18 डिसेंबर 2012, जोधपूर शहरातली एक शांत सकाळ. लोक आपल्या रोजच्या कामात मग्न होते. कोणी चहा टपरी वर मित्रांसोबत गप्पा मारतंय, कोणी न्यूज पेपर वाचतंय, तर कोणी आपलं दुकान उघडतंय. सगळं अगदी नेहमीसारखं, शांत आणि निवांत. पण अचानक, या शांत सकाळी, एक प्रचंड, कानठळ्या बसवणारा स्फोटासारखा आवाज संपूर्ण जोधपूर शहरात घुमतो! हा आवाज इतका भयंकर होता की लोक थक्क झाले. काहींना वाटलं, कुठेतरी मोठा बॉम्बस्फोट झालाय. काही लोक घाबरून घरातून बाहेर पळाले, तर काही काय झालंय हे समजायचा प्रयत्न करू लागले. पण इथे सगळ्यात विचित्र गोष्ट अशी की, हा प्रचंड आवाज आल्यानंतर काहीच दिसलं नाही! कुठे धूर नाही, कुठे आग नाही, कोणती इमारत पडलेली नाही, आणि पोलिस किंवा फायर ब्रिगेडही कुठे दिसत नाहीत. (Jodhpur)
आकाश स्वच्छ, नीळं, अगदी नॉर्मल. मग हा प्रचंड आवाज आला कुठून? आणि हा आवाज फक्त जोधपूरच्या एखाद्या कॉलनीत किंवा गल्लीत नाही, तर पूर्ण शहरात, एकाच तीव्रतेने ऐकू आला होता. लोकांनी सांगितलं, जणू काही आकाशातूनच हा आवाज आला. घरांच्या खिडक्या हादरल्या, पक्षी घाबरून आकाशात उडायला लागली. पण काय झालं, हे कोणालाच कळेना. आणि विशेष म्हणजे, असा हा रहस्यमय आवाज फक्त जोधपूरमध्येच नाही, तर 2012 च्या सुमारास जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात – अमेरिका, युके, इटली, फिलिपिन्स – ऐकू आला होता. मग जोधपूरच्या आवाजाच रहस्य काय होतं? जोधपुर बूम बद्दल जाणून घेऊ. (Top Stories)
आता ही घटना घडली तेव्हा जोधपूरमधले लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी ऑफिसला निघालं होतं, कोणी बाजारात चाललं होतं, तर कोणी घरात आरामात बसलं होतं. आणि तेवढ्यात, सकाळी साधारण 9:30 च्या सुमारास, हा भयंकर आवाज आला. लोकांनी सांगितलं, जणू काही आकाश फाटलंय की काय! काहींना वाटलं, जवळच कुठेतरी मोठा स्फोट झालाय. पण जेव्हा लोकांनी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा काहीच दिसलं नाही. ना धूर, ना आग, ना कोणताही नुकसान. मग प्रश्न पडतो, जर हा आवाज इतका मोठा होता, तर त्याचं कारण काय? (Jodhpur)
काही लोकांनी लगेच अंदाज लावला की हा “सोनिक बूम” असावा. सोनिक बूम म्हणजे काय? जेव्हा एखादं विमान आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगानं, म्हणजे सुपरसॉनिक गतीनं उडतं, तेव्हा हवेत एक शॉक वेव्ह तयार होते, आणि त्यातून प्रचंड मोठा आवाज येतो. पण इथे एक मोठी गडबड आहे. त्या वेळी जोधपूरच्या आकाशात भारतीय हवाई दलाचं किंवा कोणतंही सिव्हिल विमान सुपरसॉनिक गतीनं उडालं नव्हतं. जोधपूर विमानतळ किंवा हवाई दलाकडूनही याबाबत कोणतंही स्टेटमेंट आलं नाही. मग जर विमानच नव्हतं, तर सोनिक बूम कुठून आला?. (Top Stories)
मग काही तज्ज्ञांनी असं म्हटलं की हा आवाज कदाचित भूकंपामुळे आला असेल. म्हणजे असा भूकंप, जो जमिनीच्या खूप खोलवर घडला, ज्यामुळे जमिनीवर कंपनं जाणवली नाहीत, पण आवाज ऐकू आला. पण यातही प्रॉब्लेम आहे. भूकंप मोजणाऱ्या सिस्मोग्राफ मशिन्सवर त्यावेळी काहीच नोंदलं गेलं नाही. म्हणजे भूकंप झालाच नव्हता, आणि जमिनीवर कोणतेही हादरे जाणवले नव्हते. मग भूकंपाची थियरीही फेल झाली.
