Home » The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…

The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…

by Team Gajawaja
0 comment
The Lost Bomb
Share

अमेरिकेच्या टायबी आयलंडच्या शांत समुद्रात अमेरिकेचं एक रहस्यमयी शस्त्र लपलेलं आहे, जे काही सेकंदात अमेरिकेला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची ताकद ठेवतं. हे एक असं गुपित आहे, जे गेल्या 66 वर्षांपासून पाण्याखाली दबलेलं आहे आणि कधीही कोट्यवधी लोकांना मृत्यूच्या कुशीत लोटू शकतं. ज्याचा इतिहास 1958 मध्ये झालेल्या 2 विमानांच्या टक्करमध्ये लपलेला आहे. त्या समुद्राच्या खाली आहे मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब! जो हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्ब पेक्षा 200 पटीने शक्तिशाली होता! आज 66 वर्षांनंतरही हा बॉम्ब समुद्राच्या तळाशी आहे, की कोणीतरी त्याला चोरलं? हे कोणालाच माहिती नाही आणि जर तो फुटला, तर? चला, जाणून घेऊया या मार्क 15 या हरवलेल्या हायड्रोजन बॉम्बची गोष्ट…(The Lost Bomb)

ही गोष्ट कोल्ड वॉरच्या काळातली, जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीतच असायचे. 1950 च्या दशकात, अमेरिकेने एक धोकादायक योजना आखली होती. त्यांच्या सर्वात Advance B-47 बॉम्बर विमानांना परमाणु हथियारांसह सतत अमेरिकेच्या आकाशात गस्त घालायला सांगितलं जायचं. का? कारण जर सोव्हिएत युनियनने अचानक हल्ला केला, तर अमेरिकेचे हे विमान तात्काळ प्रत्युत्तर देऊ शकतील. आणि असंच एक विमान, 5 फेब्रुवारी 1958 च्या रात्री टायबी आयलंडच्या आकाशात गस्त घालत होतं.

या B-47 विमानात तीन क्रू मेंबर्स होते – पायलट मेजर हॉवर्ड रिचर्डसन, को-पायलट लेफ्टनंट बॉब फॉल्कनर आणि नेव्हिगेटर लेफ्टनंट डोनाल्ड. त्यांच्यासाठी हे एक रुटीन मिशन होतं. पण त्यांना काय माहित होतं, की काही क्षणातच त्यांना एक असा निर्णय घ्यावा लागेल, जो करोडो लोकांच्या जिवावर बेतू शकतो. विमानात लोड केलेलं होतं मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब – 3.5 मेगाटनचं एक भयंकर हथियार, ज्याचं विस्फोट हिरोशिमवर टाकलेल्या बॉम्बपेक्षा शेकडो पटीने जास्त शक्तिशाली होतं. (The Lost Bomb)

The Lost Bomb

रात्रीच्या शांततेत B-47 टायबी आयलंडच्या आकाशात उडत होतं, तेव्हा ग्राउंड कंट्रोलकडून एक मेसेज आला – “तुमच्या एअरस्पेसमध्ये एक F-86 फायटर जेट आहे. सावध रहा!” F-86 हे एक वेगवान आणि आक्रमक लढाऊ विमान होतं, ज्याचा तिथे असण्याचा कोणताही प्लॅन नव्हता. कदाचित रात्रीच्या अंधारात आणि नेव्हिगेशन सिस्टमच्या गडबडीमुळे ते तिथे पोहोचलं असावं. ग्राउंड कंट्रोलने दोन्ही पायलटांना एकमेकांच्या दिशा आणि उंचीची माहिती दिली, पण काळाला काही वेगळंच मंजूर होतं.

रात्री 2:30 च्या सुमारास, जेव्हा B-47 आणि F-86 एकमेकांच्या इतके जवळ आले, की दोन्ही पायलटांना काही समजण्याआधीच F-86 हे विमान B-47 च्या उजव्या पंखाला जोरदार धडकलं. टक्कर इतकी भयंकर होती, की F-86 चा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. F-86 चा पायलट लेफ्टनंट क्लार्क याने तात्काळ इजेक्ट केलं आणि पॅराशूटच्या साहाय्याने तो जमिनीवर सुखरूप उतरला. पण B-47 च्या पायलट मेजर रिचर्डसनसाठी संकटाची ही फक्त सुरुवात होती. (The Lost Bomb)

टक्करमुळे B-47 चा एक इंजिन पूर्णपणे निकामी झालं. विमान हवेत डगमगत होतं, कधीही खाली कोसळू शकत होतं. पण खरी समस्या होती विमानात लोड केलेलं मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब. जर हे विमान असंच कोसळलं, तर हा बॉम्ब फुटण्याची शक्यता खूप जास्त होती. आणि जर असं झालं, तर दक्षिण अमेरिकेचा नकाशाच बदलून जाईल. मेजर रिचर्डसनसमोर दोनच पर्याय होते – एक, बॉम्बसह विमानाची क्रॅश लँडिंग करणं, ज्यामुळे बम फुटण्याचा धोका होता. किंवा दुसरा, बॉम्बला पॅराशूटच्या साहाय्याने समुद्रात टाकणं आणि प्रार्थना करणं, की तो फुटणार नाही.

