Home » Marine Drive एका ‘मराठी’ माणसाने बांधलय !

Marine Drive एका ‘मराठी’ माणसाने बांधलय !

by Team Gajawaja
0 comment
Marine Drive
Share

आयशा, तुम्हे बॉम्बे बारिश में देखना चाहिए। मैं घंटो तक समुंदर को देख सकता हूं!” वेक अप सिडमध्ये सिडने आयशाला हे वाक्य म्हटल्यावर आपल्यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर पावसातली मुंबई specially पावसाळ्यात दिसणारं मरीन ड्राईव्ह आठवलं असेल? हो ना… रात्रीच्या वेळी रत्नांच्या हारासारखा चमकणारा हा रस्ता फक्त रस्ता नाही, हे एका मराठमोळ्या माणसाच्या कष्टाचं चीज आहे ! हो , कारण हे मरीन ड्राईव्ह बांधण्यात एका मराठी माणसाचा वाटा आहे! ? ज्यांनी अरबी समुद्राला मागे हटवून हा चमत्कार घडवला. पण यामागे काय कथा आहे? कसं साकारलं गेलं मरीन ड्राईव्ह ? हे जाणून घेऊ. (Marine Drive)

1915 ची ती एक साधी संध्याकाळ होती. मुंबई, तेव्हा बॉम्बे होतं आणि ते इंग्रजांच्या ताब्यातं होतं. पण इथली गोष्ट त्यांच्या ताब्यात नव्हती ते म्हणजे इथलं हवामान. इंग्रज अधिकाऱ्यांना इथली गरम, दमट हवा सहन होत नव्हती. थंड हवेची सवय असलेले ब्रिटिश या हवामानामुळे आजारी पडू लागले. या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मोकळी, ताजी हवा खायला मिळावी म्हणून मग एक आयडिया आली – समुद्राच्या किनाऱ्यावर एक मस्त रस्ता बांधायचा, जिथे मोकळी ताजी हवा मिळेल, आणि मुंबईला एक नवं रूप येईल. पण ही आयडिया प्रत्यक्षात आणायची कशी? इथेच आले एक मराठमोळे इंजिनिअर – नानासाहेब मोडक! (Nanasaheb Modak)

1890 साली जन्मलेले, मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले. शिक्षण पूर्ण होताच त्यांनी बॉम्बे म्युनिसिपालिटीमध्ये कामाला सुरुवात केली. त्यांचं डोकं इतकं तल्लख होतं की इंग्रज अधिकारीही त्यांच्या सल्ल्याशिवाय एक पाऊल टाकत नसत! म्हणूनच मग नानासाहेब, ब्रिटिश अधिकारी आणि इंजिनियर्स यांनी सोबत एक प्लॅन आखला. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉईंटपर्यंतच्या अरबी समुद्राला मागे हटवून एक रस्ता बांधायचा. प्रस्ताव मांडण्यात आला आणि 1915 साली इंग्रजांनी मरीन ड्राइव बांधायचं ठरवलं, तेव्हा त्याचं नाव होतं ‘केनेडी-सी फेस’. पण हा फक्त रस्ता नव्हता, हा एक चमत्कार होता! कारण अरबी समुद्रात 440 एकर जागेवर भराव टाकून, 3.6 किमीचा रस्ता पाथ-वे आणि कठडा नरिमन पॉईंट ते गिरगाव चौपाटीपर्यंत बांधायचा होता.(Marine Drive)

आता याचं बांधकाम नक्की कधी झालं ? तर १८ डिसेंबर १९१५ रोजी मरीन ड्राइव्हच्या बांधकामाला सुरुवात झाली. पूर्ण मरीन ड्राईव्ह बांधण्यासाठी ५ वर्ष लागली. 1920 साली हा रस्ता पूर्ण झाला आणि त्याला कुठलीही दुरुस्ती लागली नाही तब्बल 1992 पर्यंत! आणि हा रस्ता फक्त सुंदरच नाही, तर ताकदवानही आहे. अरबी समुद्राच्या लाटांचा मारा सहन करायला तब्बल साडेसहा हजार ट्रायपॉड्स लावण्यात आले. विचार करा, किती जबरदस्त प्लॅनिंग होती ही.(Marine Drive)

पण नानासाहेबांचं कर्तृत्व फक्त मरीन ड्राइव्हपुरतं मर्यादित नाही. त्यांनी मुंबईचा पाणीप्रश्न सोडवला. कसं? तर वैतरणा नदीवर धरण बांधून! त्यांनी स्वतः ठाणे, नाशिक, पुण्याच्या जंगलात फिरून, फक्त एका मदतनीसासोबत चालत, वैतरणा नदीचं सर्वेक्षण केलं. आणि 1956 साली तिथे धरण बांधलं गेलं. त्या धरणामुळे मुंबईकरांची तहान भागली. नानासाहेब यांच्या कार्याची आठवण म्हणून त्या तलावाला मोडकसागर अस नाव देण्यात आल. पहिल्यांदाच एखाद्या इंजिनिअरच नाव एखाद्या धरणाला दिलं गेलं होतं. पुढे त्यांच्याच काळात मुंबई महानगरपालिकेने वैतरणा सोबतच भातसा आणि तानसा ही धरण बांधली. (Top Stories)

===============

हे देखील वाचा : Success Story : नावावरुनच प्रसिद्ध झाला टुथपेस्टचा ब्रँड, वाचा Colgate च्या यशाची कथा

===============

आता जरा मरीन ड्राइव्हच्या सौंदर्याबद्दल बोलू. रात्री जेव्हा या रस्त्यालगतचे दिवे लागतात, तेव्हा असं वाटतं जसं एखाद्या राणीच्या गळ्यातला हार चमकतोय! म्हणूनच या रस्त्याला ‘क्वीन्स नेकलेस’ असं नाव पडलं. 1930 च्या दशकापासून लोकांनी हा उल्लेख सुरू केला. आणि हो, स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचं नाव बदलून, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग असं ठेवण्यात आलं होतं. पण मुंबईकरांसाठी हा नेहमीच ‘मरीन ड्राइव्ह’ राहिला! (Marine Drive)

नानासाहेबांचं काम एवढं भारी होतं की त्यांनी फक्त रस्ते आणि धरणंच नाही बांधली, तर मुंबईच्या टाउन प्लॅनिंगचं भविष्य घडवलं. त्यांनी आणि मेयर अल्बर्ट यांनी मिळून तयार केलेला ‘मास्टर प्लॅन फॉर ग्रेटर बॉम्बे’ आजही मुंबईच्या विकासाचा पाया आहे. पण खरं सांगायचं तर, नानासाहेबांसारखे लोक पडद्यामागे काम करतात, आणि त्यांचं नाव फारसं कुणाला माहीत नसतं. पण जेव्हा तुम्ही मरीन ड्राइव्हवर सूर्यास्त पाहत बसता, किंवा मोडकसागरातून येणारं पाणी पिता, तेव्हा आठवण करा – हे सगळं एका मराठमोळ्या इंजिनिअरच्या जिद्दीमुळे शक्य झालं! ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा!

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.