Home » Olympics History : पलीस्तिनी दहशतवाद्यांनी इस्राईलच्या ११ खेळाडूंना मारलं !

Olympics History : पलीस्तिनी दहशतवाद्यांनी इस्राईलच्या ११ खेळाडूंना मारलं !

by Team Gajawaja
0 comment
Olympics History
Share

अधूनमधून आपण बातम्यांमध्ये इस्रायल पॅलेस्टीनच्या बातम्या सारख्याच ऐकत असतो. पण या दोन्ही देशांचा वाद हा आताचा नाहीये, तर त्यामागे एक हजार वर्षाचा इतिहास आहे. याच दोन्ही देशांच्या वादाच्या इतिहासात एक भयंकर घटना घडली होती. जी घटना आज म्युनिक हत्याकांड नावाने ओळखली जाते. ज्यात आठ पॅलेस्टीनच्या ब्लॅक सप्टेंबर या अतिरेकी संघटनेने इस्रायलच्या ११ प्लेयर्सला ठार मारलं होतं आणि इतिहासात पहिल्यांदा ऑलिम्पिक्स सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्या ११ प्लेयर्सचा बदला घेण्यासाठी इस्रायलने रॅथ ऑफ गॉड मिशन चालवलं, जे तब्बल २० वर्ष चाललं. ऑलिम्पिक्स म्युनिक हत्याकांड आणि म्युनिक मध्ये ठार झालेल्या ११ प्लेयर्स बदला म्हणून सुरु असेललं रॅथ ऑफ गॉड मिशन. चला तर मग जाणून घेऊ. (Olympics History)

कथेची सुरुवात होते ५ सप्टेंबर १९७२ पासून, वेस्ट जर्मनीतल्या म्युनिक शहरात समर ऑलिम्पिक्स सुरू होतं. या मध्ये इस्रायलसोबत १२२ देशांचे प्लेयर्स खूप मेहनत करून आपापल्या देशांना मेडल्स मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते. १९३६ मध्ये वेस्टमध्ये जर्मनी समर ऑलिम्पिक्स नाझी हुकुमशहा अडोल्फ हिटलर याच्या नेतृत्वाखाली झालं होतं. म्हणून १९७२ मध्ये वेस्ट जर्मनी आक्रमक राष्ट्रवादाच्या विरुद्ध होता आणि पहिल्यांदाच स्वत:ला शांतिप्रिय देश म्हणून प्रेसेंट करत होता. याच गोष्टीमुळे आयोजकांनी या ऑलिम्पिकला ‘गेम्स ऑफ पीस अँड जॉय’ असं नाव दिलं. आता जर्मनीचा हाच डिसिजन जास्तच महागात पडला. म्हणजे झालं असं की, गेम्स ऑफ पीस अँड जॉयमुळे ऑलिम्पिकमध्ये मोकळं आणि फ्रेंडली वातावरण ठेवण्यासाठी हाय सिक्युरिटी सुरक्षेची व्यवस्था केली नव्हती आणि याचा फायदा पॅलेस्टिनीने घेतला. पॅलेस्टिनीच्या ब्लॅक सप्टेंबर या दहशतवादी संघटनेने एक भयंकर कट रचला. ते एकूण ८ अतिरेकी होते. त्यांचा उद्देश होता की, इस्रायली प्लेयर्सना ताब्यात घेतलं तर ते इस्रायल सरकारवर दबाव टाकतील आणि इस्रायलच्या तुरुंगात बंद असलेल्या २३४ पॅलेस्टिनी कैद्यांना त्यांना सोडवता येईल. (Top Stories)

Olympics History

५ सप्टेंबर १९७२ ची पहाटे ४:३० ची वेळ होती. ब्लॅक सप्टेंबरचे आठ दहशतवादी इतर प्लेयर्ससारखे ट्रॅकसूट घालून १० फूट उंचीवरून उडी मारून हॉस्टेलमध्ये घुसले. आता सगळ्यांची नजर चुकवून आठही जण आत शिरले होते. त्यांना आत सुरक्षा कर्मचारी दिसले पण त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना वाटलं की हे प्लेयर्सच आहेत. मग पुढे चालत ते आठ जण इस्रायली प्लेयर्सच्या रुमजवळ पोहोचले. त्यांनी रायफल्स व हँड ग्रेनेड्स हातात घेतले आणि इस्रायली प्लेयर्सच्या एका रूमचा दरवाजा तोडला. तेव्हा समोर इस्रायली कुस्ती रेफरी योसेफ गट फ्रॉयड आणि ट्रेनर मोशे व्हाइनबर्ग रूममध्ये त्यांना दिसले. त्या दोघांनी परिस्थिती ओळखली आणि त्या दहशतवाद्यांशी त्यांची झटापट झाली आणि इतर इस्रायली प्लेयर्सना पळून जायला सांगितलं. त्यांच्या आवाजाने काही प्लेयर्स दुसर्‍या कंपाऊंडमध्ये पळाले. वेटलिफ्टर योसेफ रोमानोने सुद्धा त्यांच्याशी दोन हात करायचा प्रयत्न केला, पण त्यातच त्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, ज्यामुळे रोमानो आणि व्हाइनबर्ग यांचा जागीच मृत्यू झाला, तर गट फ्रॉयडला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या दहशतवाद्यांनी एकूण नऊ इस्रायली प्लेयर्सना पकडलं. (Olympics History)

