भारतभरात अशी अनेक मंदिरे आहेत, जी त्यांच्या बद्दलच्या गुढ कथांनी ओळखली जातात. उत्तरखंडमध्ये यातील अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर म्हणजे, श्री वंशी नारायण मंदिर. वंशी नारायण मंदिर हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित मंदिर आहे. 8 व्या शतकातील एकाच दगडाच्या रचनेचे हे मंदिर सर्वार्थांनं अद्भूत आहे. उत्तराखंड राज्यातील बांसा गावामधील डोंगरकपा-यांवर असलेल्या या मंदिराभोवती घनदाट झाडी आहे. भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेल्या या मंदिरामध्ये जाण्यासाठीची वाट मोठी अवघड आहे. (Uttarakhand)
पण तरीही ही वाट पार करुन रक्षाबंधनाच्या दिवशी हजारो भाविक या मंदिरामध्ये पोहचतात. कारण वर्षातील फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच या मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होतात. रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्योदय झाल्यावर मंत्रघोषात मंदिराचे दरवाजे उघडण्यात येतात. सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर अशाच मंत्रघोषात या मंदिराचे दरवाजे बंद करण्यात येतात. त्यानंतर वर्षाचे 364 दिवस या मंदिराचे दरवाजे आणि मंदिरातील श्रीकृष्णाचे दर्शन मानवासाठी बंद होते. या 364 दिवस या मंदिरात प्रत्यक्ष नारदमुनी भगवान श्रीकृष्णाची आराधना करतात अशी भावना आहे. या मंदिराची पूजा पद्धती, अगदी देवाला वाहण्यात येणारी फुलेही खास वेगळी असतात. भारतातील 364 दिवस बंद रहाणारे मंदिर म्हणून उत्तराखंड राज्यातील श्री वंशी नारायण मंदिराचा उल्लेख कऱण्यात येतो. या मंदिराचे दरवाजे फक्त राखी पौर्णिमेच्या दिवशीच सर्वसामान्य भाविकांसाठी खुले होतात. (Social News)
बाकीचे दिवस या मंदिरात नारदमुनी आणि अन्य देवदेवता भगवान नारायणांची सेवा करतात, अशा अनेक कथा या भागात सांगितल्या जातात. चमोली जिल्ह्यातील हिमालयीन प्रदेशात असलेले वंशी नारायण मंदिर हे दुर्गम खोऱ्यात, कल्पेश्वर महादेव मंदिरापासून सुमारे 12 किमी आणि देवग्रामपासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे. डोंगर कपा-यात उंचावर असलेल्या या मंदिराबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उघडतात. यावेळी स्थानिक पुजा-यांसह मोठ्या संख्येनं भाविक येथे येतात. रात्रीपासून हे मंदिर उघडण्याची आणि त्याच्या सजावटीसाठी स्थानिक या अवघड स्थानी जमतात. सूर्योदयानंतर मंदिराचे दरवाजे उघडताच अविवाहित मुली आणि विवाहित महिला भगवान वंशीनारायणांना राखी बांधण्याची सुरुवात करतात. (Uttarakhand)
कात्युर शैलीत बांधलेल्या या मंदिरात भगवान नारायणाची चतुर्भुज मूर्ती आहे. 10 फूट उंच असलेली ही मूर्ती अत्यंत देखणी आहे. श्री वंशी नारायण मंदिराबाबत जी पौराणिक कथा सांगितली जाते, त्यानुसार राजा बळीचा अहंकार नष्ट करण्यासाठी, भगवान विष्णूने वामन रूप धारण केले. राजा बळीचा अंहकार नष्ट करुन भगवान नारायणांनी त्याला पाताळ लोकात पाठवले. राजा बळीनं तेव्हा साक्षात भगवान नारायणाला त्याच्यासमोर राहण्याची प्रार्थना केली. बळीच्या प्रार्थनेमुळे भगवान नारायण पाताळ लोकात राजा बळीचे द्वारपाल झाले. यामुळे देवलोकात चिंता व्यक्त होऊ लागली. माता लक्ष्मी देखील चिंतीत झाली. माता लक्ष्मीनं भगवान विष्णुंची मुक्तता कशी होईल, याची विचारणा नारदमुनींकडे केली. (Social News)
तेव्हा नारदमुनींनी माता लक्ष्मीला बळीला रक्षासूत्र बांधण्यास सांगितले. त्याप्रमाणे माता लक्ष्मी पाताळ लोकात आल्या आणि त्यांनी राजा बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. या राखीच्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळ लोकातून जाऊ द्यावे अशी प्रार्थना केली राजा बळीकडे केली. राजा बळीने बहीण लक्ष्मीची आज्ञा पाळली आणि भगवान नारायणांना आपल्या वचनातून मुक्त केले. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी भगवान विष्णू पाताळ लोकातून पृथ्वीवर प्रकट झाले. तेव्हापासून, रक्षाबंधनाच्या दिवशी, येथे वंशी नारायण म्हणून पूजा केली जाऊ लागली. चौकोनी गर्भगृह असलेल्या वंशी नारायण मंदिराबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते, त्यानुसार येथे नारद मुनी वर्षातून 364 दिवस भगवान नारायणाची पूजा करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी नारद मुनी देखील माता लक्ष्मीसह पाताळ लोकात गेले. यामुळे, त्यांनी फक्त त्याच दिवशी मंदिरात नारायणाची पूजा करता आली नाही. (Uttarakhand)
===================
हे देखील वाचा : Rakshabandhan : भावाला राखी बांधताना ‘या’ गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा
===================
या श्री वंशी नारायण मंदिरात वर्षातून एकदा जी पूजा होते, ती सुद्धा खास असते. श्री वंशी नारायण मंदिराचे दरवाजे उघडल्यावर, कालगोठ गावातील प्रत्येक कुटुंबाकडून देवाला अर्पण म्हणून लोणी येते. तसेच, भगवान विष्णूची मूर्ती दुर्मिळ प्रजातींच्या फुलांनी सजवली जाते. मुख्यम्हणजे, ही फुले फक्त मंदिराच्या अंगणात असलेल्या फुलांच्या बागेत उमलतात. ही फुले फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच तोडली जातात. रक्षाबंधनाच्या दिवसानंतर या मंदिरात आणि येथील बागेतही कोणी येत नाही. या मंदिराकडे जाणारा रस्ता हा प्राचीन गुहा आणि मंदिरे यांनी व्यापलेला आहे. त्यामुळेच या भागात गुढ शांतता भासते. आता पर्यटक या मंदिराचे फक्त दुरून दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. (Social News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics