तुम्ही ज्या शहरात राहता, ते रहाण्यासाठी कसं आहे….या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर, ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने जाहीर केलेल्या वार्षिक ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्सची माहिती घ्यायला हवी. अर्थातच जगात रहाण्यायोग्य चांगली शहरं कोणती याची यादी ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने जाहीर केली आहे. (Most liveable cities)
‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाच्या वार्षिक अहवालानुसार ऑस्ट्रियाची राजधानी ‘व्हिएन्ना’ हे जगातील सर्वोत्तम शहर आहे. 2021 मध्ये व्हिएन्ना 12 व्या क्रमांकावर होते. गेल्यावर्षी ऑकलंड पहिल्या क्रमांकावर होते, परंतु कोरोना विषाणूच्या काळात लादलेल्या निर्बंधांमुळे ते पहिल्या क्रमांकावरून 37 व्या क्रमांकावर घसरले आहे. सीरियाची राजधानी ‘दमास्कस’ राहण्यासाठी सर्वात वाईट शहर म्हणून घोषित झाले आहे.
‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाच्या क्रमवारीत अनेक युरोपीय शहरांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. डेन्मार्कची राजधानी ‘कोपनहेगन’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्वित्झर्लंडमधील ‘झुरिच’ आहे. स्विस शहर ‘जिनेव्हा’ सहाव्या, तर जर्मनीचे ‘फ्रँकफर्ट’ सातव्या क्रमांकावर आहे. नेदरलँडची राजधानी ‘ॲमस्टरडॅम’ नवव्या क्रमांकावर आहे. (Most liveable cities)
‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाच्या क्रमवारीत अनेक युरोपीय शहरांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे. डेन्मार्कची राजधानी ‘कोपनहेगन’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर स्वित्झर्लंडमधील ‘झुरिच’ आहे. स्विस शहर ‘जिनेव्हा’ सहाव्या, तर जर्मनीचे ‘फ्रँकफर्ट’ सातव्या क्रमांकावर आहे. नेदरलँडची राजधानी ‘ॲमस्टरडॅम’ नवव्या क्रमांकावर आहे.
पहिल्या 10 मध्ये तीन शहरं समाविष्ट असणारा ‘कॅनडा’ हा एकमेव देश आहे. यामध्ये ‘कॅल्गरी’ तिसऱ्या क्रमांकावर, ‘व्हँकुव्हर’ पाचव्या क्रमांकावर आणि ‘टोरोंटो’ आठव्या क्रमांकावर आहे. जपानचे ‘ओसाका’ आणि ऑस्ट्रेलियाचा ‘मेलबर्न’ संयुक्तपणे दहाव्या क्रमांकावर आहे.(Most liveable cities)
जगात राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीच विचार करता भारतासह दक्षिण आशियाई देशांची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. या सर्वात आपल्या भारतातील शहरं कुठे आहेत हा प्रश्न पडला असेल, पण आपल्या देशातील शहरं पहिल्या शंभरात नाहीत. या 140 शहरांच्या यादीत दिल्ली 112 व्या स्थानावर आहे, तर मुंबई शहर 117 व्या क्रमांकावर आहे. या यादीतील शहरांना राजकीय आणि सामाजिक स्थैर्य, गुन्हेगारी, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासह अनेक घटकांच्या आधारे स्थान देण्यात आले आहे.
=====
हे देखील वाचा – अमेरिकेच्या ‘या’ शहरात अनेकदा पडतो माशांचा पाऊस, जाणून घ्या विचित्र कारण
=====
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EUI) च्या अहवालानुसार, व्हिएन्ना, मेलबर्न, ओसाका, कॅल्गरी, सिडनी, व्हँकुव्हर, टोकियो, टोरंटो, कोपनहेगन आणि ‘ॲडलेड’ ही टॉप टेन शहरे आहेत. यासोबत जगातील रहाण्यास अयोग्य अशा शहरांची यादीही मासिकात देण्यात आली आहे.
‘कॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि आशियाचे व्यवस्थापकीय संचालक सायमन बॅप्टिस्ट म्हणाले की, दक्षिण आशियातील शहरांची कामगिरी खराब आहे. प्रदूषण, गुन्हगारी यामुळे या शहारांचा समावेश राहण्यासाठी खराब असलेल्या शहरांच्या यादीत करण्यात आला आहे. (Most liveable cities)
पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची आणि बांगलादेशची राजधानी ढाका यांनी जगातील राहण्यायोग्य शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. ही यादी बनवताना युक्रेनची राजधानी कीवचा समावेश करण्यात आला नाही कारण तेथील राहण्याची परिस्थिती नाही. आक्रमक रशियाचे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गच्या मानांकनातही घसरण झाली आहे.(Most liveable cities)
– सई बने