Home » जोशीमठाबाबतच्या भविष्यवाणीची चर्चा सुरु

जोशीमठाबाबतच्या भविष्यवाणीची चर्चा सुरु

by Team Gajawaja
0 comment
Joshimath
Share

स्वर्गाचे द्वार म्हटल्या जाणाऱ्या उत्तराखंडच्या जोशीमठाची (Joshimath) चर्चा सर्वत्र चालू आहे.  काही दिवसांपासून या जोशीमठामधील घरांना तडे पडत असून जमिनीतून पाणी येत आहे. आतापर्यंत येथील 760 घरांमध्ये तडे गेले आहेत. 186 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. अशा परिस्थितीत एका भविष्यवाणीची चर्चाही सुरु झाली आहे. जोशीमठमार्गे बद्रीनाथ मंदिरापर्यंत पोहोचणे भविष्यात दुर्गम असेल, असा स्थानिकांचा दावा आहे. जोशीमठपासून (Joshimath) 22 किमी अंतरावर असलेल्या सुवाई येथील 8,530 फूट उंचीवर असलेल्या भविष्य बद्री मंदिरात ही पूजा केली जाणार आहे. जोशीमठाबाबतच्या भविष्यवाणीनं स्थानिक नागरिक धास्तावले आहेत. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार प्रमुख मठांपैकी पहिला मठ जोशीमठ येथे आहे. त्यामुळेच त्याचे धार्मिक महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. 

 उत्तराखंडमधील जोशीमठ (Joshimath) हे शहर विनाशाकडे वाटचाल करत आहे. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने उपग्रह प्रतिमांद्वारे उघड केले आहे की, केवळ 12 दिवसांत म्हणजे 27 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान जोशीमठ 5.4 सेंटीमीटरने अधिक खाली जमिनीत धसले आहे.  उत्तराखंडमधील चमोली येथे स्थित ज्योतिर्मठ किंवा जोशीमठ याला भगवान बद्रीनाथाचे हिवाळी आसन म्हटले जाते. हिवाळ्यात बद्रीनाथचे दरवाजे बंद झाल्यानंतर बद्री विशालची मूर्ती जोशीमठच्या वासुदेव मंदिरातच ठेवली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, हिंदू धर्मातील सर्वात महान धर्मगुरू मानल्या जाणार्‍या आदि शंकराचार्यांनी जोशीमठ येथे पहिल्या ज्योतिमठाची (Joshimath) स्थापना केली होती. शंकराचार्यांनी आठव्या शतकात जोशीमठ येथे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. शंकराचार्यांनी भारतात बांधलेल्या चार मठांपैकी पहिले मठ म्हणून जोशीमठाची ओळख आहे.  या जोशीमठाला ज्योतिमठ म्हणून ओळखले जात होते. धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार, प्रल्हादच्या हाकेवर भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपचा वध केला. पण भगवान नरसिंहाचा राग शांत झाला नाही. भगवान नरसिंहाचा राग शांत करण्यासाठी, माता लक्ष्मीच्या सांगण्यावरून प्रल्हादने पुन्हा नामजप केला. प्रल्हादांच्या नामजपाच्या प्रभावामुळे भगवान नरसिंहाचा राग शांत झाला आणि त्यानंतर ते शांत अवस्थेत जोशीमठात बसले. येथे नरसिंहाचे मंदिर देखील आहे.

जोशीमठच्या (Joshimath) मंदिरात विराजमान भगवान नरसिंहाच्या मूर्तीबद्दल असे म्हटले जाते की, भगवान नरसिंहाचा एक हात वर्षानुवर्षे पातळ होत आहे. स्कंद पुराणातील केदारखंडच्या सनत कुमार संहितेत असे लिहिले आहे की, ज्या दिवशी भगवान नरसिंहाच्या मूर्तीचा हा हात तुटून पडेल, तेव्हा नर पर्वत आणि नारायण पर्वत एकत्र येतील आणि बद्रीनाथकडे जाण्याचा मार्गही बंद होईल. यानंतर भविष्य बद्रीत भगवान बद्रीनाथांची पूजा केली जाईल.  हे ठिकाण बद्रीनाथपासून 19 किमी अंतरावर तपोवनात आहे.

