Home » कुवैतमध्ये जीवघेणी उष्णता !

कुवैतमध्ये जीवघेणी उष्णता !

by Team Gajawaja
0 comment
Hottest City Kuwait
Share

कुवेत हा जगातील सर्वात श्रीमंत देश मानण्यात येतो. कुवेत हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘पाण्याजवळ असलेला राजवाडा’ असा होतो. मात्र याच कुवेतमध्ये सध्या एखाध्या धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बसल्याचा भास होत आहे. कुवेतमधील हवामानात प्रचंड उष्मा वाढला असून येथील वाढत्या तापमानाचा फटका प्राणी आणि माश्यांनाही बसू लागला आहे. कुवेतमध्ये सध्या अनेक ठिकाणी आकाशात उडणारे पक्षी अचानक जमिनीवर मरुन पडत आहेत. तर समुद्रातील मासे किना-याजवळ येऊन मरत आहेत. हे सर्व या शहरातील वाढत्या तपमानाचे बळी आहेत. कुवेतमधील या वाढत्या तापमानाचा धोका तेथील नागरिकांच्या आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. असेच तापमान या देशाचे वाढत राहिल्यास, काही वर्षातच हे शहर ओसाड होईल, अशी भीती आहे.

कुवेत हे सर्वांत श्रीमंत असे शहर आहे. तेलाचा मुबलक साठा उपलब्ध असलेल्या या देशात कशाचीच कमी नाही. फारकाय येथे तापमानाचीही कमतरता नाही. येथील तापमान हे ५० अंशच्या आसपास असते. या वाढत्या तापमानाचा येथील मानवी जीवनावर मोठा परिणार होऊ लागला आहे. कुवेतमध्ये सध्या आकाशात उडणारे पक्षी जमिनीवर अचानक पडणे, ही गोष्ट नित्याचीच झाली आहे. कुवेतमध्ये दरवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. या वाळवंटी प्रदेशात त्यामुळे धुळीच्या वादळांचे प्रमाण वाढले आहे. २०१६ मध्ये कुवेतचे तापमान ५४ अंश सेल्सिअस नोंदवले होते. हे तापमान येथे रहाणा-या सर्वच सजीवांसाठी मारक ठरत आहे. (Hottest City Kuwait)

 

कुवेतची राजधानी कुवेत सिटी ‘मार्सेल ऑफ द गल्फ’ या नावाने प्रसिद्ध आहे. हे शहर एकेकाळी किनारपट्टीवरील गर्दी आणि मासेमारी उद्योगासाठी ओळखले जात होते. परुंतु आता याच समुद्रकिनारी वाढत्या उष्णतेमुळे कोणीही जाण्यास तयार होत नाही. सुंदर समुद्रकिनारा लाभलेले हे शहर असेच उष्ण होत राहिले तर एकदिवस ते ओसाड होण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करीत आहेत. कुवेतमध्ये गेल्या काही वर्षांत अत्यंत झपाट्यानं तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत शहरासोबत कुवेतची ओळख आता जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून होऊ लागली आहे. या शहरात आता सर्वसामान्य तापमान ५० अंश सेल्सिअस एवढे रहात आहे. मे महिन्यात येथील हवामानातील उष्मा अधिक वाढण्यास सुरु होतो, हा हवामानातला उष्मा सलग सहा महिने असाच कमी जास्त होत असतो. (Hottest City Kuwait)

कुवेतमध्ये तेलाचा साठा मोठा आहे. या शहरात तेल काढण्यासाठी मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळेही हवा गरम होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सोबत या शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे कुवेत हे दिवसेंदिवस उष्णा वाढत असल्याचे सांगण्यात येते. कुवेतच्या मित्रिबा हवामान केंद्रात ५४°C हे तापमान नित्याचेच झाले आहे. कुवेतमध्ये झालेल्या बांधकामांनाही यासाठी कारणीभूत ठरवण्यात येत आहे. कुवेत सिटी मुख्यत्वे काँक्रीट आणि डांबराने बांधण्यात आली आहे. या शहरातील अनेक इमारतींवर सजावटीच्या नावाखाली काचा बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहराच्या तापमानात वाढ होत आहे. कुवेत सिटीचे तीन दशलक्ष रहिवासी वातानुकूलित घर, कार आणि कार्यालयांमध्ये राहतात. येथे अनेक इनडोअर शॉपिंग मॉल्स देखील आहेत. यात संपूर्ण रस्त्यावर पाम वृक्षांचा समावेश आहे. मात्र या सर्वच ठिकाणी वातानुकूलित व्यवस्था असल्यानं या सर्व मशिनमुळे हवामानात अधिक उष्मा होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Hottest City Kuwait)

====================

हे देखील वाचा : भारतीयांसाठी या सुंदर देशानं खुली केली द्वारे !

====================

या देशातील तापमान हे कायम ५० अंश सेल्सिअस असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर  गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे उष्माघात आणि हृदयाशी संबंधित आजार यामुळे होणा-या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे. पुढच्या काही वर्षात या देशाचे तापमान हे ५० अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तापमान या पेक्षा पुढे गेल्यास ते मानवासह प्राण्यांसाठीही धोकादायक होणार आहे. यासाठी कुवेतमध्ये प्रशासनाने अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी प्रथमच कुवेत सरकारने रात्री अंत्यसंस्कार करण्यास परवानगी दिली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या सर्वांपेक्षा कुवेतमधील वाढत्या तापमानावर कायमस्वरुपी उपाय शोधण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Hottest City Kuwait)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.