Home » ओस्ट्रासाईझ निवडणूक !

ओस्ट्रासाईझ निवडणूक !

by Team Gajawaja
0 comment
The First election In The World
Share

महाराष्ट्रात काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलीये. न्यूज चॅनेल, रस्ते, चहाच्या टपऱ्या, Whatsapp ग्रुप, सोशल मीडिया सर्वत्र फक्त निवडणुकीची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी देशाची महत्त्वाची लोकसभा निवडणुका झाली, भारतातील निवडणूक हा जगभरात चर्चेचा विषय असतो. निवडणूक झाल्यावर जनता आपल्या आवडीच्या पक्षाला उमेदवाराला मतदान करून निवडून आणते. हे निवडणुकाच बेसिक माहीती तर सर्वांनाच माहिती असेल. पण जगात निवडणुकीची सुरुवात कशी झाली? राजे-महाराजे, घराणेशाही अशी पद्धत असणार शासन जगभरातून बदललं कधी? आणि सामान्य नागरिकाला सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला कधी? हे सर्व माहिती जाणून घेऊया. (The First election In The World)

आपण आताच्या काळात निवडणूक ही सरकार स्थापनेसाठी उमेदवार निवडण्यासाठी घेतो. पण इतिहासानुसार जेव्हा पहिली निवडणूक घेण्यात आली होती ती कोणाला निवडण्यासाठी नाही तर, नको असणाऱ्या उमेदवारासाठी मतदान केलं जायचं. प्राचीन ग्रीसच्या लोकांनी म्हणजे साधारण २५०० वर्षांआधी ग्रीसमध्ये लोकशाहीचा पहिला प्रकार लागू केला होता. तेव्हा ग्रीक लोक नकारात्मक निवडणूक आयोजित करत असत. फक्त जमीनदार पुरुष हे राजकीय नेत्यांना किंवा उमेदवार विरुद्ध मतदान करत असत. ज्या उमेदवारांना सर्वाधिक वोटस मिळायचे त्यांना निर्वासित म्हणजे १० वर्ष देशातून हद्दपार केलं जायचं. (Social News)

आता जसं आपण EVM वर बटन दाबून वोटस देतो किंवा त्याआधी जसं बॉलेट पेपरवर वोटस देत होतो तसं तेव्हा दिलं जात नव्हतं. आपल्या नावडत्या उमेदवाराला वोट देण्यासाठी तुटलेल्या भांड्यांच्या तुकड्यांवर त्या उमेदवाराचं नाव लिहिलं जायचं. याला ओस्ट्राका म्हणत असत. या शब्दापासूनच ओस्ट्रासाईझ शब्द निर्माण झाला ज्याचा मराठी अर्थ बहिष्कृत करणे असा होतो. जर कोणत्याही उमेदवाराला ६००० हून अधिक मतं मिळाली, तर त्याला दहावर्षांसाठी हद्दपार केलं जायचं. (The First election In The World)

हा इलेक्शनचा प्रकार असला तरी याला ऑस्ट्रासिझम म्हणलं जायचं, ज्यामध्ये वोट देण्याचा अधिकार फक्त जमीनदार पुरुषांना होता. महिलांना, गुलाम कामगारांना आणि परकीय नगरिकांना या ऑस्ट्रासिझम निवडणुकीत स्थान नव्हतं. आता ही जगतील सर्वात पहिली किंवा सर्वात जुनी निवडणूक आहे हे कळलं उत्खननात सापडलेल्या ओस्ट्राकावरून ग्रीसच्या अथेन्स शहरात पुरातत्वज्ञांना ८,५०० ओस्ट्राका म्हणजे त्या काळातील मतपत्रे सापडली. हे होते आतापर्यंत सापडलेल्या सर्वात जुन्या निवडणुकीचे पुरावे. याआधी निवडणूक होत असेल, पण त्याचे पुरावे आपल्याकडे नाहीत म्हणून सध्यातरी आपल्यासाठी हीच जगातील पहिली निवडणूक आहे. (Social News)

त्यानंतर अकराव्या ते तेराव्या शतका दरम्यान व्हेनिस शहरात राज्यव्यवस्था मजबूत करत ४० सदस्यांची एक ग्रेट काउन्सिल बनवली गेली. शहरावर असणाऱ्या काही कुटुंबांची राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी आणि सामान्य जनतेला सत्ता निवडण्याचा अधिकार देण्यासाठी ही ग्रेट काउन्सिल स्थापन करण्यात आली होती. तेव्हा व्हेनीशियन लोकांनी “स्वीकृती मतदान” पद्धत लागू केली. या प्रकारच्या निवडणुकीत, मतदार प्रत्येक उमेदवारासाठी एक मत देत असत, लोकांना जो उमेदवार नावडीचा असायचा त्याला एकही मत मिळत नसतं. विजेता तो असायचा, ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली असतील. (The First election In The World)

सार्वत्रिक निवडणुका मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या त्या १७ व्या शतकात युरोप आणि उत्तर अमेरिकेत. सुरुवातीला फक्त २१ वर्षांवरील गौरवर्णीय पुरुषांना मतदानाचा हक्क होता. १८६० च्या उत्तरार्धात गृहयुद्धानंतर अमेरिकेत संविधानात दुरुस्ती करण्यात आली. ज्यामुळे गुलामगिरी बेकायदेशीर ठरवण्यात आली आणि गुलामांना नागरी हक्क व मतधिकार देण्यात आला. परंतु असंख्य निर्बंधांमुळे 1960 च्या मतदान हक्क कायद्यापर्यंत अनेक कृष्णवर्णीयांना मतदान करण्यापासून रोखलं गेले. (Social News)

काही देशांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार उशिराच मिळाला. ब्रिटनमध्ये 1928 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. यानंतर 1944 मध्ये फ्रान्स, 1949 मध्ये बेल्जियम आणि 1971 मध्ये स्वित्झर्लंडमध्येही महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात मात्र पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. या निवडणुका १९५१ आणि १९५२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. लोकशाही असलेल्या प्रत्येक देशात नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक अधिकारांपैकी मतदानाचा अधिकार हा सर्वात श्रेष्ठ अधिकार मानला जातो. (The First election In The World)

======

हे देखील वाचा :  प्रगत देशात मतदान कसे होते ?

======

त्यामुळे जगातील 33 देशांनी मतदान अनिवार्य केले आहे. काही देशांमध्ये तर मतदान न करणाऱ्या नगरिकाकडून मतदानाचा अधिकार काढून घेण्यात येतो. तर काही देशांमध्ये, जे मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात. या ३३ देशांमधील १९ देश असे आहेत जिथे मतदान केलं नाही तर शिक्षा सुद्धा देण्यात येत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बेल्जियम, ब्राझील, चिली, सायप्रस, काँगो, इक्वेडोर, फिजी, पेरू, सिंगापूर, तुर्की, उरुग्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे. यामध्ये अधिक देशाची निवडणूक प्रक्रिया भारतासारखीच आहे. आता काही दिवसांत तुमच्यावर सुद्धा ही जबाबदारी येईल तेव्हा ती चुकवू नका. आजसाठी आजच पाहून उद्यासाठी किंवा मग उज्जवल भविष्यासाठी मतदान नक्की करा. (Social News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.