जोशीमठाचे (Joshimath) महत्त्व अनेक काळापासून आहे. पौराणिक कथेनुसार, जेव्हा पांडवांनी राजपाट सोडून स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी जोशीमठातूनच पर्वतांचा मार्ग निवडला. बद्रीनाथ जवळील पांडुकेश्वर हे पांडवांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते. बद्रीनाथ नंतर माना गाव ओलांडल्यावर एक शिखर येते, ज्याला स्वर्गरोहिणी म्हणतात. येथूनच पांडवांनी युधिष्ठिराचा सहवास सोडण्यास सुरुवात केली आणि शेवटी युधिष्ठिराच्या सोबत एक कुत्राच स्वर्गात गेला. या आख्यायिकेमुळे जोशीमठला (Joshimath) स्वर्गाचे द्वार म्हटले जाते. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे जोशीमठ ओलांडल्यावर फुलांची दरी येते. या भागाचे सौदर्य हे स्वर्गासारखे आहे. त्यामुळेही जोशीमठला स्वर्गाचे द्वार म्हटले जाते. जोशीमठाबाबत अजून एक आख्यायिका सांगितली जाते की, भविष्य बद्री मंदिराजवळ एक दगड आहे, ज्यावर आदि शंकराचार्यांची जोशीमठची (Joshimath) भविष्यवाणी लिहिली आहे. पण आजपर्यंत ही भविष्यवाणी कोणीही वाचू शकले नाही.  मात्र आता जोशीमठ खचल्याची घटना झाल्यापासून या सर्व भविष्यवाणीला महत्त्व आले आहे.  

जोशीमठची (Joshimath) घटना आश्‍चर्यकारक असली तरी ही घटना प्रथमच घडत नाही. याआधीही इतिहासात अनेक शहरे काळाच्या ओघात लुप्त झाल्याच्या घटना आहेत. भगवान कृष्णाची नगरी द्वारका ही अशीच लुप्त झाली. भगवान कृष्णाचे शहर द्वारका हे हिंदूंसाठी अतिशय पवित्र स्थान मानले जाते. गुजरातच्या किनाऱ्यावर वसलेल्या द्वारकेचा इतिहास 10 हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो. असे मानले जाते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी ही पृथ्वी सोडली तेव्हा त्यांची द्वारका नगरी आणि तेथे राहणारे सर्व लोक समुद्रात लीन झाले. आजही हे शहर अस्तित्वात आहे पण, त्याचा पुरातन भाग पाण्यात बुडाला आहे असे मानले जाते. 

=======

हे देखील वाचा : येणाऱ्या पुढील काही वर्षात ‘ही’ शहरं पूर्णपणे पाण्याखाली जाणार?

=======

नेदरलँडमधील सेफ्टिंगे हे गावही १६व्या शतकात पाण्याखाली गेले. वेस्टरशेल्ड एस्ट्युरी नेदरलँड्समध्ये आहे, हा एक दलदलीचा प्रदेश आहे. 1200 च्या काळात इथे पाणी असायचे आणि खूप दलदल असायची. त्यानंतर येथील स्थानिक लोकांनी पाणी बाहेर काढून ही जागा शेतीसाठी योग्य केली. चीनी शहर शिचेंग हे देखील असेच एक शहर आहे जे इसवी सन 25 मध्ये अस्तित्वात होते. परंतु 1959 साली चीन सरकारने हायड्रोलिक विकास प्रकल्पासाठी कृत्रिम तलाव बांधण्याचा निर्णय घेतला. पण या प्रकरणात त्यांनी प्राचीन शहरालाच बुडवले. 16 व्या शतकात, हे शहर एक प्रमुख सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक स्थान म्हणून उदयास आले. या शहराच्या पडझडीमुळे सुमारे तीन लाख लोकांना येथून स्थलांतर करावे लागले. 

आता जोशीमठावर (Joshimath) आलेल्या संकंटामुळे अनेक काळापूर्वी केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.  गेली अनेक वर्ष जोशीमठ परिसरात रहाणा-या नागरिकांना त्यामुळेच भीती वाटत आहे.  यातील अनेकांनी आपली सर्व जमापुंजी घर बांधण्यासाठी खर्च केली आहे.  आता याच घरांना मोठ्या भेगा पडल्या आहेत.  त्यामुळे स्थानिक धास्तावले आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.