Home » Mursi Tribe : जगातील सर्वात Unique आदिवासी जमाती आणि त्यांच्या प्रथा..

Mursi Tribe : जगातील सर्वात Unique आदिवासी जमाती आणि त्यांच्या प्रथा..

by Team Gajawaja
0 comment
Mursi Tribe
Share

आगीसाठी दगडावर दगड घासण्यापासून तीच आग विझवण्यासाठी फायर एक्सटिंगीशर निर्माण करण्यापर्यंत, या दोन टोकांमध्ये आपण माणूस म्हणून किती प्रगत झालो हे कळतं. पण या जगात आजही अशा आदिवासी जमाती आहेत, ज्या आजही अश्मयुगीन काळात माणूस जसा राहायचा, तसेच ते राहतात. अनेक वर्ष जुन्या त्यांच्या परंपरा त्यांनी आजही जोपासल्या आहेत. ओठांमध्ये आणि कानाला प्लेट्स अडकवणं, आणि स्वतःच्या शरीराला  कॅनव्हास समजणं, लढाई करणं, अशा काही त्या परंपरा आहेत. जगातील सर्वात अनोख्या आदिवासी जमातींबद्दल आहे आणि त्यांच्या कल्चरबद्दल अधिक जाणून घेऊ. (Mursi Tribe)

इथिओपियाच्या ओमो नदीच्या खोऱ्यात राहते मुर्सी ही आदिवासी जमात. पूर्णपणे निसर्गावर जगणाऱ्या या मुर्सी लोकांची संख्या आता कमी राहिली असली, तरी जमातीच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा आणि परंपरा ते अजूनही टिकवून आहेत. मुर्सी जमातीत वयात आलेल्या तरुणींसाठी एक पारंपरिक प्रथा आहे, ज्यात त्यांना ओठात आणि कानात लाकडी किंवा मातीची प्लेट घालण्याची पद्धत आहे. हीच पद्धत सूरी आणि इतर आफ्रिकन आदिवासी जमातींमध्येही फॉलो केली जाते. आफ्रिकन आदिवासी जमातीतल्या मुलींना वयात आल्यावर, मासिकपाळी आल्यानंतर ओठात मोठ्या प्लेट्स घालण्यासाठी त्यांच्या खालच्या ओठाचा काही भाग कापावा लागतो. हे काम त्या मुलीच्या आई आणि जमातीतील इतर वृद्ध महिलांकडून केलं जातं. त्यांचे ओठांमध्ये झालेली जखम भरून येईपर्यंत आणि ते ओठं चिपकू नये यासाठी त्यांच्या ओठात लाकडी तुकडा ठेवून ती जखम उघडी ठेवली जाते. (Mursi Tribe)

या प्लेट्स सामान्यत: हलक्या लाकडापासून किंवा चिकणमातीने तयार केल्या जातात आणि त्यांना ‘लॅब्रेट’ असं म्हणतात. काही वेळा हे ‘लॅब्रेट’ नक्षी काढून सजवली जातात, तर कधी त्यात धातू किंवा चमकदार खड्यांचा वापर केला जातो. काही जमातींमध्ये हे लॅब्रेट वरच्या ओठात, काहींमध्ये खालच्या ओठात, तर काहींमध्ये दोन्ही ओठात घालतात. त्या प्लेट्सचा आकार वयानुसार वाढवण्यात येतो किंवा मुलींच्या इच्छेनुसारही. तेव्हा त्यांच्या लोअर लिपजवळ असलेल्या दोन दातांना तोडलं जातं. प्लेट्समुळे या महिलांचे ओठ देखील ताणले जातात. पण या प्रथेचं या जमातींमध्ये इतकं महत्त्व का आहे. तर आदिवासी जमातींमध्ये ओठातली प्लेट्स त्या मुलीच्या सौंदर्याचा आणि तिच्या घरच्यांच्या आर्थिक स्थितीचा दाखला देते. या प्लेट्स जितक्या मोठ्या असतात, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्या मुलीच्या वडिलांना हुंड्यामध्ये जनावरांची मागणी करता येते. (Mursi Tribe)

ही प्रथा कशी सुरू झाली याची माहिती कुठे नाही. पण असं बोललं जातं की, मुलीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली असावी. ओठं ताणून प्लेट बसवण्यासाठी झालेली शारिरीक वेदना, ती जखम हे सगळं स्त्री सहन करते. तिच्या धैर्य आणि कणखरपणामुळे ती संसार आणि मातृत्वाची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचं दाखवते.

=================

हे देखील वाचा : Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांना करावा लागू शकतो ‘या’ आजारांचा सामना

=================

आफ्रिकेतील अशाच एका आदिवासी जमातीतील महिला त्यांच्या त्वचेवर पेंट करून ते कलेद्वारे स्वतःला व्यक्त करतात. तसंच एका जमातीतील लोकं डोंगा” नावाच्या लढाईत सहभागी होतात. ही लढाई लाकडी दांड्यांनी केली जाते. ही लढाई इतकी धोकादायक असते की, अनेक वेळा लढणाऱ्यांची मृत्यूही होते. पारंपरिकपणे, या लढाईद्वारे येथील पुरुष महिलांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात आणि शरीरावर असणाऱ्या जखमा या शूरतेचं प्रतीक असतं. पण अलीकडच्या काळात ही परंपरा आणखी हिंसक होत चालली आहे असं कळतं. कारण अनेक जमातींमध्ये आता बंदुका खास करून ak 47 वापरायला सुरुवात झाली आहे. (Mursi Tribe)

इतक्या आधुनिक काळात सुद्धा आफ्रिकेतील या आदिवासी जमाती या थोड्या का असेना पण अमानवी प्रथा जोपासत आहेत. पण त्या कोणी सुधारू ही शकत नाही कारण बाहेर जगातील लोकांना ते त्यांच्या समूहात जास्त Involve होऊन देत नाहीत.

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.