Home » चलो हॉंगकॉंग! हॉंगकॉंग सरकारनं हॅलो हॉंगकॉंग ही योजना जाहीर

चलो हॉंगकॉंग! हॉंगकॉंग सरकारनं हॅलो हॉंगकॉंग ही योजना जाहीर

by Team Gajawaja
0 comment
Hong Kong
Share

मार्च, एप्रिल, मे महिन्यात परदेशात फिरायला जाण्याचा तुम्ही बेत करत असाल तर त्यासाठी हॉंगकॉंग (Hong Kong) हा चांगला पर्यांय ठरु शकतो. दोन वर्ष कोरोनाच्या छायेनंतर आता पर्यटन व्यवसायाला चांगलीच उभारी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेत हॉंगकॉंगमध्ये पर्यंटकांना सर्वोच्च सुविधा देण्यावर भर आहे. यासाठी हॉंगकॉंग सरकारनं हॅलो हॉंगकॉंग (Hong Kong) ही योजनाच जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षात हॉंगकॉंगमध्ये कोरोनाचे कडक नियम होते. आता हे नियम मागे घेण्यात आले आहेत. यामुळे हॉंगकॉंगची द्वारं परदेशी पर्यंटकांसाठी खुली झाली आहेत. या परदेशी पर्यटकांना वेळप्रसंगी मोफत विमान तिकीटे देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. हाँगकाँगला (Hong Kong) आल्यावर जगभरातील 5 लाख लोकांना मोफत विमान तिकीटे मिळणार आहेत. हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी ही प्रचार मोहीम सुरू केली आहे. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशाच विविध योजना हॉंगकॉंगमध्ये येत्या महिन्यात राबविण्यात येणार आहेत.  

कोरोनाच्या वादळानंतर आता पर्यटन व्यवसाय सावरत आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासूनच थांबलेला पर्यटनाचा व्यवसाय उभारी घेत आहे.  यामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावला जात आहे. यासाठी हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर व्यवसाय करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी हाँगकाँगमध्ये ज्यांना यायचे आहे, त्यांच्यासाठी खास योजना तयार करण्यात आल्या आहेत. हॅलो हाँगकाँग (Hong Kong) असे या मोहिमेचे नाव आहे. त्याची सुरुवात एका शाही कार्यक्रमात करण्यात आली. यानुसार 1 मार्चपासून कॅथे पॅसिफिक, हाँगकाँग एक्सप्रेस आणि हाँगकाँग (Hong Kong) एअरलाइन्स या एअरलाइन्सद्वारे सहा महिन्यांसाठी परदेशातून येणाऱ्या लोकांना मोफत विमान तिकिटे वितरित केली जाणार आहेत.  या मोहिमेच्या उद्घाटन समारंभात हॅलो हाँगकाँग ही घोषणा देण्यात आली. या  मोहिमेद्वारे हॉंगकॉंग हे  पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याचा संदेश देण्यात आला.  हाँगकाँगमध्ये आता कोरोनाचे  कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत किंवा आयसोलेशनचा कोणताही नियम नाही. जगभरातील लोक येथे येऊन पर्यटनाचा आनंद लुटू शकतात, असे आवाहन येथील नेत्यांनी केले आहे.  

हॅलो हाँगकाँग (Hong Kong) मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी शहरातील पर्यटन, व्यवसाय आणि विमान सेवा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही मोहीम सुरु झाल्यावर संपूर्ण हॉंगकॉंगमध्ये संगीत महोत्सव, हाँगकाँग मॅरेथॉन आणि रुबी सेव्हन्स स्पर्धा आदी करण्यात येणार आहे.  जेणेकरुन पर्यटक अशा स्पर्धांकडे आकर्षित होतील. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून हाँगकाँगने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या सीमा बंद केल्या होत्या. या दरम्यान, तेथे तीन आठवड्यांचे आयसोलेशन आवश्यक होते.  तसेच कोविड चाचणी आणि स्क्रीनिंग देखील आवश्यक होते. गेल्या वर्षी, 2022 च्या मध्यापर्यंत हाँगकाँगने चीनच्या झिरो कोविड धोरणाचे पालन केले. मात्र या सर्व नियमांमुळे हॉंगकॉंगमधील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला.  चीनमध्ये झिरो कोविड धोरणाला जसा विरोध झाला, तसाच तो हॉंगकॉंगमध्येही होत होता.  विशेष करुन व्यावसायिकांनी या धोरणाला विरोध केला होता.  त्यानंतर हळूहळू कोरोनामुओळे लादलेले नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली.  सध्या हाँगकाँगमधील (Hong Kong) कोरोनाबाबतचे सर्व नियम मागे घेण्यात आले आहेत.   

=======

हे देखील वाचा : KGF सिनेमाच्या कथेप्रमाणे नव्हे तर खऱ्या घटनांवर आधारित आहे याचा इतिहास

=======

चीनचे वर्चस्व असलेले हॉंगकॉंग हे पर्यटनासाठी अत्यंत आवडीचे असे मानले जाते. हाँगकाँगमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पर्यटकांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी या शहरात आहेत. हाँगकाँगमधील डिस्नेलँड हे पर्यटकांच्या आवडीमध्ये पहिल्या नंबरवर येते. जवळपास अख्खा दिवस या डिस्नेलॅंडमध्ये घालवता येतो. लहान मुलंच नाही तर त्यांचे पालकही या डिस्नेलॅंडमध्ये आपला वेळ आनंदात घालवतात. व्हिक्टोरिया हार्बर हे हाँगकाँगमधील (Hong Kong) सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक भेट देतात. या बेटाचे मुख्य आकर्षण म्हणजे बोटींग आणि पाण्यावर होणारे खेळ. पूर्वी याला हाँगकाँग हार्बर म्हटले जात असे, परंतु कालांतराने नाव बदलून राणीच्या नावावर हे छोटे बेट करण्यात आले. ज्यांना साहसी खेळाची आवड आहे, त्या पर्यटकांसाठी हे आवडीचे ठिकाण आहे. कोरोनाच्या आक्रमणानंतर अनेक पर्यटक जिथे जास्त गर्दी नाही, आणि जे पर्यटन स्थळ निसर्गाच्या अधिक जवळ आहे, अशा स्थळांना पसंती देत आहेत.  त्यामध्ये हॉंगकॉंगमधील (Hong Kong) ड्रॅगन बॅक हे ठिकाण त्यासाठीच अलिकडे प्रसिद्ध होत आहे.  निसर्गाच्या जवळ असलेल्या या पर्यटनस्थळामध्ये समुद्राच्या सफारीचा आणि डोंगरावर चढण्याचा आनंद एकाचवेळी घेता येतो. एकूण आता हॅलो हॉंगकॉंग या मोहीमेमुळे या सर्व पर्यटन स्थळांची अधिक सजावट करण्यात आली आहे. त्यांना प्रतीक्षा आहे, फक्त पर्यटकांची.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.