अरुणाचल प्रदेश हे भारताचे ईशान्य राज्य आहे. अरुणाचल म्हणजेच उगवत्या सूर्याचा पर्वत. या राज्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. अरुणाचलमध्ये कामेंग, सुबनसिरी, सियांग, लोहित, तिराप सारख्या नद्या आहेत. याशिवाय कांगटो, न्येगी कांगसांग, आणि पूर्व गोरीचन शिखर ही या प्रदेशातील सर्वोच्च हिमालय शिखरे आहेत. याच हिमालय शिखरांमध्ये असलेल्या हिमनद्यांमळे या अरुणाचल राज्यालाच आता मोठा धोका निर्माण झाला आहे. सुमारे १६,००० फूट उंचीवरील चीन सीमेवरील हिमनदी मोठ्या प्रमाणावर वितळल्याने त्याच्या खाली असलेल्या अरुणाचल प्रदेशला मोठा धोका निर्माण झाला आहे. या हिमनद्यांचे पाणी अरुणाचलमधील सरोवरात येते. या सरोवरातील पाण्याची पातळी अलिकडील वर्षात वाढू लागली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर काही वर्षांनी हा सर्व परिसर जलमग्न होऊन जाण्याची शक्यता आहे. अरुणाचलमधील पर्यावरण तज्ञांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील संगा नेहगु सरोवर येथे काही दिवसांपूर्वी अचानक पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. सरोवराचे पाणी पात्राबाहेर वाहू लागले. यामुळे अनेक लॉग ब्रिज आणि ब्रोक्पा ट्रॅकचे नुकसान झाले. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी एक समिती करुन संबंधित स्थानाची पाहणी केली. तेव्हा या समितीसमोर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सांगा नेहगु सरोवरात ज्या हिमनदीतून पाणी येते, ती हिमनदी वितळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हिमनदीतील बर्फ मोठ्या वेगात वितळत आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येते. मात्र याचा मोठा फटका अरुणाचल प्रदेशला बसणार आहे. हिमनद्या वेगानं वितळत असल्यामुळे अरुणाचलमधील अन्य सरोवरांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या घटना होत आहेत.(Arunachal Pradesh)
तवांग जिल्ह्यात, सांगा नेहगु सरोवराला आलेल्या या पुराला ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड म्हटले आहे. यातून या भागाला मोठे नुकसान झाले आहे. यासाठी पाहणी करणा-या गेलेल्या पथकानुसार या सरोवरावर अजूनही मोठे संकट कायम आहे. कारण या सरोवराच्या बाजुला असलेली हिमनदी वेगाने वितळत आहे. त्याचे सर्व पाणी या तलावात येत आहे. ही हिमनदी नेमकी कुठल्या वेगात वितळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सांगा नेहगु सरोवर हे पुढचे काही महिने तरी धोकादायक स्थितीत रहाणार आहे. मात्र यात धोका पुढे अधिक वाढत जाणार आहे, या सरोवरात पाण्याच्या क्षमतेपेक्षा पाणी आणखी काही महिने राहिल्यास सरोवरावर ताण येण्याची शक्यता आहे. या सर्वांमुळे या हा सर्व परिसरच पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. हा सर्व भाग अतिउंचावर आहे. हे सांगा नेहगु सरोवर १६००० फूट उंचीवर आहे. या सरोवराला काही धोका झाल्यास त्याच्या खालच्या भागात मोठ्या वेगानं पाणी येण्याची शक्यता आहे. (Arunachal Pradesh)
या सरोवराची पाहणी करण्यासाठी जे पथक गेले होते, ते पथकही दोन दिवस या तलावाचे मार्गक्रमण करत होते. हा सर्व डोंगराळ आहे. आता या भागात सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात आली असून सरोवराच्या पाण्याच्या पातळीचा रोजचा आढावा घेण्यात येत आहे. यासोबतच अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि दिबांग व्हॅली जिल्ह्यातील अन्य सहा सरोवरांचा परिक्षणही सुरु करण्यात आले आहे. या सर्व सरोवरांमध्ये हिमनदीमधून पाणी येते. हा सर्व भाग चीनच्या सिमेजवळ आहे. त्यामुळे या सर्वांबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता या सर्व सरोवरात ज्या हिमनद्यांचे पाणी येते त्या हिमनद्यांचा नकाशा तयार करण्यात येणार आहे. तवांग आणि दिबांग व्हॅली या दोन जिल्ह्यात सरोवरांची संख्या अधिक आहे. हे दोन्ही जिल्हे चीनला लागून आहेत. १९६२ पूर्वी काही काळ हा भाग चीनच्या ताब्यात होता. (Arunachal Pradesh)
======
हे देखील वाचा : गुजरातमधील ऐतिहासिक शहर चंपानेर, जाणून घ्या खासियत
======
याभागात जागतिक हवामान बदलाचे परिणाम होऊ शकतात असा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज च्या अहवालात देण्यात आलाहोता. अरुणाचल प्रदेशच्या जैवविविधतेवरही हा हवामान बदलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार जागितिक हवामान वाढीमुळे वनस्पती आणि प्राणी प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. हिमालयीन प्रदेश हा जगातील सर्वात नैसर्गिक संवेदनशील भाग आहे. त्यामुळे या भागाला हवामान बदलाचा गंभीर धोका आहे. आता सांगा नेहगु सरोवरात झालेल्या पाण्याच्या अतिरिक्त साठ्यामुळे हा धोका किती गंभीर होऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे. (Arunachal Pradesh)
सई बने