Home » जगातील सर्वात उंच बोगदा !

जगातील सर्वात उंच बोगदा !

by Team Gajawaja
0 comment
Shinkula Tunnel
Share

कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातीस सर्वात उंच अशा बोगद्याची पायाभरणी केली. तमाम भारतीयांना ज्या अभिमान वाटेल अशा या शिंकुला बोगद्याच्या पहिल्या प्रकल्पाचा स्फोट पंतप्रधान मोदी यांनी केला. भारताच्या सीमा सुरक्षेसाठी हा शिंकुला बोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांवरही त्यामुळे कायमचा वचक ठेवता येणार आहे. विशेष म्हणजे हा शिंकुला बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा ठरणार आहे. यापूर्वी हा मन चीनकडे होता. आता भारतानं हा मान खेचून घेतला आहे. लडाखमधील निमू-पदुम-दारचा रोडवर बांधण्यात येणारा उंच बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO बांधणार आहे. यासाठी तब्बल १६८१,५ कोटींचे बजेट आहे. या बोगद्यामुळे लष्कराची मोठी सोय होणार आहे. हिवाळ्यात लडाख आणि सीमावर्ती भागात संपर्क करणे कठिण व्हायचे. मात्र हा झाल्यावर वर्षाचे १२ महिनेही लडाखला जाणे सोप्पे होणार आहे.

शिंकुला बोगदा अनेक गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण आहे. या बोगद्याच्या मदतीने कारगिल, सियाचीन आणि नियंत्रण रेषा सारख्या मोक्याच्या ठिकाणी अवजड यंत्रसामग्रीची वाहतूक सहज होणार आहे. जवळपास १०० किमी अंतर कमी होणार आहे. मुख्य म्हणजे, या बोगद्याला चीनकडून मोठा धोका आहे, त्यामुळे हा बोगदा तोफविरोधी असा तयार करण्यात येणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा यामुळे लावला जाणार आहे. (Shinkula Tunnel)

लडाख आणि मनालीला जोडण्यासाठीही हा बोगदा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ४.१ किलोमीटर लांबीचा हा डबल-ट्यूब बोगदा १५८०० फूट उंचीवर बांधला जाणार आहे. बोगद्याचे संपूर्ण काम होण्यासाठी चार वर्षाचा कालावधी लागणार आहे. मात्र दोन वर्षांनी बोगद्याची एक लेन चालू होईल, अशी शक्यता आहे. हा बोगदा हिमाचल प्रदेशातील निम्मू, पदम आणि दारच्या मार्गे लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी मनाली आणि लेहला जोडणार आहे. शिंकुला बोगद्याची उंची १६,६१५ फूट आहे. शिंकुला बोगदा पूर्ण झाल्यावर चीनमधील मिला बोगद्याचा विक्रम मागे पडणार आहे. चीनमधील मिला हा बोगदा १५५९० फूट उंचीवर आहे.

या शिंकुला बोगद्यामुळे मनाली ते लेहमधील अंतर २९५ किलोमीटरने कमी होणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या बोगद्यासाठी प्रयत्नशील होती. यामुळे लडाखसारखा प्रदेश देशाच्या अधिक जवळ येणार आहे. सीमावर्ती भागात रहाणा-या लष्कराला युद्धसामुग्री आणि अत्यावश्यक साधन सामुग्रीही यामुळे लवकरात लवकर पोहचवता येणार आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही भारतातील प्रमुख संस्था आहे. भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणे आणि त्यांची देखभाल करणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे. याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने मनालीजवळ अटल बोगदा बांधला आहे. १०००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. (Shinkula Tunnel)

=================

हे देखील वाचा:  आक्राळविक्राळ गोकाक धबधबा !

==================

भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला ६५०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम ३० टक्के वाढवण्यात आली आहे. त्याचाच फायदा शिंकुला बोगद्याला होणार आहे. शिंकुला बोगद्याच्या बांधकामामुळे, हिमाचल ते लेहपर्यंतची कनेक्टिव्हिटी वर्षातील १२ महिने उपलब्ध असणार आहे. या दुहेरी बोगद्यात दर ५०० मीटरवर क्रॉस-पॅसेजची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे त्यातून जाणे सुरक्षित होईल. हिमाचल-लेहमधील नागरी आणि लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यात या बोगद्याचे योगदान महत्त्वाचे असणार आहे.

मुख्य म्हणजे, हा बोगदा तयार झाल्यावर हिमाचल प्रदेश, लेह, लडाख या भागातील पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण या बोगद्याच्या निर्मितीमुळे हिमाचल ते लेहमधील अंतर १०० किमीने कमी होणार आहे. शिवाय पर्यटक कोणत्याही हंगामात हिमाचलमार्गे लेहला भेट देऊ शकता. या बोगद्यामुळे लेहमध्ये नवीन उद्योग धंदेही विकसीत होणार आहेत. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये गेल्या काही वर्षांपासून तणाव आहे. हा शिंकुला बोगदा पूर्ण झाल्यावर चीनची या भागातील दादागिरीला लगाम लावणे अधिक सुलभ होणार आहे. (Shinkula Tunnel)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.