पुढच्या २५ वर्षात पृथ्वीवरचा एक देश जिथे लोकं राहतायत तो नकाशावरुन कायमचा गायब होणार आहे आणि आपण आपल्या डोळ्यांनी तो गायब होतानासुद्धा बघू शकणार आहोत, बरोबर ऐकलं. पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाईच्या मधोमध पॉलिनेशियामध्ये एक देश वसलाय, ज्याचं नाव आहे तुवालू. जो पुढच्या काही वर्षात समुद्राच्या पाण्याखाली बुडणार आहे, तिथली लोकंं, त्यांची घरं सगळं पाण्याखाली जाणार आहे आणि काही वर्षात हा देश इतिहासात जमा होणार आहे, ज्याचं कारण काय तर.. हवामान बदल आणि याच अडचणींमुळे सध्या देशाची डिजिटल कॉपी बनवतायत. असं म्हटलं जातंय की, 2050 पर्यंत हा देश समुद्रात गायब होणार आणि 2100 पर्यंत नाहीसा होणार आहेत. (The Disappearing Nation)
आता तुवालू हा जगातला चौथा सर्वात छोटा देश आहे, ज्याची लोकसंख्या साधरण ११,००० आहे. बेसिकली हा नऊ छोट्या बेटांचा समूह आहे. फुनाफुती, नानुमागा, नानुमिया, निउताओ, नुई, व्हायटुपु, निउलाकिता, फुनाफाले आणि फुफाफाले. यात पाच अॅटॉल्स म्हणजे प्रवाळ बेटं आणि चार रीफ आयलंड्स म्हणजे खडकाळ बेटं आहेत. आता साध्या भाषेत अॅटॉल्स बेटं म्हणजे ज्वालामुखींपासून बनलेली बेटं. लक्षद्वीप किंवा मालदीवसारखी बेटं याचंच उदाहरण आहे. या देशाचं स्ट्रक्चर पाहिलं तर हा बराच लांब आहे आणि याची रुंदी फक्त २०-४०० मीटर आहे. पण इथे प्रॉब्लेम असा आहे की, तुवालूची बेटं समुद्रसपाटीपासून सरासरी फक्त २ मीटर म्हणजे साधारण ६.५ फूट उंच आहेत. म्हणजे जर जरा मोठी लाट आलं, वादळ आलं किंवा समुद्रपातळी वाढली की, संपूर्ण देशात पाणी साचतं. (Top Stories)
तर १९८९ साली पहिल्यांदा जगभरात तुवालूच्या बुडण्याबद्दलची पहिली ठोस बातमी तुवालूच्या स्थानिक नेत्यांनी आणि UNFCCC मधल्या रीप्रेजेंटेटिवनी जगासमोर मांडली. मग IPCC म्हणजे Intergovernmental Panel on Climate Change ने १९९० च्या पहिल्या असेसमेंट रिपोर्टमध्ये पॅसिफिक
बेटांवर समुद्रसपाटी वाढीचा धोका हायलाइट केला होता. यात तुवालूचा स्पष्ट उल्लेख नव्हता, पण तिथूनच चर्चेला सुरुवात झाली. त्यामुळे वैज्ञानिकांनी आणि तुवालूच्या नेत्यांनी मिळून ही खबर जगापर्यंत पोहोचवली. पण मीडियात खरी धडक बातमी आली १९९९-२००० मध्ये, जेव्हा The Guardian आणि इतर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी तुवालूची स्टोरी कव्हर केली होती. यावरून अंदाज येईल की, किती वाईट परिस्थितीचा सामना करतायत आणि हे होण्यामागचं कारण आहे क्लायमेट चेंज. सध्या आर्क्टिक आणि अंटार्क्टिकामधली बर्फ वितळतोय त्यामुळे समुद्राची पातळी वाढत चालली आहे.(The Disappearing Nation)
त्यांनी ३० वर्षांचा सॅटेलाइट डेटा तपासला, म्हणजे १९९३ पासून समुद्रपातळी मोजली आणि तुवालूच्या भविष्याबद्दल कमालीची चिंता व्यक्त केली. नासाच्या २०२३-२५ च्या ‘सी लेव्हल चेंज टीम’च्या अहवालानुसार, गेल्या ३० वर्षांत तुवालूमधली समुद्रपातळी तब्बल १५ सेंटीमीटर म्हणजे साधारण ६ इंच वाढली! ही वाढ जागतिक सरासरीपेक्षा दीडपट जास्त आहे. नासाचं म्हणणं आहे की, २०५० पर्यंत आणखी २० सेंटीमीटर म्हणजे ८ इंच किंवा जास्त वाढ होणारच आणि २१०० पर्यंत ५० सेंटीमीटर ते १ मीटर