पण हा निर्णय इतका सोपा नव्हता. जर बॉम्ब समुद्रात टाकला आणि तो फुटला, तर सुनामीच्या प्रचंड लाटा उठतील, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेत करोडो लोकांचा जीव जाईल आणि जर बॉम्ब फुटला नाही, तरी तो समुद्रात हरवण्याचा धोका होता. विमान आता रिचर्डसनच्या नियंत्रणाबाहेर जात होतं. प्रत्येक क्षणासह धोका वाढत होता. शेवटी, मेजर रिचर्डसनने डोळे बंद केले आणि क्रू मेंबर्सना मोठ्याने सांगितलं, “बॉम्ब समुद्रात टाका!” (The Lost Bomb)

3.5 टन वजनाचा हायड्रोजन बॉम्ब पॅराशूटच्या साहाय्याने समुद्राच्या दिशेने सोडण्यात आला. कॉकपिटमधील प्रत्येकाचा श्वास थांबला होता. जर पॅराशूट फेल झालं, किंवा बॉम्बला थोडासा धक्का लागला, तर तो डेटोनेट होऊ शकतो आणि मिनिटांत सगळं उद्ध्वस्त. पण बॉम्बने समुद्राच्या पाण्याला स्पर्श केला आणि… काहीच झालं नाही! तो बॉम्ब समुद्राच्या खोल गर्भात डुबक्या मारत गेला. मेजर रिचर्डसन आणि त्याच्या क्रूने सुटकेचा निःश्वास सोडला, पण त्यांचं संकट संपलं नव्हतं. (The Lost Bomb)

B-47 आता बॉम्ब नसल्यामुळे हलकं झालं होतं, पण त्याचं एक इंजिन अजूनही काम करत नव्हतं. विमान खाली कोसळत होतं. रिचर्डसनने जवळच्या एअरबेसशी संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. रनवेवर सर्वांच्या नजरा विमानावर खिळल्या होत्या. इंजिनमधून आग निघत होती, विमान डगमगत होतं, पण रिचर्डसनने आपलं सर्व अनुभव आणि कौशल्य पणाला लावलं. अखेर, विमानाचे चाक जमिनीवर लँड झाले आणि ते थांबलं.

===============

हे देखील वाचा : Russian Soldiers : एलियन्सने त्यांना दगड बनवलं आणि…

===============

पण ही गोष्ट इथेच संपत नाही. बॉम्ब समुद्रात टाकल्यानंतर, अमेरिकन सैन्याने तात्काळ एक गुप्त सर्च ऑपरेशन सुरू केलं. मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब शोधण्यासाठी शेकडो गोताखोर, पाणबुड्या, आणि सोनार तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. प्रत्येक ठिकाण तपासलं गेलं, पण बॉम्बचा मागमूसही सापडला नाही. आठवडे महिन्यांत बदलले, पण बॉम्ब कुठेच सापडलं नाही.

याचवेळी एक धक्कादायक थिअरी समोर आली – की हाबॉम्ब सोव्हिएत युनियनने चोरला असावा. कोल्ड वॉरच्या काळात सोव्हिएत युनियनच्या पाणबुड्या अमेरिकेच्या समुद्रात गस्त घालत असत. जर त्यांनी हा बॉम्ब शोधला आणि चोरला, तर? काही कागदपत्रांनुसार, या घटनेनंतर सोव्हिएत युनियनमध्ये हायड्रोजन बॉम्बचे टेस्ट वाढले होते. पण ही थिअरी कधीच सिद्ध झाली नाही. (The Lost Bomb)

आज, 65 वर्षांनंतरही, मार्क 15 हायड्रोजन बॉम्ब टायबी आयलंडच्या समुद्रात कुठेतरी लपलेला आहे. जर हा बॉम्ब फुटला, तर त्याची ताकद इतकी प्रचंड आहे, की तो समुद्रात शेकडो मीटर उंच सुनामीच्या लाटा निर्माण करू शकतो. रेडिओअ‍ॅक्टिव्ह पदार्थ पाण्यात पसरतील, आणि दक्षिण अमेरिकेचा मोठा भाग नष्ट होईल. हा बॉम्ब आजही समुद्रात त्या Island जवळ आहे , की सोव्हिएत युनियनने तो चोरल आहे ? कोणालाच माहिती नाही.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.