पुढच्या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे साजरा होतोय. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीसोबत कुठे जायचं याची तयारी काही प्रेमवीर करुही लागले आहेत. या सर्वांसाठी एक खास ठिकाणाची माहिती आम्ही सांगणार आहोत. हे ठिकाण आहे, उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन (Vrindavan) येथे. वृंदावनचे प्रेम मंदिर ज्यांनी बघितले असेल ते सर्वच या प्रेम मंदिराच्या मोहात पडत आहेत. केवळ एकदाच बघून मन भरत नाही, तर हे प्रेम मंदिर बघण्यासाठी वारंवार यावेसे वाटते, एवढे ते सुंदर आहे. वृंदावनचे प्रेम मंदिर केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर राधा-कृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक आहे. पांढ-या शुभ्र रंगाच्या या मंदिराचे सौंदर्य मंत्रमुग्ध करते. 2001 मध्ये जगद्गुरु श्री कृपालुजी महाराज यांनी 54 एकर जागेमध्ये या मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून कृष्णभक्तांचा अनोखा मेळा येथे कायम भरलेला असतो. अगदी परदेशातूनही आलेले श्रीकृष्णाचे भक्त या प्रेम मंदिरात रमतात आणि कृष्ण नामात रममाण होतात.
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ताजमहाल पाहण्यासाठी जाणा-यांची संख्या मोठी आहे. ताजमहाल हे जगातील सातवे आश्चर्य आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. पण केवळ ताजमहालच नाही तर मथुरेच्या वृंदावनात (Vrindavan) वसलेले प्रेम मंदिर देखील प्रेमाचे प्रतीक आहे. या मंदिराला आपल्या साथीदारासोबत भेट देण्याची प्रथा आहे. मंदिरात भेट दिल्यावर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. प्रेमाचे मंदिर म्हणून ओळखले जाणारे, प्रेम मंदिर हे देवी राधा आणि भगवान कृष्ण आणि भगवान राम आणि देवी सीता यांना समर्पित आहे. 2001 मध्ये जगद्गुरु श्री कृपालुजी महाराज यांनी पुढाकार घेऊन या मंदिराची निर्मिती केली. जवळपास 54 एकरच्या भव्य परिसरात हे मंदिर आहे. हा सगळाच परिसर बघण्यासाठी एक दिवसही अपूरा पडतो. (Vrindavan)
मथुरा आणि वृंदावन (Vrindavan) हा सगळा परिसर भगवान श्रीकृष्णमय असा आहे. या भागामध्ये श्रीकृष्ण आणि राधाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांचा इतिहास वेगवेगळा असला तरी सर्वांचे पौराणिक महत्त्व आहे. यातील अनेक मंदिरे ही वास्तूस्थापत्याचा अदभूत नमुना आहेत. त्यांची बांधणी आणि त्यावरील कलाकुसर हा अभ्यासाचाही विषय झाला आहे. यामध्ये वृंदावन (Vrindavan) येथील प्रेम मंदिराचाही समावेश होतो. हे मंदिर त्यामानानं अलिकडच्या काळात उभारले असले तरी त्याची भव्यता ही अचंबित करते. शिवाय त्यावरील कोरीव काम बघण्यासाठी अनेक भक्त येतात. या प्रेम मंदिराचे सौदर्य एवढे आहे की, परदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येनं हे प्रेम मंदिर बघण्यासाठी खासकरुन वृंदावनला (Vrindavan) भेट देतात. या मंदिराच्या सौदर्यांमुळेच हे प्रेम मंदिर प्रेमाचे प्रतीक मानले जाते. येथे रोज हजारो भाविक भेट देतात, पण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचे प्रतीक असलेल्या या मंदिराला भेट देणा-यांची संख्या वाढते. या मंदिरात या दिवशी आल्यामुळे आपल्या साथीदाराबरोबरचे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल, असा समज आहे. या मंदिराची रचना पाचवे जगद्गुरू कृपालू महाराजजी यांनी केली.
=======
हे देखील वाचा : लिव्ह-इन-रिलेशनशिप की लग्न? तुमच्या एका निर्णयाने बदलेल आयुष्य
=======
हे मंदिर बांधण्यासाठी 11 वर्षाचा काळ लागला. त्यासाठी हजार मजूर अहोरात्र परिश्रम करीत होते. सुमारे 100 कोटी रुपये या मंदिराच्या उभारणीत खर्च झाले. 2001 मध्ये प्रेम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. प्रेम मंदिराची उंची 125 आणि लांबी 122 फूट आहे. त्याची रुंदी सुमारे 115 फूट आहे. इटलीहून आयात केलेल्या कॅरारा या संगमरवरी दगडांनी हे मंदिर बांधण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी 2018 मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिरात एकूण 94 खांब आहेत. हे खांब राधा-कृष्णाच्या विविध कथांनी सजलेले आहेत. बहुतेक खांबांवर गोपींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत, त्या जिवंत वाटतात. या प्रेम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते दिवसा पांढरे आणि संध्याकाळी वेगवेगळ्या रंगात दिसते. मंदिरात अशा प्रकारे रोषणाई करण्यात आली आहे की दर 30 सेकंदांनी मंदिराचा रंग बदलतांना दिसतो. मंदिर परिसरात गोवर्धन पर्वताची जिवंत झांकी तयार करण्यात आली आहे, ती पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होते. हे मंदिर प्राचीन भारतीय शिल्पकलेच्या पुनर्जागरणाचे उदाहरण मानण्यात येते. (Vrindavan)
या प्रेम मंदिराला भेट द्यायची असेल तर अनेक साधने उपलब्ध आहेत. यासाठी मथुरा रेल्वे स्टेशन जवळ आहे. मथुरा रेल्वे स्टेशनपासून सुमारे 12 किमी चालावे लागेल. तसेच विमानतळापासून मंदिराचे अंतर 54 किलोमीटर आहे. अशा या मंदिराला भेट देण्यासाठी वर्षातला कुठलाही दिवस चांगलाच आहे.
सई बने