Home » Balto : काळ आला पण मुक्या प्राण्यांनी वेळ येऊ दिली नाही!

Balto : काळ आला पण मुक्या प्राण्यांनी वेळ येऊ दिली नाही!

by Team Gajawaja
0 comment
Balto
Share

साल १९२५, अलास्कातल्या नोममध्ये थंडी खूपच वाढत चालली होती. बर्फाच्या वादळामुळे जवळपास अख्खं गाव बंद पडलं होतं. तापमान तर तब्बल –५० डिग्री सेल्सियस! लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हतं आणि त्यातच गावात एक भयंकर संकट आलं. एका गंभीर आणि जीवघेण्या आजाराची साथ सगळीकडे पसरली, तो आजार म्हणजे डिप्थेरिया. आता डिप्थेरिया हा बेसिकली संसर्गजन्य आजार आहे. हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला सहज पसरतो. यात कोरिनेबॅक्टेरियम डिप्थेरिया बॅक्टेरिया घसा आणि श्वासनालिकेला टार्गेट करतात. ज्यात घशात जाड, राखाडी आणि पांढऱ्या रंगाचा थर तयार होतो. ज्याने श्वास घ्यायला आणि गिळायला त्रास होतो. त्या बॅक्टेरियाचे टॉक्सिन हृदय, मेंदू आणि मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवतात. हा आजार शक्यतो लहान मुलांना होतो आणि जर त्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं की, मुलांचा त्या आजाराने मृत्यू होतो. (Balto)

हा त्रास त्या गावात खूपच वाढला, इतकंच काय या आजाराने मुलांचे जीव सुद्धा घेतले. या आजारावर तेव्हा एकच औषध होतं. ते म्हणजे डिप्थेरिया अँटिटॉक्सिन. पण गावातल्या डॉक्टरकडे हे औषध नव्हतं आणि हे औषध अवेलेबल होतं पण ते सेंट्रल अलास्कामधल्या नेनानाला होतं, म्हणजे त्यांच्यापासून जवळपास १०८५ किमी लांब. त्यात बर्फाळ वातावरणामुळे विमानं बंद, जहाजं बंद. मग ते औषध आणणार कसं ? मग तेव्हा अशी घटना घडली ज्याची इतिहासात नोंद झाली, बऱ्याच हस्की कुत्र्यांनी हजारो मुलांचे जीव वाचवले, जी घटना “ग्रेट सिरम रन” नावाने ओळखली जाते. तर काय आहे ग्रेट सिरम रन? जाणून घेऊ. (Top Stories)

Balto

नोममधली परिस्थिती खूपच गंभीर झाली होती. मुलं आजारी पडत होती आणि डिप्थेरियाचं सिरम नोमपर्यंत पोहोचवणं हाच लास्ट ऑप्शन होता. पण नेनानापासून नोमपर्यंतचं अंतर होतं १,०८५ किलोमीटर आणि हा रस्ता म्हणजे बर्फाचं जंगल, वादळं, अंधार आणि जीवघेणी थंडी. या परिस्थितीत मेल डिलिव्हरी किंवा साधारण प्रवास करायला १५-२० दिवस लागणार होते, पण इथे अडचण अशी होती की, मुलांची परिस्थिती खूपच भयानक नाजुक झाली होती आणि त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर सीरम पोहोचवणं गरजेचं होतं. नाही तर शेकडो मुलांचे जीव गेले असते. पण मग १५-२० दिवसांचा प्रवास लवकरात लवकर कसा होणार? त्यावेळेस एक इम्पाॅस्सिबल प्लॅन तयार झाला. असं ठरलं की, हस्की कुत्रे अशा वातावरणात सर्वाइवल करू शकतात, मग २० पेक्षा जास्त मशर म्हणजे स्लेज चालवणारे म्हणजे साध्या शब्दात बर्फगाडी आणि १५० हून जास्त हस्की कुत्र्यांना सोबत घेऊन हा प्रवास रिलेच्या स्वरूपात पार करायचं ठरवलं.(Balto)

त्यानंतर त्यांच्यात ग्रुप पडले म्हणजे एका टप्प्यावर एक ग्रुप सिरम घेऊन पुढे जाणार आणि मग दुसऱ्या ग्रुपला सिरम देऊन पुढचा टप्पा पार करायचा. पण हा प्रवास काही साधासुधा प्रवास नव्हता. बर्फात पाय रुतायचे, स्लेज अडकायच्या आणि कधी कधी वारा इतका जोरात यायचा की, गाडी आणि कुत्रे दोन्ही उलटायचे. काही ठिकाणी तर नद्या गोठलेल्या होत्या आणि बर्फ झालेल्या नद्यांवर काही ठिकाणी बर्फ इतका पातळ होता की, त्यावरून स्लेज घेऊन जाणं म्हणजे जीवाशी खेळच! मग एक एक मशर आणि त्यांचे कुत्रे पुढे सरकत होते. मग बर्फाच्या तलावावरून, वादळातून आणि अंधारातून ते पुढे जात होते आणि असं करत करत त्यांनी १०८५ किलोमीटरचा अशक्य प्रवास साडे पाच दिवसात पूर्ण केला. (Top Stories)

=============

हे देखील वाचा : 64 Days in the Sky : तब्बल ६४ दिवस लँड न करता ते विमान हवेतच होतं!

=============

पण या सगळ्या धाडसी कुत्र्यांमध्ये एक नाव भरपूर गाजलं, ते म्हणजे बलतो. बलतो हा सायबेरियन हस्की होता. बलतो आणि त्याची टीम शेवटच्या ८५ किलोमीटरच्या टप्प्यासाठी तयार नव्हती. जेव्हा बलतो आणि त्याच्या ग्रुपला सिरम देण्यात आलं, तेव्हा परिस्थिती खूपच भयंकर झाली होती. वादळ इतकं वाढलं होतं की, रस्ताच दिसेनासा झाला. त्यामुळे पुढे जायला अडचण होत होती. तरी बलतो थांबला नाही, तो पुढे चालतच राहिला आणि पहाटे बलतो आणि त्याची टीम नोम गावात सीरम घेऊन पोहोचली. लगेचच मुलांना औषध दिलं गेलं आणि शेकडो मुलांचा जीव वाचला.(Balto)

यानंतर बलतोच्या नावाची सगळीकडे चर्चा सुरू झाली. बातमी सगळ्या अमेरिकेत पसरली. न्यूजपेपर्सने बलतोच्या कामगिरीची दखल घेतली. न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये बलतोचा पुतळा उभा केलं, जो आजही तिथे आहे. पण बलतो १९३३ पर्यंत जगला आणि त्यानंतर त्याचं शरीर आज क्लीव्हलँड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीत जपून ठेवलंय. पण फक्त बलतोच नाही तर १५० पेक्षा जास्त मुक्या जनावरांनी शेकडो मुलांचे जीव वाचवले आणि ही घटना आज इतिहासात ग्रेट सिरम रन म्हणून ओळखली जाते.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.