Home » मुलीचं लग्नाचं वय फक्त नऊ !

मुलीचं लग्नाचं वय फक्त नऊ !

by Team Gajawaja
0 comment
Iraq Womens
Share

देशात महिलांवर होणा-या अत्याचारात वाढ झाली तर काय करावे लागले, अर्थात अशा परिस्थितीत देशाचे कायदे अधिक कठोर करण्याची गरज असते. अपराध्यांना धाक बसेल अशा शिक्षेची तरदूद त्या कायद्यात करावी लागते. लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांना देशात सुरक्षित वातावरण रहावे, ही नेहमी त्या सरकारची जबाबदारी असते. मात्र ही जबाबदारी पार पाडत असल्याचा आव आणत महिलांच्याच हक्काची गळचेपी होत असेल तर. अशीच गळचेपी इराकमध्ये होत आहे. इराकमध्ये महिलांचे, तरुणींचे शोषण होत आहे. महिलांवर होणा-या अत्याचारात वाढ झाली आहे. (Iraq Womens)

धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलींबरोबर अनैतिक अत्याचार होण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. या सर्वांपासून मुलींचे संरक्षण व्हावे यासाठी इराकच्या संसदेनं एका धक्कादायक कायद्याला परवानगी देण्याची तयारी सुरु केली आहे. इराकमध्ये नवीन येणारा कायदा म्हणजे, महिलांचे लग्नाचे वय 9 वर्षे होणार आहे. यामुळे लहान मुलींवर होणा-या अत्याचारात कमी होईल, अशी ग्वाही इराकच्या संसदेनं दिली आहे. या कायद्यामुळे महिलांच्या हक्कासाठी लढणा-या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कायद्यावर टिका करण्यात येत आहे. हा कायदा लागू झाल्यास 9 वर्षांनंतर मुलींचे लग्न होऊ शकणार आहे. याआधी इराकमध्ये आई वडिलांच्या समंतीनं मुलीचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न लावून देण्यात येत आहे. या वयाची मर्यादा वाढवावी आणि अशी लग्ने करणा-यांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महिला संघटना करत असतांनाच त्याच्या उलट कायदा करण्यात आल्यानं महिला संघटना हतबल झाल्या आहेत. त्यांनी यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संघटनांकडे मदतीचा हात मागितला आहे. मात्र सत्ताधार-यांनी मुलींचे लग्नाचे वय 9 वर्ष करणे म्हणजे इस्लामिक कायद्याच्या कठोर नियमांचे पालनच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (International News)

बालविवाहाची प्रथा परंपरा जगभर संपुष्टात येत आहे. बालविवाहामुळे लहान, अजाण मुलींवर कायदेशीर अत्याचार करण्याची परवानगी दिली जाते. त्या मुलीचे भवितव्य अंधारात जाते. शिवाय तिला शारीरिक आणि मानसिक आजाराला तोंड द्यावे लागते. अनेकवेळा लहान वयात लग्न झालेल्या मुली नको असलेल्या गर्भारपणात वेदनामयी मृत्यूला सामोरी जात असल्याचेही पाहण्यात आले आहे. यामुळेच जगभरातील महिला संघटना आणि सामाजिक चळवळीतून बालविवाहाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. जगभर अशी जागृती होत असतांना इराकसारख्या देशात मात्र बालविवाह करण्यासाठी स्वतंत्र कायदाच करण्यात येत आहे. अतिशय धक्कादायक असलेल्या या कायद्यामध्ये अवघे 9 वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुलीचे वय निश्चित असले तरी लग्न ज्या पुरुषाबरोबर लावण्यात येणार आहे, त्याच्या वयाची मर्यादा मात्र निश्चित नाही, त्यामुळे हा कायदा म्हणजे, लहान मुलींवर खुलेआम अत्याचार करण्याची परवानगी असल्याची टिका जगभरातून करण्यात येत आहे. (Iraq Womens)

=====

हे देखील वाचा :  अखेर कायदाच आला !

========

याआधी इराकमधील कायद्यानुसार, विवाहासाठी मुलीचे वय किमान वय 18 वर्षे निश्चित केले होते. हा कायदा 1959 मध्ये मंजूर झाला होता. यातून महिला आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण होत असे. तरीही इराकमध्ये कमी वयाच्या मुलींसोबत लग्न मोठ्या प्रमाणत होत आहेत. त्यासाठी एक पळवाट काढण्यात आली आहे. इराकमध्ये 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना पालकांच्या संमतीने विवाह करण्यास परवानगी असते. मुलीची मासिक पाळी सुरु झाल्यावर ती लग्नायोग्य असल्याचे मानण्यात येते. त्यामुळे अशा मुलींचे लग्न लावून देण्यात येते. या लग्नाला मुलीच्या आई वडिलांची परवानगी असल्यामुळे ते वैध मानण्यात येते. याच लग्नांबाबत येथील समाजात महिला संघटना जनजागृती करत आहेत. धार्मिक कायद्यांची पाठराखण करतांना समाजातील स्वास्थ बिघडत असल्याची टिका इराकच्या महिला संघटना करत होत्या. हे असतानाच मुलीच्या लग्नाचे वय थेट 9 वर्षे केल्यानं या संघटनाना धक्का बसला आहे. या कायद्यामुळे संबंधित मुलीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच घटस्फोट, मुलांचा ताबा आणि मालमत्तेसारखे महिलांचे विशेष अधिकारही मर्यादित होणार आहेत. या कायद्याने इराकी नागरिकांना कौटुंबिक बाबींवर निर्णय घेण्यासाठी धार्मिक अधिकारी किंवा नागरी न्यायपालिका निवडण्याची परवानगी मिळणार आहे. यात कुठेही महिलांचा विचार होणार नाही, अशी भीती आता तेथील महिला संघटना व्यक्त करत आहेत. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.