Home » मनसादेवीच्या मूर्तीने डोळे मिटल्यानं खळबळ

मनसादेवीच्या मूर्तीने डोळे मिटल्यानं खळबळ

by Team Gajawaja
0 comment
Mansadevi
Share

भगवान शिव आणि माता पार्वतीची सर्वात लहान मुलगी मनसादेवीची (Mansadevi) पूजा केली जाते. या मनसादेवीची मोजकी मंदिरे भारतात आहेत.  त्यामध्ये पश्चिम बंगालमधील मंदिर मनसामता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात नुकत्याच झालेल्या चमत्कारामुळे खळबळ उडाली आहे.  या मंदिरातील मनसादेवीच्या (Mansadevi) मूर्तीने अचानक डोळे मिटले आणि लोकांनी हा चमत्कार बघण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी केली. ही घटना पश्चिम बंगालच्या दुबराजपूरच्या दंगलताळा भागात प्राचीन मानसा माता मंदिरात घडली. येथे पहाटे देवीची आरती चालू असतांना एका भाविकानं देवीने डोळे मिटल्याचा दावा केला आणि एकच खळबळ उडाली. बघता बघता ही बातमी सर्वदूर झाली आणि देवीचा हा चमत्कार बघण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिरात गर्दी केली.  

भगवान शंकर आणि माता पार्वती यांची धाकटी मुलगी असणारी मनसा माता (Mansadevi) पश्चिम बंगालच्या दुबराजपूरमधील दंगलपाळा भागात पुजली जाते. येथे मातेचे प्राचीन मंदिर असून त्याला पौराणिक वारसा आहे. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगण्यात येतात. या मंदिरात मातेच्या दर्शनासाठी साप देखील येतात असे सांगण्यात येते. याच मातेच्या मंदिरात पहाटेच्या आरतीच्यावेळी एका भक्ताला देवीनं डोळे मिटल्याचे दिसले. मातेचा हा चमत्कार या भक्तांनी पाहिल्यावर त्याची चर्चा सर्वत्र होऊ लागली. परिणामी हे मनसा माता (Mansadevi) मंदिर दिवसरात्र भक्तांनी फुलून गेले आहे.  

या मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी दररोज अनेक भाविक मंदिरात येतात. मंदिर पहाटेपासून भक्तांनी फूलून  जाते. सोमवारी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाने मूर्तीचे डोळे बंद असल्याचे पाहिल्याचा दावा केला. ही बातमी परिसरात वणव्यासारखी पसरली. यानंतर या ठिकाणी दूरवरचे अनेक लोक येऊ लागले. मनसा माता (Mansadevi) ही जागृत माता म्हणून ओळखली जाते, त्यामुळे देवीचा हा चमत्कार बघण्यासाठी आता या मंदिरात गर्दी होऊ लागली आहे. या प्रकारानंतर मुर्तीच्या तोंडात पाणी टाकल्यावर डोळे उघडल्याचे सांगण्यात आले. मात्र काहींच्या सांगण्यानुसार रंगामुळे मूर्तीचे डोळे बंद झाले होते. पाणी दिल्यावर रंग वाहून गेला आणि डोळे पुन्हा मूळ स्थितीत आले. यामागे कारण काहीही असले तरी मनसा देवीनं डोळे मिटले ही बातमी सर्वत्र एका आगीसारखी पसरली आणि देवीचा चमत्कार बघण्यासाठी मंदिरात गर्दी होऊ लागली आहे.  

भगवान शंकर आणि माता पार्वतीची सर्वात लहान मुलगी असलेल्या मनसा मातेची (Mansadevi) उत्पत्ती कपाळापासून झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच देवीचे नाव मनसा असे ठेवण्यात आले. महाभारतामध्ये देवीच्या नावाचा महाभारतामध्ये जरतकरू असा उल्लेख आहे. त्यांच्या पतीचेही नाव महर्षी जरतकरू असे असून आणि मुलगा अस्तिक म्हणून असल्याचा उल्लेख आहे. देवीची  गणेश, कार्तिकेय, देवी अशोकसुंदरी, देवी ज्योती आणि भगवान अय्यपा अशी भावंडे आहेत. मनसा देवीचे मुख्य मंदिर हरिद्वारमध्ये शक्तीपीठावर आहे. मनसा देवींचा पुत्र अस्तिक हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी होता. आस्तिकाने सापांच्या कुळाला नाशातून वाचवले. त्यामुळेच मनसा देवीच्या दर्शनाला नेहमी साप येतात.  देवीला नमस्कार करतात असे मानले जाते. 

======

हे देखील वाचा : रोगांपासून मुक्त करणारी शिमल्याची हटेश्वरी माता

======

पश्चिम बंगालमधील दंगलताळा भागात प्राचीन मानसा माता मंदिरातही असेच साप दर्शनासाठी येत असल्याचे स्थानिक सांगतात. मनसा देवी ही भक्तांसाठी कायम लक्ष्मी आणि आरोग्याचा आशीर्वाद देणारी म्हणून प्रसिद्ध आहे.  मातेची अनेक प्रकारे पुजा केली जाते.  पुराणात मनसा मातेचा उल्लेख काही ठिकाणी विषाची देवी असाही केला आहे. काही ठिकाणी समुद्रमंथनानंतर मनसा मातेचा जन्म झाला असे देखील म्हटले जाते. झारखंड, बिहार आणि बंगालमध्ये मनसा मातेची (Mansadevi) पूजा विषाची देवी म्हणून केली जाते. विशेषतः जिथे जंगल आहे, आणि सापांचा वावर जास्त आहे, तिथे मनसा मातेची पूजा केली जाते.  मातेची पुजा केल्यास आणि तिच्या नावाचा जप केल्यास सर्पदंशाची भीती नसल्याचे भाविक सांगतात.   त्यामुळे मनसा मातेच्या (Mansadevi) मुर्तीवर सापांचे आच्छादन असते. भारतात हरिद्वार येथील मनसा देवीचे मंदिर प्रमुख मंदिर आहे. या सर्व मंदिरात आता पश्चिम बंगलामधील दंगलताळा भागातील प्राचीन मानसा मातेची चर्चा सुरु आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.