ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे पोलिसांनी कमांडो व्हर्मेल्होविरुद्ध सर्वात मोठी कारवाई केली असून यात ६४ जण ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईत ८१ जणांना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये ब्राझीलच्या पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचाही वापर केला. तब्बल २५०० पोलीस एकाच वेळी यात सामिल झाले होते. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पोलीस छापा ठरला असून या कारवाईने संपूर्ण ब्राझीलसह जग हादरले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या चकमकीत मोठ्या संख्येत मारल्या गेल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र ब्राझीलमध्ये कोकेन आणि ड्रग्जचा सर्वात मोठा व्यापर होतो, हे लक्षातही घ्यायला हवे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलमध्ये कोकेन वापरले जाते. या व्यापारातून येथे अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. या टोळ्या ड्रग्ज व्यापारासाठी लहान मुलांचा आणि महिलांचाही वापर करुन घेतात. पकडले गेल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होते, आणि मुख्य गुन्हेगार सुटले जातात. त्यापेक्षा गंभीर म्हणजे, ड्रग्जच्या वापरामुळे येथील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनी होऊ लागली आहे. (Brazil)

शिवाय या ड्रग्ज टोळ्यांमधील गँगवारमुळे ब्राझीलची बदनामी होऊ लागली होती, त्यामुळेच पोलिसांनी ही मोहीम केल्याची माहिती आहे.
ब्राझीलच्या सुरक्षा संस्थांनी राजधानी रिओ दो जानेरो पासून ही कारवाई सुरु केली आहे. येथील प्रस्थापित टोळ्यांना यामुळे जबर हादरा बसला आहे. यासंदर्भात गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी एक व्हिडिओ स्टेटमेंट जाहीर करत पोलिसांच्या कारवाईत ६० कुख्यात गुन्हेगारांचा खात्मा झ्लाय्चे जाहीर केले. याशिवाय या चकमकीत मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आल्यामुळे ब्राझीलमधील गुन्हेगारी टोळ्यांना मोठा हादरा बसला आहे. ही कारवाई शहराच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः अलेमाओ आणि पेन्हा कॉम्प्लेक्स फावेला भागात झाली. येथे कमांडो व्हर्मेल्हो किंवा रेड कमांड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हेगारी संघटनेचे वर्चस्व आहे. ड्रग्ज व्यापारात ही टोळी अग्रसेर आहे. फक्त ब्राझीलमध्ये नाही, तर जगभर या टोळीचे संपर्क असून त्यातून ट्रग्जचा व्यापार करण्यात येतो. रेड कमांड टोळी ही अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज आहे. कमांडो व्हर्मेल्हो ही ब्राझीलची सर्वात जुनी सक्रिय गुन्हेगारी संघटना आहे. ही संघटना १९८५ पर्यंत चाललेल्या लष्करी हुकूमशाहीच्या काळात तुरुंगात स्थापन झाली. (International News)’

ड्रग्ज तस्करी आणि खंडणीत सहभागी असलेले एक मोठे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क या टोळीतर्फे विणण्यात आले आहे. अगदी मोठ्या प्रमाणात ड्रोनही या टोळीकडे असल्यामुळे पोलीसांनी अत्यंत गुप्तपणे व्युहरचना आखली. या कारवाईत ४२ आधुनिक रायफल जप्त कऱण्यात आल्या आहेत. ब्राझील पोलिसांच्या मते ही रिओ दि जानेरोच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. यात २,५०० हून अधिक लष्करी आणि नागरी पोलिस अधिकारी सहभागी होते. या सर्वातून ब्राझीलमध्ये होत असलेल्या ड्रग्ज व्यापाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र आता शहराची ओळख ड्रग्जनगरी म्हणूनही झाली आहे. येथे असंख्य गरीब वस्त्या असून त्यात ड्रग्ज तस्करीचे एक जाळे तयार झाले आहे. सोबतच खंडणीच्या घटना येथे कायम होत असतात. (Brazil)
=======
हे देखील वाचा : China : कामगारांना जमिनीत गाडून त्यावर उभारलं जगाचं एक आश्चर्य!
=======
जगभरातील कोणाचेही खंडणीसाठी अपहरण करण्याची सुपारी येथील गँग घेतात. ब्राझीलमध्ये कोकेनच्या अतीवापरामुळे अनेक तरुणांचे जीव गेले आहेत. अमेरिकेनंतर, जगात कोकेन वापरणाऱ्यांची संख्या ब्राझीलमध्ये सर्वाधिक आहे. जगातील हिंसक देशांच्या यादीतही ब्राझीलचा समावेश आहे. अंदाजे १.४६ दशलक्ष ब्राझिलियन लोक कोकेन वापरतात. याशिवाय अन्य ड्रग्जचा वापरही येथे अधिक आहे. ही संख्या ५.६ दशलक्ष पर्यंत आहे. याला कारण ठरल्या आहेत, त्या ब्राझीलमधील गुंडांच्या टोळ्या. या टोळ्यांकडून स्वतःच्या फायद्यासाठी देशातील तरुणांना टार्गेट केले जाते. येथे परिस्थिती एवढी भयाण आहे की, ड्रग्ज व्यापारातील आघाडीच्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेल्या फर्स्ट कॅपिटल कमांड वर एक पुस्तक लिहिले असून त्यातून ड्रग्जमुळे ब्राझीलचे जीवनमान कसे खालावले आहे, याचे चित्रण पहायला मिळते. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
