगट आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू.  या दोघांनीही इच्छामरणद्वारे आपले आयुष्य संपवले.  दोघांनीही वयाची नव्वदी पार केली होती.  जवळपास सत्तर वर्षाचा त्यांचा संसार होता.  ड्राईस आपल्या पत्नीला प्रेमानं माय गर्लम्हणून हाक मारायचे.  त्याच माय गर्लचा हात हातात पकडून त्यांनी मृत्यूला जवळ केलं.  मरते दम तक अशी त्यांची प्रेमकहाणी आता चर्चेत आली आहे, ती त्यांच्या इच्छामरणामुळे.  असा मृत्यू चांगला की वाईट ही चर्चा सुरु आहे.  (Netherland)

नेदरलँड्सचे (Netherland) माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन ऍगट यांनी त्यांच्या पत्नीसह मृत्यूला कवटाळलं.  एकमेकांच्या हातात हात धरुन त्यांनी मृत्यूला जवळ केलं.  दोघंही 93 वर्षाचे होते.  ड्राईस व्हॅन ऍगट नेदरलँड्सचे 1977 ते 1982 पर्यंत पंतप्रधान होते.  ड्राईस आणि त्यांची पत्नी युजेनी व्हॅन एग्ट-क्रेकेलबर्ग हे दोघेही बऱ्याच काळापासून आजारी होते.  ड्राईस यांना 2019 मध्ये, ब्रेन हॅमरेज झाला होता.  त्यातून त्यांना सावरता आले नाही.  शिवाय त्यांच्या पत्नीही काही आजारानं त्रस्त होत्या.  यासर्वातून सुखानं मृत्यू व्हावा म्हणून दोघांनीही एकत्र इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली.  नेदरलॅंडच्या (Netherland)  कायद्यानुसार त्यांनी व्यक्त केलेली ही इच्छा पूर्ण करण्यात आली, आणि हे दोघंही एकमेकांचा हात हातात धरुन मृत्युला सामोरी गेले.

ड्राईस व्हॅन ऍग्ट हे नेदरलॅंडमध्ये अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होतं.  राजकारणाबरोबरच समाजकारणातही ते पुढे होते.  त्यांचा अशापद्धतीनं मृत्यू झाल्यावर पुन्हा एकदा इच्छामरणावर चर्चा सुरु झाली आहे.  जेव्हा एखादा रुग्ण दीर्घकाळ गंभीर आजाराने ग्रस्त असतो आणि बरा होत नाही तेव्हाच त्याला इच्छारणाचा अधिकार देण्यात येतो.  यासाठी युथनेशियाचा वापर होतो.  हे सामान्य भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वर्गातील औषध आहे. जेव्हा ते एखाद्याला खूप जास्त प्रमाणामध्ये दिले जाते, तेव्हा ते शरीरात केवळ भूलच देत नाही तर हृदय आणि श्वसन प्रणाली देखील थांबवते. त्यामुळे रुग्णाचा तात्काळ मृत्यू होतो.  ड्राईस व्हॅन ऍग्ट यांना आणि त्यांच्या पत्नीलाही याच औषधाचा डोस देण्यात आला होता.  ड्राईस व्हॅन ऍग्ट आणि त्यांची पत्नी युजेनी यांनी हा  इच्छामरण म्हणजे वेदनारहित मृत्यू‘ स्विकारल्यानंतर नेदरलॅंडमधील या कायद्याची माहिती घेण्यात येत आहे.  

2002 मध्ये, नेदरलँड्स (Netherland) इच्छामरणाला परवानगी देणारा पहिला देश ठरला.  रुग्णाच्या स्पष्ट विनंतीनुसार  डॉक्टरच त्या व्यक्तिला  योग्य प्रमाणात औषधाचा डोस देतात.  त्यानंतर काही क्षणातच त्या व्यक्तिचा मृत्यू होतो.   नेदरलॅंडमध्ये हा कायदा झाल्यानंतर अनेकांना इच्छामरण स्विकारले आहे.  एका अभ्यासानुसार 2022 मध्ये नेदरलँडमध्ये 29 जोडप्यांसह सुमारे 9,000 लोकांना इच्छामरण देण्यात आले.

=============

हे देखील वाचा : जपानमध्ये नेकेड फेस्टिवल अनोखा ठरणार…

=============

नेदरलॅंडमध्ये (Netherland) कायदा झाल्यावर इच्छामरणाला परवानगी देणाऱ्या देशांची संख्याही हळूहळू वाढली आहे.  बेल्जियम, नेदरलँड (Netherland) आणि लक्झेंबर्ग नंतर स्पेन मध्येही गंभीर आणि असाध्यआजार असलेल्या प्रौढांसाठी इच्छामरणाची परवानगी देण्यात आली आहे.   याबरोबरच गेल्या वर्षी मे मध्ये, पोर्तुगालने गंभीर आजार किंवा गंभीर दुखापतीमुळे अत्यंत त्रास सहन करणाऱ्या लोकांसाठी वैद्यकीय सहाय्याने मृत्यूची परवानगी दिली आहे.  स्वित्झर्लंडमध्येही अशीच परवानगी प्रौढ व्यक्तींबाबत देण्यात आली आहे.   

भारतातही या इच्छामरण संदर्भात अनेक चर्चा झाल्या आहेत.  मुंबईतील परिचारिका अरुणा शानबाग यांच्या प्रकरणामुळे भारतात इच्छामरण कायदेशीर करण्याच्या मोहिमेला वेग आला. अरुणा यांनी आयुष्यातील 42 वर्षे बेशुद्ध अवस्थेत घालवली.  यानंतर भारतातही इच्छारणाबाबत चर्चा सुरु झाली.  मात्र  भारतातील इच्छामरणावरील कायदा सक्रिय आणि निष्क्रिय इच्छामरणामध्ये फरक करतो.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.