Home » Mount Everest : किंग कोब्रा आणि माऊंट एव्हरेस्टचे रहस्य !

Mount Everest : किंग कोब्रा आणि माऊंट एव्हरेस्टचे रहस्य !

by Team Gajawaja
0 comment
Mount Everest
Share

जगभरातील गिर्यारोहकांचे एकच स्वप्न असतं, ते म्हणजे, माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच पर्वतशिखराला पादाक्रांत करणे. नेपाळचे नागरिक या शिखरला सागरमाथा म्हणजेच स्वर्गाचे शिखर म्हणतात. तर तिबेटमध्ये आणि भारतामध्ये हे शिखर माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. जगभरातील अनेक गिर्यारोहक या माऊंट एव्हरेस्टला सर करण्यासाठी दरवर्षी नेपाळमध्ये येतात. याच सर्व गिर्यारोहकांना एक चिंतेत टाकणारी घटना नुकतीच घडली आहे. कारण जगातील या सर्वात उंच शिखराच्या जवळ आता जगातील सर्वात विषारी असा किंग कोब्रा नावाचा साप मिळू लागला आहे. गेल्या महिनाभरातच माउंट एव्हरेस्टजवळून 10 किंग कोब्रा ताब्यात घेण्यात आले आहेत. ही घटना निसर्गाच्या विरुद्ध मानली जाते. कारण या भागात प्रचंड थंडी असते. आत्तापर्यंत येथे कुठलाही साप वा अन्य कुठलेही सरपटणारे प्राणी सापडले नाहीत. पण अचानक येथे विषारी साप सापडल्यानं चिंता व्यक्त कऱण्यात आली आहे. हा बदलत्या हवामानाचा फटका असल्याचे अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी सापडत असलेल्या या सापांमुळे गिर्यारोहकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (Mount Everest)

माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच हिमशिखरावर चढण्यासाठी नेपाळच्या काठमांडूमध्ये दरवर्षी अनेक गिर्यारोहक येतात. हे गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी जिथे कॅम्प करतात, तिथूनच आता विषारी साप सापडू लागले आहेत. गेल्या दीड महिन्यात या भागातून 10 विषारी साप पकडण्यात आले. त्यात 9 किंग कोब्रा आणि 1 मोनोकल कोब्रा यांचा समावेश आहे. हे साप काठमांडू येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे हवामान तज्ञही आश्चर्यचकीत झाले आहेत. हे साप सामान्यतः उष्ण आणि सपाट भागात आढळतात. मात्र आता माउंट एव्हरेस्टपासून फक्त 160 किमी अंतरावर किंग कोब्रा सापडल्यानं या भागात उभाऱण्यात आलेल्या गिर्यारोहकांच्या कॅम्पबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Latest News)

गुपालेश्वर, भांज्यांग, सोखोल आणि फुलचौक सारख्या डोंगराळ भागातून हे साप मोठ्या संख्येनं असल्याचे आढळून आले. किंग कोब्रा, येथील निवासी भागातही साप आढळून आल्यानं रहिवाशांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. यापेक्षा चिंतेची गोष्ट म्हणजे, या भागात सापांची अंडीही मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. त्यामुळे आत्ताही असेच अनेक विषारी साप या भागात असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या सापांच्या जीवनशैलीमध्ये झालेला हा बदल पर्यावरण तज्ञांना चिंतेत टाकणार आहे. त्यांच्यामते बदलत्या हवामानामुळे या सापांनी आपले रहाण्याचे ठिकाण बदलले आहे. या थंड हवामानात रहाण्यासाठी त्यांनी आपल्याला अनुकूल केल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. नेपाळच्या डोंगराळ आणि पर्वतीय जिल्ह्यांमध्ये हवामान बदलाचा मोठा परिणाम झाला आहे. येथील कमाल तापमान दरवर्षी 0.05 अंश सेल्सिअसने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळेच सरपटणारे प्राणी या भागातही रहात आहेत. पण या भागात आलेल्या विषारी सापांचा मोठा धोका माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आलेल्या गिर्यारोहकांना बसण्याची भीती आहे. (Mount Everest)

नेपाळमध्ये दरवर्षी सर्पदंश होणा-यांची संख्या मोठी आहे. सुमारे 2700 लोकांना सर्पदंश होतो. त्यात महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. मात्र आता हेच साप एव्हरेस्टच्या पायथ्याशीही आल्यानं सर्पदंशाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नेपाळ सरकारने 2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 50% घट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी डोंगराळ भागात उपचार केंद्रेही उघडण्यात आली आहेत. शिवाय भारतातून क्वाड्रीव्हॅलेंट अँटी-वेनम आयात केले आहे. हे विषारी सर्पदंशावर सर्वात प्रभावी औषध मानले जाते. मात्र या सर्वात गिर्यारोहकांच्या या भागातील कॅम्पबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याशिवाय एवढ्या मोठ्या संख्येनं सर्प या भागात कसे आले, याचा शोधही घेण्यात येत आहे. (Latest News)

=============

हे ही वाचा : Atefeh Sahaaleh : या तरुणींचा शाप लागला इराणला ?

Israel And Iran War : अमेरिकेच्या हल्ल्याने जगभरात चिंता !

============

सर्पतज्ञ सुबोध आचार्य यांच्या मते, या भागात जे तंबू उभारण्यात येतात, त्यासाठी जे लाकूड आणण्यात येतं, त्याच लाकडातून हे विषारी साप या भागात आले आणि त्यानंतर त्यांनी या भागातील हवामानाशी जुळवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे याशिवाय काही गिर्यारोहकांनीच या भागात सर्प आणून सोडले आहेत, अशी शंकाही व्यक्त कऱण्यात आली आहे. किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. एका सापाचा एक चावा, 20 लोक किंवा एका हत्तीला मारण्यासाठी पुरेसा असतो. नेपाळच्या ‘नॅशनल रेड डेटा बुक’ आणि आंतरराष्ट्रीय ‘आययूसीएन रेड लिस्ट‘ मध्ये किंग कोब्राला धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे. वाढ पूर्ण झालेला किंग कोब्रा हा 18 फूट लांब असू शकतो. हा साप अत्यंत घातक न्यूरोटॉक्सिन तयार करतो, जो शिकाराच्या मज्जासंस्थेला तात्काळ निष्क्रिय करतो. सामान्यतः हा साप भारत, आग्नेय आशिया आणि फिलीपिन्समधील घनदाट, उष्ण आणि डोंगराळ जंगलात आढळतो. हाच साप आता काठमांडूसारख्या उंच भागात सापडू लागल्यानं चिंतेचा विषय झाला आहे. (Mount Everest)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.