आता काही लोकांनी याला “स्काय क्वेक” असं नाव दिलं. हे स्काय क्वेक म्हणजे काय? ही एक अशी रहस्यमय गोष्ट आहे, जिथे काहीही दिसतं नसताना, स्फोटासारखा मोठा आवाज आकाशातून येतो. असं यापूर्वीही जगात काही ठिकाणी घडलंय. 1977 मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर, 1991 मध्ये युकेतल्या उत्तर समुद्रात, आणि 2010 च्या दशकात इतर काही ठिकाणीही असे आवाज ऐकू आले होते. शास्त्रज्ञ सांगतात की, हे आवाज वातावरणातल्या दाबात अचानक होणाऱ्या बदलांमुळे किंवा उल्का तुटल्यामुळे येऊ शकतात. पण जोधपूर बूमचं नेमकं कारण काय, हे आजही स्पष्ट नाही. (Jodhpur)
आता इथे आणखी एक मजेदार थियरी आली. तर ती थियरी अशी की, हा आवाज “ऑरोरा” नावाच्या secret हायपरसॉनिक विमानाच्या चाचणीमुळे आला असेल. काहींनी तर “हर्प” प्रकल्पाचा उल्लेख केला, ज्यामुळे हाय-फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्ह्सनी हवामान किंवा भूकंपीय गोष्टी नियंत्रित केल्या जाऊ शकतात, असं मानलं जातं. त्या काळात अमेरिका, रशिया, चीन असे देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत होते. मग असं असू शकतं का की जोधपूरच्या आकाशात अशी काही गुप्त चाचणी झाली? पण भारतीय सरकारनं याबाबत कधीच कोणतीही official माहिती दिली नाही, त्यामुळे या सगळ्या फक्त शक्यता राहिल्या.
==================
हे देखील वाचा : Japan : अजबच… जपानमध्ये वाढतोय गायब होण्याचा ट्रेण्ड !
==================
आणि मग आली एक सगळ्यात वेगळी आणि Interesting थियरी – aliens ! होय, काही लोकांनी हा आवाज aliens शी जोडला. काहींनी असं म्हटलं की हा आवाज एखाद्या UFO च्या सोनिक बूममुळे आला असेल. तेव्हा अशा ही बातम्या पसरल्या होत्या की UFO पृथ्वीच्या वातावरणात येत-जात असतात. जर एखादं यान प्रकाशाच्या वेगाने फिरत असेल, तर असा आवाज येणं शक्य आहे का? पण यालाही कोणताच ठोस पुरावा नाही. (Top Stories)
2012 मध्येच मायन कॅलेंडरच्या भविष्यवाणीमुळे जगभरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांना वाटत होतं की 21 डिसेंबर 2012 ला जगाचा अंत होणार आहे. आणि हा जोधपूर बूम फक्त तीन दिवस आधी, 18 डिसेंबरला घडला. मग काही लोकांना वाटलं, हा आकाशातून आलेला सिग्नल आहे. शास्त्रज्ञांनी सांगितलं की मायन कॅलेंडरचा शेवट हा फक्त एक चक्राचा अंत आहे, पण लोकांच्या मनात भीती बसली होती. मग हा जोधपूर बूम खरंच काही नैसर्गिक घटना होती, की काहीतरी अजून ? (Jodhpur)
सोनिक बूम नाही, कारण विमान नव्हतं. भूकंप नाही, कारण त्याचा पुरावा नाही. स्काय क्वेक एक शक्यता आहे, पण त्याचंही पक्कं उत्तर नाही. सैन्य चाचणी किंवा UFO? त्यालाही पुरावा नाही. मग हा आवाज नेमका कशामुळे आला. आजही जोधपूर बूम हे एक न सुटलेलं रहस्य आहे जे आजही गूढ आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा !
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics