Home » शेफच्या डोक्यावर लांब टोपी का असते? 

शेफच्या डोक्यावर लांब टोपी का असते? 

by Team Gajawaja
0 comment
The History Of The Chef's Ha
Share

हॉटेलमध्यले जायला, तिथले छान, चमचमीत पदार्थ खायला कोणाला आवडत नाही? काहीजण तर हॉटेलमध्ये जायची संधीच शोधत असतात. बऱ्याचजणांची खास होटल्सही ठरलेली असतात आणि तिथले खास पदार्थही! हे खास पदार्थ बनवणारा शेफ, कूक किंवा आचारीही तेवढाच महत्त्वाचा असतो.   (The  History Of The Chef’s Hat)

हॉटेलमधील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे हा शेफ असतो. पदार्थ बनवण्याच्या त्याच्या हुकमतीवरच हॉटेलची लोकप्रियता ठरत असते. हॉटेलच्या सर्व अर्थकरणाचा पाया असणाऱ्या या शेफची टोपी कधी पाहिली आहे का? पांढऱ्या शुभ्र रंगाच्या या टोपीमध्ये शेफ किती अनुभवी आहे, हे दडलेलं असतं.  

या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या टोपीला जेवढ्या चुण्या असतात तेवढाच त्या शेफचा अनुभव दांडगा असतो. मात्र ही सर्व परंपरा चालू कशी झाली याची मजेशीर गोष्ट आहे. शेफच्या टोपीचा हा इतिहास चक्क इंग्लडच्या राजाबरोबर जोडला गेला आहे.   

इंग्लडचा राजा आठवा हेन्री याच्याबाबत अनेक किस्से आहेत. हा हेन्री पक्का खवय्या होता. देशविदेशी पदार्थ त्याला आवडत असत. एकदा राजा जेवायला बसला असताना त्याला त्याच्या सुपात केस आठळला. राजा खवय्या असला तरी तो राजाच ना! त्याला राग आला आणि या रागाच्या भरात राजानं ते सूप बनवणाऱ्या शेफचं डोकं उडवण्याची आज्ञा दिली.  या एका प्रसंगातून अन्य शेफनाही दहशत बसली. मग राजाच्या जेवणात अन्य  कोणाचे केस जायला नकोत,म्हणून त्यांनी केस झाकायला सुरुवात केली आणि इथूनच ‘शेफ हॅट’ची परंपरा चालू झाली. (The  History Of The Chef’s Hat)

या शेफ हॅट संदर्भात अजून एक कथा सांगितली जाते.  ही कथा थेट सातव्या शतकातील अश्शूर राजवटीशी जोडली गेली आहे. याकाळात राजांना विषबाधा होण्याचे प्रकार वाढले होते. त्याचा मुख्य स्त्रोत हा राजाचे आचारीच असायचे. शत्रू राजाच्या आचाऱ्याशी जवळीक साधायचे. त्याला काही पैसे किंवा अमिष दाखवले जायचे आणि हा आचारी राजाला खाद्यपदार्थांद्वारे विष देत असे. हे प्रकार वाढल्यावर आचाऱ्यांसाठी ड्रेसकोड आवश्यक असल्याचे मत नोंदवण्यात आले. त्यात टोपीचाही समावेश होता.  

काहींच्या मते इंग्लडमध्ये राजाच्या आचाऱ्यांना अभ्यासही करावा लागत असे. अशावेळी शेफच्या शिक्षणाची जबाबदारी चर्चकडे देण्यात आली होती. चर्चमध्ये राहणाऱ्या भिक्षुंच्या पोशाखाचा परिणाम शेफच्या पोशाखावरही झाला. त्यातूनच या हॅटचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.  

