Home » राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय – अमेय खोपकर

राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय – अमेय खोपकर

by Team Gajawaja
0 comment
Bhonga
Share

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ (Bhonga) चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संदीप देशपांडे आणि अमोल कागणे फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामण महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ चित्रपटाची कथा सामाजिक विषय हाताळणारी असून या चित्रपटाला राजकीय कलाटणी मिळत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारी भोंगा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला, मात्र मुंबई, पुणे, सातारा मधील काही चित्रपटगृहामध्ये या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटावर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

सामाजिक विषयाची मांडणी करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालणे हे नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे. मुंबई, पुणे, सातारा येथील स्थानिक पोलिस स्टेशनमधून थिएटर मालकांना फोन कॉल जात असून चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. हा सामाजिक विषय राजकीय पद्धतीने हाताळला जात आहे हे अत्यंत दुःखद बातमी आहे.

Watch Bhonga Full HD Movie Online on ZEE5

====

हे देखील वाचा: ‘तिरसाट’ चित्रपटाचा टीजर लाँच

====

चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमेय खोपकर यांनी काही वेळापूर्वीच ट्विट करत याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकाराबाबत असे म्हटले की, ‘जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेला आहे, तो भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावणे हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसत? राज्यसरकार हुकूमशहा सारखं वागतंय, भोंगा चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर काम करायला स्वतः गृहखातं सांगतय.’

तर चित्रपटाचे निर्माते अमोल लक्ष्मण कागणे यांनीही या प्रकाराबद्दल खंत व्यक्त करत असे म्हटले की, ‘सामाजिक विषय हाताळणाऱ्या कथेला राजकीय स्वरूप देणे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अशा चित्रपटाचा हा अपमान आहे असं मला वाटतं. मराठी चित्रपटांना थिएटर मिळणे, प्राईम टाईम मिळणं ही सर्वात मोठी बोंब असून मराठी चित्रपटनिर्माता स्वतःचे १००% देऊन चित्रपट निर्मिती करतो.

====

हे देखील वाचा: बालकलाकार स्वराली कामथेचं ‘जिप्सी’ चित्रपटातून पदार्पण

====

जर सरकारने वा पोलीसांनी महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना सहकार्य नाही केलं तर मराठी माणूस कुठे दाद मागणार? मराठी चित्रपटांना सपोर्ट नाही केलं तर मराठी भाषा टिकेल असे मला वाटते, नाहीतर मराठी चित्रपटाचं मार्केट आणि अस्तित्व बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खाऊन टाकायला वेळ नाही लागणार.’


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.