Home » ‘द काश्मिरी फाइल्स’ नंतर काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारी ‘ही’ शॉर्ट फिल्म चर्चेत

‘द काश्मिरी फाइल्स’ नंतर काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारी ‘ही’ शॉर्ट फिल्म चर्चेत

by Team Gajawaja
0 comment
the hindu boy
Share

काही दिवसांपूर्वी आलेल्या विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये हिंदू लोकांवर झालेल्या अमानुष अत्याचारावर हा सिनेमा भाष्य करतो. या अत्याचारानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी एका रात्रीत आपले घर, संसार सर्व सोडले आणि ते तिथून पळाले. आजच्या दशकात संपूर्ण भारतभर हे काश्मिरी पंडित विखुरलेले आहेत. बॉलिवूडमध्ये देखील अनेक कलाकार हे काश्मीरी पंडित आहेत. याच लोकांच्या भयाण सत्यावर बेतलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमाने खूपच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. मात्र जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा या सिनेमाला घेऊन लोकांमध्ये अनेक मतं तयार झाले. अनेकांनी या सिनेमात दाखवलेल्या गोष्टींना सत्य म्हटले तर अनेकांनी त्या गोष्टी नाकारल्या देखील इतकेच नाही तर राजकीय क्षेत्रात देखील या सिनेमाला घेऊन बरीच मत, वाद झाले. अनेक पक्षांनी सिनेमाला पाठिंबा दिला तर काहींनी हे सर्व खोट असल्याचे सांगितले. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर आणि सिनेमातील भयाण वास्तव्यावर बेतलेला हा सिनेमा २० कोटीच्या बजेटमध्ये तयार झाला, आणि सिनेमाने तब्ब्ल २०० कोटींची बक्कळ कमाई केली.(the hindu boy)

आता याच विषयावर आधारित एक शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘द हिंदू बॉय'(the hindu boy) या शॉर्टफिल्ममध्ये देखील एका हिंदू पंडिताची गोष्ट दाखवण्यात आली आहे. मात्र याची कथा पूर्णपणे उलटी आहे. ही शॉर्ट फिल्म पाहिल्यावर ती प्रत्येकालाच विचार करण्याची एक वेगळी दिशा मिळेल हे नक्की. काश्मीरमध्ये जेव्हा हे अत्याचार घडले त्यानंतर आज तिथे त्या लोकांची परिस्थिती कशी आहे? ते अजूनही काही समस्यांचा सामना करत आहे का? ते अजूनही पिडीतच आहे का? आता काश्मिरी पंडित लोकं त्यांचे जीवन कसे व्यतीत करत आहे? आदी अनेक व्यथित करणारे प्रश्न आणि आजचे काश्मिरी पंडित यावर ही शॉर्ट फिल्म भाष्य करते. 

शाहनवाज बाकल दिग्दर्शित ‘द हिंदू बॉय’ (the hindu boy)या शॉर्ट फिल्मचे लेखन देखील त्यांनीच केले आहे. या फिल्ममध्ये टीव्ही अभिनेता शरद मल्होत्रा मुख्य भूमिकेत असून आदी अनेक ओळखीचे कलाकार लहानमोठ्या भूमिकेमध्ये दिसत आहे. यूटुबवर या सिनेमाची तुफान चर्चा असून, लोकांचा याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर त्यात दाखवले आहे की, एका तरुण हिंदू मुलाला त्याच्या सुरक्षिततेसाठी काश्मीरमधून बाहेर पाठवले जाते. तब्ब्ल ३० वर्षांनी जेव्हा तो पुन्हा त्याच्या घरी येतो तेव्हा तिथली नक्की परिस्थिती कशी आहे? काय बदल झाले? त्याच्यासोबत काय होते? आदी अनेक प्रश्नावर या शॉर्ट फिल्ममध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. (the hindu boy)

शरद मल्होत्राबद्दल सांगायचे तर ”द हिंदू बॉय'(the hindu boy)मध्ये त्याने खूपच सुंदर काम केले असून, त्याने २००४ सालापासून टीव्ही इंडस्ट्रीमधून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली. ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ या मालिकेतून त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो ‘भारत का वीरपुत्र- महाराणा प्रताप’, ‘कसम तेरे प्यार की’ आणि ‘नागिन 5’ आदी सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. या शॉर्ट फिल्मची निर्मिती पुनीत बालन यांनी केली असून, त्यांनी या सिनेमाबद्दल सांगितले की, त्यांनी काश्मिरी पंडितांचे दुःख खूपच जवळून पाहिले आहे. त्यांचा त्रास जवळून पहिला आहे. त्यांना नेहमीच या पंडितांची मदत करायची होती. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या समस्यांना लोकांसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.