Home » The Dragon Triangle : पृथ्वीवरचं दूसरं रहस्यमयी बरमुडा ट्रायंगल ?

The Dragon Triangle : पृथ्वीवरचं दूसरं रहस्यमयी बरमुडा ट्रायंगल ?

by Team Gajawaja
0 comment
The Dragon Triangle
Share

बरमुडा ट्रायंगलबद्दल सगळ्यांनाच माहित आहे, ज्याचं रहस्य आजही सोडवता आलं नाही. पण पृथ्वीवर समुद्रात बरमुडा ट्रायंगलसारखी आणखी एक अशी रहस्यमयी जागा आहे, जिथे बरीच जहाजं आणि विमानं गायब झाली आणि ती कशी गायब झाली? हे ना कोणाला कळलंय.. ना कोणाला सांगता आलंय. ही रहस्यमयी जागा म्हणजे डेव्हिल्स सी किंवा ड्रॅगन ट्रायंगल.

जपानपासून फक्त १०० किमी दूर, पॅसिफिक महासागरात ५ ते १० लाख स्क्वेअर किमीचा एक असा भाग आहे, जिथे आजही जहाजं आणि विमानंही जायला घाबरतात! याला डेव्हिल्स सी, ड्रॅगन ट्रायंगल किंवा मां नो उमि म्हणजे मॅजिक सी असं म्हणतात. खास गोष्ट म्हणजे, हा भाग बरमुडा ट्रायंगलची कॉपी आहे आणि दोघंही पृथ्वीच्या २५ ते ३५ अंश उत्तर अक्षरांच्या दरम्यान येतात. मागच्या ३,००० वर्षांमध्ये इथे बरीच जहाजं आणि विमानं कायमची गायब झाली आणि त्यांचा आजही काहीच पत्ता लागला नाही. यामुळे १९५० पासून हा भाग धोकादायक मानला गेला. जपानच्या या बरमुडा ट्रायंगलबद्दलच्या रहस्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊ. (The Dragon Triangle)

आता जपानी संस्कृतीत हजारो वर्षांपासून बऱ्याच लोककथा सांगितल्या जातात, ज्यातल्या एकात असं सांगितलंय की, समुद्राखाली ड्रॅगनसारखा एक प्राणी राहतो, जो जहाजं आणि विमानं गिळतो. ज्यावरून याला ड्रॅगन ट्रायंगल म्हणतात. पण खरं तर १९७० मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने याला त्याच्या रहस्यामुळे डेव्हिल्स सी असं नाव दिलं. मग २०व्या शतकात हा भाग खूप चर्चेत आला. आता इथे हरवलेल्या जहाज आणि विमानाच्या घटना बघूयात.

The Dragon Triangle

तर पहिली घटना १२८१ सालीची सांगितली जाते, जिथून या ड्रॅगन ट्रायंगलच्याची खरी सुरुवात झाली. तर १२८१ साली मॉंगोल सम्राट कुबलाई खानने जपान जिंकण्यासाठी ४,००० हून जास्त जहाजं आणि १४०,००० सैनिक पाठवले होते. पण अचानक समुद्रात भलं मोठं वादळ आलं ज्याने सगळं नष्टं झालं आणि सैनिक मरण पावले. आजही तिथे डायव्हर्सना त्या जहाजांचे अवशेष सापडतात. मग सगळीकडे चर्चा सुरू झाल्या, समुद्रात दैवी शक्ती आहे, जो जहाजं गिळून टाकतो. आता मधल्या काळात जहाजं गायब झाल्याचा फारशा नोंदी सापडत नाहीत. पण २० व्या शतकात बऱ्याच घटना सापडतात. त्या म्हणजे ऑगस्ट १९४५ मध्ये जपानच्या एअरफोर्सचं एक विमान गायब झालं. १९५२ मध्ये जपान सरकारने कायो मारू नं. ५ ही रिसर्च बोट पाठवली होती, ज्यात ३१ रिसर्चर्स होते. मग ही बोटसुद्धा गायब झाली! नंतर फक्त काही अवशेष सापडले, पण ती लोकं कुठे गेले, कोणालाच कळलं नाही. पण काही लोकांनी हा भाग धोकादायक मानला. (Top Stories)

