Home » Japan : गॅस हल्ला आणि जपाननं घेतलेला स्वच्छतेचा धडा !

Japan : गॅस हल्ला आणि जपाननं घेतलेला स्वच्छतेचा धडा !

by Team Gajawaja
0 comment
japan
Share

जपान या देशातील स्वच्छतेचे उदाहरण जगभर दिले जाते. जपानसारखा स्वच्छता प्रिय देश जगात दुसरा नाही, असे सांगितले जाते. मात्र या स्वच्छ, सुंदर देशात अगदी हातावर मोजता येतील एवढेच डस्टबीन सार्वजनिक स्थळी दिसतात. मग अशा परिस्थितीत जपानी नागरिक कचरा टाकतात कुठे असा प्रश्न पडतो.  या प्रश्नाचे उत्तर आहे की, जपानी नागरिक आपला कचरा आपल्या घरी घेऊन जातात आणि त्याचे ओला कचरा, सुका कचरा असे विभाजन करुन तो कचरा गोळा करणा-या कर्मचा-यांच्या स्वाधीन करतात. जपानी नागरिक एरवी स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक असतात, मात्र सार्वजनिक स्थळीही ते कचरा टाकत नाहीत, यामागे 30 वर्षापूर्वी झालेली एक घटना कारणीभूत आहे. या घटनेनंतर जपानमधील बहुतांश डस्टबीन काढून टाकण्यात आले. (Japan) 

याऐवजी आपण केलेला कचरा आपल्या घरी नेण्याची विनंती सरकारनं आपल्या नागरिकांना केली. नागरिकांनी सरकारचा यामागील उद्देश जाणला आणि त्याची अंमलबजावणी सुरु केली. परिस्थिती अशी आहे की, या घटनेला तीस वर्ष झाली आहेत, आणि त्याचे सर्वांगसुंदर परिणाम जपानच्या रस्त्यावर पहायला मिळत आहेत. येथे एकही डस्टबीन दिसत नाही. त्यातून वाहणारा कचरा दिसत नाही, वा कुठलिही दुर्गंधी येत नाही. एका हल्ल्यातून जपानी नागरिकांना घेतलेला हा धडा आता जगभर कौतुकाचा विषय झाला आहे. जपानमध्ये 20 मार्च 1995 रोजी टोकियो सबवेवर सरीन हल्ला झाला. हा एक दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात, ‘औम शिनरिक्यो’ नावाच्या धार्मिक पंथाच्या सदस्यांनी टोकियो सबवेमध्ये सरीन गॅस सोडला. (International News) 

यात 13 नागरिक मृत्युमुखी पडले आणि. 6000 हून अधिक नागरिक जखमी झाले हा हल्ला सकाळच्यावेळी झाला. यावेळी टोकियो सबवेच्या तीन मार्गांवर मोठी गर्दी होती. सरीन हा एक अत्यंत विषारी वायू आहे आणि त्याच्या संपर्कात आल्याने श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे जळणे आणि झटके येणे यासारख्या तात्काळ आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ज्या धार्मिक पंथाच्या सदस्यांनी हा हल्ला केला, त्यांनी या विषारी वायुच्यासाठी ज्या पिशव्या वापरल्या होत्या, त्या सबवेच्या डस्टबीनमध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या. हा हल्ला जपानमध्ये एक धक्कादायक घटना होती आणि त्यामुळे जपानमधील सुरक्षा आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यात आल्या. (Japan) 

हा हल्ला ज्या पंथाच्या सदस्यांनी केला, त्यांना अटक करण्यात आली. पंथाचा नेता शोको असाहारा यालाही या हल्ल्यासाठी दोषी ठरवण्यात आले. या सर्वांवर खटला चालवण्यात आला. गुन्हेगारांना 2018 मध्ये फाशी देण्यात आली. या घटनेनं जपानमधील नागरिकांच्या मनावर मोठा आघात केला. पण जपानी नागरिक हे कुठल्याही दुर्घटनेपासून सजग होतात, आणि त्यातून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी ओळखले जातात. या सिरीन हल्ला प्रकरणानंतरही जपानला एक धडा दिला, आणि सर्व जपान देश कचराकुंडी मुक्त झाला. औम शिनरिक्यो या धार्मिक पंथाच्या सदस्यांनी ज्या पिशव्या वापरल्या त्या सार्वजनिक डस्टबिनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे भविष्यात या डस्टबिनचा वापर आणखीही कोणी घातक हल्ल्यासाठी करु शकेल, याचा अंदाज घेत जपान सरकारने जवळजवळ सर्व सार्वजनिक डस्टबिन काढून टाकण्याची घोषणा केली. (International News) 

===================

हे देखील वाचा : The Lost Bomb : त्या बेटाजवळ अणूबॉम्ब हरवला जो कधीही…

===================

एका दिवसात हे डस्टबिन हटवण्यात आले. हल्ला झाल्यापासून जिथे डस्टबिन होते, तिथे, कृपया तुमचा कचरा घरी घेऊन जा, असा स्पष्टपणे संदेश लिहून ठेवण्यात आला. आता हा नियम जपानी नागरिकांच्या सवयीचा एक भाग झाला आहे. जपानी नागरिक कुठेही बाहेर पडले तरी त्यांच्याकडे एक स्वतंत्र पिशवी असते. ही मंडळी, आपले फिरुन झाल्यावर जो काही कचरा होतो, तो त्या पिशवीत भरुन घरी घेऊन जातात. त्यानंतर त्यांच्या घरी कचरा गोळा करण्यासाठी येणा-या कर्मचा-यांकडे हा कचरा सुपूर्द करण्यात येतो. सिरीन हल्ल्याला 30 वर्ष झाली आहेत, तरीही जपानमध्ये एकही कचराकुंडी बसवण्यात आलेली नाही. जपानी नागरिक आपल्या सरकारचा निर्णय किती आत्मियतेनं स्वीकारतात आणि त्याचे पालन करतात, याचेही हे एक उदाहरण आहे. (Japan) 

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.