नव्वदीची पिढी असो किंवा आताची… ‘द लायन किंग’ माहित नसावं, असा एकही व्यक्ती नसेल. कारण सिम्बा, मुफासा, राफिकी, टीमोन, पुम्बा, झाझू असे कितीतरी Characters आजही आपल्या डोक्यात फिट आहेत. त्याच मुव्हीमध्ये अजून एक व्हिलन character होता. तो म्हणजे स्कार ! एका लढाईत त्याच्या तोंडावर एक जखम होते, ज्यामुळे त्याचं नाव स्कार असं पडतं. पण ही झाली सिनेमाची काल्पनिक बाजू… पण खऱ्या आयुष्यातही एक असाच स्कारफेस नावाचा जगातला सर्वात मोठा सिंह झाला होता, ज्याने तब्बल १३० सिंहांना Combat Fight मध्ये मारलं होतं. त्याने ४०० तरस फाडून टाकले होते. पाणगेंडा आणि मगरींसारख्या महाकाय प्राण्यांनाही तो नडायचा. इतका दरारा असणारा हा स्कारफेस कोण होता ? जाणून घेऊ. (Scarface)
केनियामधलं मसाईमारा जंगल हे वाईल्डलाईफसाठी पोषक असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या जंगलांपैकी एक मानलं जातं. मसाई ही आफ्रिकेतली भटकी जमात… याच जमातीवरून या जंगलाला मसाई मारा असं नाव पडलं. आता इथल्या प्राण्यांची संख्या सांगायची झाली तर इथे ३० हजार हत्ती, २५०० जिराफ, २ लाखांच्या आसपास झेब्रा, याव्यतिरिक्त गेंडे, पाणगेंडे, चित्ते, तरस, रानडुक्कर… आणि ६०० एक सिंह आहेत. याच सिहांमध्ये जन्माला आलेला एक ग्रेट सिंह म्हणजे स्कारफेस ! आपल्या लीडरशिप, हंटिंग स्किल्स, battles आणि सर्व्हायवल स्किल्ससाठी तो जगप्रसिद्ध होता आणि मसाई माराच्या जंगलांवर त्याने कित्येक वर्ष राज्य केलं. (Information)
२००७ साली त्याचा जन्म झाला होता. स्कारफेस हे नाव यामुळे पडलं, कारण २०१२ साली एका टेरीटोरीअल फाईटमध्ये त्याच्या डोळ्यावर जखम झाली होती, ज्यामध्ये त्याचा उजवा डोळा जवळपास बाद झाला होता. या जखमेमुळेच त्याला स्कारफेस हे नाव पडलं. भारताच्या रणथंबोर टायगर रिझर्व्हमध्ये एक मछली नावाची वाघीण होती, जी जगातली सर्वात जास्त फोटो काढण्यात आलेली वाघीण होती. त्याचप्रमाणे आफ्रिकेत सर्वात जास्त फोटो काढण्यात आलेला सिंह म्हणजे स्कारफेस ! स्कारफेसचे तीन भाऊ होते, ते म्हणजे मोरानी, हंटर आणि सिकीओ… महत्त्वाचं म्हणजे अनेकदा ते एकत्र राहायचे. (Scarface)
त्यांनी तब्बल १ लाख एकरच्या परिसरात आपला जम बसवला होता. त्यांच्यामध्ये सर्वात शक्तिशाली स्कारफेसच होता. आपल्या रायव्हल सिंहांना मारत त्यांनी इतकी मोठी टेरीटरी उभारली होती. मसाई माराच्या इतिहासात आजपर्यंत एकत्र असलेल्या सिंहांनी एवढ्या मोठ्या जागेवर कधीच राज्य केलं नव्हतं. स्कारफेसने आणखी एक रेकॉर्ड केला होता, तो म्हणजे सर्वाधिक फाईट करण्याचा… समोर तरसांचा कळप असो, पाणगेंडा असो, मगर असो, किंवा खुद्द एक तगडा सिंह. तो सर्वांनाच तोंड द्यायचा आणि हरवायचासुद्धा… असं सांगितलं जातं की, टेरीटोरीअल फाईटमध्ये त्याने १३० सिंहांना मारलं होतं. तर ४०० तरसांचा फडशा पाडला होता. एकही लढाई तो हरला नव्हता.
=================
हे देखील वाचा : Masan Holi 2025 : ‘मसान की होली’ची सुरुवात नेमकी कधी झाली ?
=================
या फाईटसमध्ये त्याला भरपूर इंजरी झाल्या होत्या. मात्र उत्तम सर्व्हायवल स्किल्समुळे तो अशा सर्व गोष्टींमधून बचावला. स्कारफेसवर बऱ्याच डॉक्युमेंटरी बनवण्यात आल्या होत्या. ‘स्कारफेस-द राईज ऑफ लिजेंडरी लायन’, बिग कॅट विक, लायन्स-स्पाय इन द डेन, बिग कॅट डायरी अशा अनेक डॉक्युमेंटरीमध्ये तो झळकला होता. तो जगातला एकमेव सिंह होता, ज्याचा एक सेपरेट फेसबुक पेज आहे. सिंह साधारण १० ते १४ वर्षच जगतात आणि स्कारफेसनेही १४ वर्ष मसाई माराच्या जंगलांवर राज्य केलं. ११ जून २०२१ साली वयाच्या १४व्या वर्षी स्कारफेसला नैसर्गिक मरण आलं. कित्येक सिंह टेरीटोरीअल battles मध्ये मरण पावतात, पण शेकडो फाईटस करून नैसर्गिक मृत्यू मिळणारा स्कारफेस हा एकमेवच… सध्या त्याचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. आज त्याला जाऊन ४ वर्ष झाली तरी Animal kingdom मध्ये त्याचा दबदबा कायम आहे.