काही वर्षांनी जपानच्या सर्वात मोठ्या न्यूजपेपरने – योमिउरी शिंबुनने, सांगितलं की १९४५-१९५० या काळात ९ हून जास्त जहाजं गायब झाली. १९५५ ला ही जपानी बोट मायाके जिमा बेटाजवळ गायब झाली. १२ दिवसांनी ती सापडली. पण इतक्या रहस्यमयी घटना सारख्याच घडत होत्या की, या जागेबाबाबत सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती, प्रत्येक जहाज, विमान या ठिकाणाहून प्रवास करणं टाळायला लागलं. मग १९८० साली तर आणखी टायटॅनिक पेक्षा मोठं जहाज – एमव्ही डर्बीशायर गायब झालं. (The Dragon Triangle)

इतकी जहाजं आणि विमानं गायब होती, मग प्रश्न असेलच की, याचं कारण काय? आता कसंय.. एखादी मोठी गोष्ट घडली की, चर्चा होतात, आपापल्या तर्कांनी नव्या गोष्टी तयार होतात त्या पसरतात, त्याच्या दंतकथा होतात किंवा लोकांच्या भाबड्या विचारातून लोककथा तयार होतात. तसंच काहीसं ड्रॅगन ट्रायंगल बाबतीतही झालं होतं. ज्याला भरपूर रहस्यमयी कथांची जोड मिळाली जसं की, जपानी कथांनुसार, इथे ड्रॅगन किंवा भूत राहतात, जे जहाजं गिळतात. काही म्हणतात UFO किंवा एलियन्सचा हल्ला वगैरे वगैरे.. त्यामुळे हे रहस्य आणखी कोडं बनत गेलं होतं. पण त्यातच १९८७ मध्ये डायव्हर्सना जपानपासून ५५० किमी दूर समुद्रात ६० फूट खोल एक विचित्र स्ट्रक्चर सापडलं, जे होतं yonaguni शहर. आता हे एक नवीन रहस्य समोर उभं राहिलं. (Top Stories)

ड्रॅगन ट्रायंगलबद्दल इव्हन टी. सॅंडरसन नावाच्या लेखकाने १९७२ मध्ये सांगितलं की, पृथ्वीवर १२ “वाइल व्हॉर्टेक्स” म्हणजे खराब ऊर्जा केंद्रं आहेत, ज्यात ड्रॅगन ट्रायंगल आणि बरमुडा ट्रायंगल येतात. यातून विमानं किंवा जहाजं दुसऱ्या डायमेंशनमध्ये जातात असं म्हणतात! (The Dragon Triangle)

===============

हे देखील वाचा : Ship wreck Story : ७० फुट लाटा, समुद्रात जहाजाचे दोन तुकडे, आणि मग..

===============

१९७० मध्ये न्यूयॉर्क टाइम्सने याला डेव्हिल्स सी असं नाव दिलं. त्यानंतर गॉडझिलासारख्या सिनेमांनी आणि गेम्सनी हा भाग पॉप्युलर केला. १९८९ मध्ये अमेरिकन लेखक चार्ल्स बर्लिट्झ याने “द ड्रॅगन ट्रायंगल” नावाचं पुस्तक लिहिलं, ज्यात त्याने गायब झालेल्या जहाजांचा उल्लेख केला. यामुळे ड्रॅगन ट्रायंगल बरमुडा ट्रायंगलसारखाच पॉप्युलर झाला. पण याचवेळी दुसऱ्या लेखकाने, लॅरी कुस्चेने, “द बरमुडा ट्रायंगल मिस्ट्री सॉल्व्हड” नावाचं पुस्तक लिहिलं आणि सांगितलं की, ड्रॅगन ट्रायंगल आणि बरमुडा ट्रायंगल हे फक्त मिथक आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार वादळं, ज्वालामुखी, मॅग्नेटिक ॲनोमली आणि हवामान बदलामुळे जहाजं आणि विमान बुडतात. त्याव्यतिरिक्त काहीच नाही. (The Dragon Triangle)

आता हा भाग जपानच्या पर्यटनात पॉप्युलर आहे. जवळच्या बेटांवर म्युझियम्स आहेत, जिथे हरवलेल्या जहाजांच्या कथा आणि अवशेष पाहायला मिळतात. yonaguni स्मारक डायव्हर्ससाठी मोठं आकर्षण आहे. पण वादळं, भूकंप आणि ज्वालामुखी अजूनही इथे होत असतात. पण अजूनही ड्रॅगन ट्रायंगलच्या कथांमुळे तिथे या जागेच्या रहस्याबद्दल चर्चा सुरू असतात. तुम्हाला काय वाटतं ड्रॅगन ट्रायंगल खरंच रहस्यमयी आहे का? आम्हाला कमेंटस् मध्ये नक्की सांगा.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.