शेफहॅटचा वापर जसा वाढला तशी त्याची उपयुक्तता लक्षात येऊ लागली. मुख्य म्हणजे शेफ कायम अग्निजवळ असणार…अशावेळी केसांतून येणारा घामही या टोपीद्वारे कमी झाला आणि उष्णतेमुळे होणारे केसांचे नुकसानही कमी झाले. शेफहॅटची उपयोगीता पटल्यावर मग सर्वत्र ही शेफहॅट शेफच्या पोशाखाचा अविभाज्य भाग झाली. (The  History Of The Chef’s Hat)

====

हे देखील वाचा – ऐकावं ते नवलच! ‘येथे’ नातेवाईकांच्या मृत्यूनंतर कापले जाते महिलेचे बोट

====

या टोपीचा रंगही बहुतांशी पांढराच असायचा,  त्यामागे स्वच्छता आणि निटनिटके दिसणे हा एक उद्देश होता. मात्र या टोपीमध्ये अनेक प्रकार प्रचलित झाले. काही शेफ उंट टोपी घालतात. त्यामागेही कारण आहे. टोपी उंच असणे म्हणजे त्या शेफची जेष्ठता सर्वांपेक्षा जास्त असते. 

काही शेफच्या हॅट या चुणीदार असतात. सर्वात जास्त चुणी असलेली हॅट ही मानाची असते कारण त्यातही त्या शेफची जेष्ठता सांगितलेली असते.  यामागेही एक गम्मतशीर कथा आहे. अंडी शिजवण्याच्या प्रचलित 100 पद्धती आहेत. अशाच 100 चुण्या असलेली हॅट घालणे आणि ती मिळवणे हे मानाचे समजले जाते.  

हॅटचा वापर जसजसा वाढत गेला, तशी त्याची उपयोगीता वाढत गेली. आजकाल हॅटचा रंग हा वेगळाही असतो. पांढऱ्या रंगाऐवजी काही ठिकाणी काळ्या किंवा गुलाबी रंगाच्याही हॅट घालण्यात येतात. आता काही शेफ या हॅटवरच त्यांची हत्यारं, म्हणजेच सुरी किंवा चमचे लावून आपल्या खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. स्वयंपाक बनवताना डोक्यावर ही शेफहॅट असली की शेफनांही त्यांचे आरोग्य जपण्यास मदत होते. (The  History Of The Chef’s Hat)

Group of chefs holding plate of prepared food in kitchen at hotel

अनेकवेळा स्टोव्ह किंवा गॅसच्या ज्वाळांचा संपर्क केसांशी आल्यास ते जळण्याचा धोका असतो किंवा वारंवार होणाऱ्या फोडण्यांमुळे तेलाचा राबही केसांवर बसतो. यामुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता असते. मुख्य म्हणजे, जेव्हा आपण हॉटेलच्या गारेगार वातावरणात बसलेलो असतो, तेव्हा ही शेफ मंडळी किचनमध्ये गरम गरम वातावरणात आपला मेनू तयार करत असतात. अशा गरमीत डोक्यावर हवेशीर हॅट असल्यास त्यांनाही थंड वाटते. 

उत्कृष्ट शेफच्या टोपीला टोक ब्लँचे म्हणतात. टोक (Toque) हॅटचा उमग फ्रान्समध्ये झाला. आता टोक ब्लँचे हा शेफच्या टोपीचा जगभरातील सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. आत्ता काही स्पेशल शेफची ओळख त्यांच्या खास पदार्थांबरोबर त्यांच्या स्पेशल हॅटमुळेही झाली आहे.  

Pastry chef showing students how to prepare dough in kitchen

इटलीमध्ये पिझ्झा स्पेशलिस्ट शेफची हॅटही अगदी पसरट म्हणजे डोक्यावर पिझ्झा ठेवल्यासारखी असते.  सेलिब्रिटी शेफ ही संकल्पना आल्यावर शेफच्या पोशाखात अधिक सुधारणा झाली. त्यासोबत हॅटही आधुनिक रुपात आली. इंग्लडमध्ये काही बेसबॉल क्लबमध्ये शेफ हॅट म्हणून बेसबॉल कॅपसारखी हॅट परिधान  करतात. तर काही ठिकाणी या हॅटला गोल्डन बेल्ट लावलेला असतो. या सर्वांमागचा हेतू एकच आमचा शेफ हा सर्वात्तम आहे.  (The  History Of The Chef’s Hat)

मंडळी यावरुन काय समजलं…आत्ता कधीही हॉटेलमध्ये गेल्यावर मेनूकार्डवर नजर टाकण्यापूर्वी जमलंच तर त्या हॉटेलच्या शेफच्या हॅटवर नजर टाका. त्याची हॅट किती उंच आहे किंवा तिला किती चुण्या आहेत, हे जाणण्याचा प्रयत्न करा. 

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.