आंतरराष्ट्रीय स्तरावर आगामी ‘सफेद’ (Safed) चित्रपटाची ख्याती घेऊन जात, निर्माते भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओजने त्यांच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक अनावरण करण्यासाठी ‘कान्स 2022’ या शोची निवड केली आहे.
या चित्रपटातील मुख्य कलाकार अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभिनेता अभय वर्मा आणि दिग्दर्शक-लेखक संदीप सिंग, निर्माते विनोद भानुशाली आणि सहनिर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता यांनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या वर्षात भारताला ‘कन्ट्री ऑफ हॉनर’ म्हणून साजरे केलेय.
‘सफेद’ चित्रपटात अभिनेत्री मीरा चोप्रा आणि अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. तर लेखक संदीप सिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज यांनी प्रस्तुत केला आहे.
तर विनोद भानुशाली आणि अजय हरिनाथ सिंग यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे तर सहनिर्माते म्हणून निर्माते कमलेश भानुशाली, विशाल गुरनानी, जुही पारेख मेहता आणि जफर मेहदी यांनी बाजू सांभाळली.
====
हे देखील वाचा: लाल महालात लावणीच्या रिल्सवरून शिवप्रेमींचा संताप, अखेर वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा
====
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कान्स या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हील करण्याची मिळालेली संधी सिनेसृष्टीसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. ‘सफेद’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे.
‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’, ‘गोदावरी’ या मराठी सिनेमांना ‘कान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील ‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ मध्ये दाखवला जाणार आहे.