पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या समर्थनार्थ 1 तास 35 मिनिटांचे जोरदार भाषण केले. या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षाचे सर्व आक्षेप खोडून काढले. गांधी कुटुंब, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव या कुणाचेही नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून वार केले. हे त्यांचे भाषण जोरदार होतेच, मात्र पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप करतांना अशा एक पुस्तकाचे नाव घेतले, ज्यामुळे विरोधी पक्ष हैराण झाला. हे पुस्तक आहे, JFK’s Forgotten Crisis. या पुस्तकाचे लेखक आहेत, ब्रूस रिडेल. (Narendra Modi)
ब्रूस रिडेल हे अमेरिकन असून परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. या पुस्तकात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या परराष्ट्रनितीचे स्वरुप ब्रूस यांनी आपल्या शब्दात मांडले आहे. शिवाय पंडित नेहरू आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्यात झालेल्या चर्चा आणि घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख आहे. JFK’s Forgotten Crisis मध्ये ब्रूस रिडेल यांनी असे अनेक दाखले दिले आहेत, जे विरोधी पक्षाला वादग्रस्त वाटतात. भारताच्या परराष्ट्र नितीवर बोट ठेवणा-या विरोधी पक्षाला नेमकं खिंडीत पकडत मोदी यांनी JFK’s Forgotten Crisis या पुस्तकाचा अभ्यास करा, असा सल्ला आपल्या भाषणाच्या अखेरीस दिला. त्यामुळे विरोधकांमध्ये शांतता पसरली तर सोशल मिडियावर JFK’s Forgotten Crisis पुस्तकात नेमकं काय आहे, याचा शोध सुरु झाला आहे. सोबतच या पुस्तकाची मागणीही वाढली आहे. (Latest News)
लोकसभेतील भाषणा दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी JFK’s Forgotten Crisis या पुस्तकाचा उल्लेख केला. अनेक महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर लेखक ब्रूस रिडेल यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय परराष्ट्र विषयक अभ्यासक असलेल्या ब्रूस रिडेल यांचे हे पुस्तक गाजले ते पंडित नेहरु यांच्याबाबत असलेल्या उल्लेखांमुळे. JFK’s Forgotten Crisis हे अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यावरील पुस्तक आहे. यात जगभरातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहेच. शिवाय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काही निर्णयाचाही यात उल्लेख आहे. मुख्य म्हणजे, पंडित नेहरू आणि केनेडी यांच्यात झालेल्या चर्चा आणि या दोन नेत्यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयाची या पुस्तकात माहिती आहे. देशासमोर अनेक आव्हाने असताना, परराष्ट्र धोरणातून कशापद्धतीनं राजकारण केले जाते, याबाबत लेखक ब्रूस रिडेल यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून मते मांडली आहेत. (Narendra Modi)
लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टिका केल्यावर पंतप्रधान मोदी यांनी JFK’s Forgotten Crisis या पुस्तकाचा आधार घेत भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, तेव्हाच नेहरु यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खाते देखील होते. या पुस्तकात पंडित नेहरु आणि जॉन एफ केनेडी यांच्या भेटवर सविस्तर प्रकरण लिहिले गेले आहे. 1962 मध्ये जॉन केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांच्यासमोर क्यूबन क्षेपणास्त्र संकट आणि चीन-भारत युद्ध हे दोन प्रमुख मुद्दे होते. यावर जॉन केनेडीनं घेतलेल्या भूमिकेचे विश्लेषण या पुस्तकात आहे. शिवाय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्याशी राजनैतिक संबंध मजबूत करण्यात जॅकलिन केनेडीची भूमिका आणि चीन-भारत शत्रुत्वाची पार्श्वभूमी यावरही ब्रूस रिडेल यांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. (Latest News)
सीआयए आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळलेल्या ब्रूस रिडेल यांनी आपल्या पुस्तकात भारत आणि चीनमधील युद्धादरम्यान अमेरिकेच्या हेरगिरीचा एक किस्साही सांगितला आहे. 1957 पासून अमेरिकेने चिनी लष्करी सैन्याशी लढण्यासाठी तिबेटी गनिमींना तिबेटमध्ये कसे प्रशिक्षित केले होते, याचे तपशीलही या पुस्तकात आहेत. याशिवाय नेहरु यांच्याबाबत असलेले काही उल्लेख काँग्रेस नेत्यांना खटकणारे आहेत. JFK’s Forgotten Crisis या पुस्तकातील, “तिबेट, सीआयए आणि चीन-भारत युद्ध” या शीर्षकाच्या प्रकरणात ब्रूस रिडेल म्हणतात, “दूतावासाने श्रीमती केनेडी यांना राहण्यासाठी एक व्हिला भाड्याने घेतला होता. परंतु नेहरूंनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या एका अतिथी सुइटमध्ये श्रीमती केनेडी यांनी रहावे असा आग्रह धरला. (Narendra Modi)
==============
हे देखील वाचा : Blood Moon : ग्रहांची परेड, चंद्रग्रहण, ब्लड मून आणि बरंच काही !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांच्या पत्नी एडविना माउंटबॅटन ज्या सूटचा वापर करत असत, तोच हा सूट होता. स्वातंत्र्यानंतर भारतात वारंवार भेट देणारे एडविना आणि नेहरू हे जवळचे मित्र होते. जॅकी हे नेहरूंचे संपूर्ण लक्ष वेधून घेत होते.” या पुस्तकावरुन ब्रूस रिडेल यांची मुलाखतही झाली आहे. तेव्हाही त्यांनी हिच मते जाहीरपणे व्यक्त केल्यानं ब्रूस यांची मुलाखत गाजली होती. म्हणूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चिनी सैन्याने भारतीय भूमीवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप केल्यावर त्याला उत्तर देतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी आणि विरोधी पक्षांना अमेरिकन परराष्ट्र धोरण तज्ज्ञ ब्रूस रिडेल यांचे पुस्तक JFK’s Forgotten Crisis याचा अभ्यास करावा असा सल्ला दिला आहे. या पुस्तकाचा पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केल्यापासून त्याची मागणी मात्र वाढली आहे. (Latest News)
सई बने