आता त्या दहशतवाद्यांनी २३४ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडण्याची मागणी केली आणि तसं नाही केलं, तर त्या ९ प्लेयर्सना मारून टाकू अशी धमकी दिली. जर्मन सरकारने तेव्हाचे इस्रायली पंतप्रधान गोल्डा मायर यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी दहशतवाद्यांच्या मागण्या मानण्यास नकार दिला आणि प्लेयर्सच्या सुटकेसाठी जर्मन सरकारकडे सिक्रेट ऑपरेशनसाठी परवानगी मागितली. पण एवढी मोठी घटना घडूनसुद्धा ऑलिम्पिक समितीने शो मस्ट गो ऑन म्हणत गेम्स सुरूच ठेवले. त्यामुळे जर्मन सरकारने इस्रायलला ऑपरेशनची परवानगी दिली नाही, पण त्यांनी इतर इस्रायली खेळाडूंना काहीही होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं.

==============

हे देखील वाचा :  Trinetra Ganesha Temple : भारतातील सर्वात प्राचीन गणेश मंदिर !

==============

दहशतवाद्यांच्या मागण्या फेटाळल्यानंतर दहशतवाद्यांनी मग नवीन मागणी केली, ज्यात त्यांनी एका विमानाची मागणी केली. ज्यात ते ताब्यात घेतेल्या ९ प्लेयर्सना इजिप्तच्या कैरोला घेऊन जाऊ शकतील. आता जर्मन सरकारने त्यांची ही मागणी मान्य केली आणि त्या ९ प्लेयर्सच्या सुटकेसाठी ऑपरेशनची एक योजना आखली. यात असं ठरलं की, दहशतवादी विमानात चढायला जेव्हा हेलिकॉप्टरमधून उतरतील, तेव्हा जर्मन स्नायपर्स त्यांना टार्गेट करतील. पण जर्मन सरकारला दहशतवाद्यांची एक्जॅक्ट संख्या माहित नव्हती. त्यांना फक्त पाच दहशतवाद्यांचा अंदाज होता, पण रिअॅलिटीमध्ये एकूण आठ होते. या चुकीच्या माहितीवर पाच जर्मन स्नायपर्स फर्स्टनफेल्डब्रक एअरपोर्टवर पोजिशन घेऊन थांबले होते. काही वेळाने दोन हेलिकॉप्टर्स दहशतवादी आणि त्या इस्रायली प्लेयर्सना घेऊन एअरपोर्टवर पोहोचले. दोन दहशतवादी विमान चेकिंग पुढे गेले, पण तिथे कोणीच नव्हतं आता त्यांना काहीतरी संशय आला म्हणून ते हेलिकॉप्टरकडे परत धावले. तेवढ्यात जर्मन स्नायपर्सनी गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. शेवटी एका दहशतवाद्याने त्या प्लेयर्सच्या हेलिकॉप्टरवर बॉम्ब फेकला, ज्यामुळे स्फोट होऊन ते ९ प्लेयर्स ठार झाले. या चकमकीत जर्मन स्नायपर्सनी पाच दहशतवाद्यांना ठार केलं आणि तर तिघांना जिवंत पकडलं. (Olympics History)

आता ११ प्लेयर्सच्या मृत्यूमुळे जगभरात खळबळ उडाली. त्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी अशा मागण्या व्हायला लागल्या. ते तिघेही म्युनिकमधल्या तुरुंगात होते. पण काहीच दिवसांनी २९ ऑक्टोबरला लुफ्थान्सा फ्लाइट 615 हायजॅक झालं आणि हायजॅकर्सने त्या तीन दहशतवाद्यांची ते म्हणजे जमाल अल-गशी, अदनान अल-गशी आणि मोहम्मद सफादी यांच्या सुटकेची मागणी केली. जर्मन सरकारला या वेळी मागणी मान्य करावी लागली.

आता इथे प्रश्न असा की मग त तीन दहशतवादी मोकाट सुटले का? तर झालं असं इस्रायलच्या मनात त्या निष्पाप ११ प्लेयरर्सच्या खुनाचा बदला काही केल्या घ्यायचाच होता आणि त्यानंतर त्या ११ प्लेयर्सना श्रद्धांजली म्हणून सुरु झालं मोसादच्या अंडर सुरु झालं इस्रायलचं ऑपरेशन ज्याचं नाव होतं ‘रॅथ ऑफ गॉड’, जे पुढे २० वर्ष चाललं, आता या रॅथ ऑफ गॉडमध्ये काय घडलं? ते दहशतवादी पकडले गेले का? हे जाणून घेऊया पुढच्या आर्टिकलमध्ये.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.