आणि वाईट परिस्थितीत तर याच्या दुप्पट वाढ होऊ शकते. आता जिथे वर्षात फक्त ५ दिवस पूर येतो, तिथे २०५० पर्यंत २५ दिवस पाणी शिरेल आणि २१०० पर्यंत तर १०० हून जास्त दिवस बेटं पाण्याखाली बुडतील! नासाच्या नकाशांनुसार, २०५० पर्यंत रस्ते, विमानतळ, घरं यांसारखा महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर हाय टाइडच्या पाण्याखाली जाईल आणि २१०० पर्यंत तर देशाची ९५% जमीन पाण्याखाली जाईल. (Top Stories)
पण मग तुवालू देशाला माहित आहे की, त्यांचा देश संपणार आहे तर देश वाचवण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का? तर तुवालूचे लोक आणि सरकार हार मानायला तयार नाहीत. त्यांनी देश वाचावा म्हणून किनारपट्टी मजबूत करत आहेत. यातलं सगळ्यात मोठं पाऊल म्हणजे तुवालू कोस्टल अॅडॅप्टेशन प्रोजेक्ट (TCAP). २०१७ मध्ये सुरू झालेला हा प्रोजेक्ट UNDP, ग्रीन क्लायमेट फंड, ऑस्ट्रेलिया आणि तुवालू सरकार यांच्या मदतीने पूर्ण झालाय, ज्यात जमिनीची ऊंची वाढवली आहे. ज्यामुळे हे २१०० पर्यंत पूरमुक्त राहील. सोबतच सागरी भिंती, ड्रेनेज आणि स्थानिक वनस्पतींचं रोपण झालं. त्यांच्या या देश वाचवण्याच्या लढ्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हा देश फंडींग करतोय. (The Disappearing Nation)
आता जसं नेदरलँड्स, दुबई, दोहा, मालदीव, जपानसारख्या ठिकाणी जशी कृत्रिम बेटं आहेत, जी समुद्रावर तयार केली आहेत आणि आजही तिथे माणसं राहतात. मग तुवालूच्या लोकांसाठी असा बेट तयार करता येउच शकतो, पण तुवालू इतका श्रीमंत नाही. त्यामुळे तसं करता येणं शक्य नाहीये. पण तुवालूकडे दूसरा प्लॅन आहे ज्यात सगळी लोकसंख्या देश सोडून जाणार आहे. २०२३ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाशी फॅलेपिली युनियन ट्रीटी केली. यात एक खास क्लायमेट व्हिसा आहे, ज्याने दरवर्षी २८० तुवालूच्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात कायमस्वरूपी राहायला जायला मिळेल आणि हा जगातला पहिलाच क्लायमेट व्हिसा आहे! आणि आता पर्यंत ८२% लोकांंनी अर्जसुद्धा केलेत.
================
हे देखील वाचा : Unsolved Mystery : हिरव्या कातडीची ‘ही’ मुलं पृथ्वीवर आली तरी कुठून ?
=================
पण आता ही गोष्ट तर तशी पक्कीच आहे की तुवालू देश कधी तरी पाण्याखाली जाणार आहे, म्हणजे त्याचा फिसीकल एक्सिसटन्सच गायब होईल म्हणून त्यांनी तुवालूचं सांस्कृतिक आणि कायदेशीर अस्तित्व वाचवण्यासाठी एक इंटरेस्टिंग योजना केलीय. २०२२ मध्ये तुवालूने जगातील पहिलं “डिजिटल नेशन” बनण्याची घोषणा केली. यात होणार असं आहे की, मेटावर्स म्हणजे व्हर्च्युअल रिअलिटीमध्ये तुवालूची डिजिटल कॉपी तयार केली जाणार आहे. यात बीच, घरं, झाडं, संस्कृती, इतिहास, संगीत आणि खाद्यपदार्थांचं ३D स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन होणार आहे. ब्लॉकचेन टेक्नॉलजी वापरून डिजिटल पासपोर्ट, मतदान आणि सरकारी सेवा उपलब्ध केल्या जातील, जेणेकरून तुवालूचे नागरिक जगाच्या कोपऱ्यावर कुठेही असले तरी आपल्या देशाशी जोडले जातील. (The Disappearing Nation)
पण जशी परिस्थिती आज तुवालूवर आलीये तशी मुंबईवरसुद्धा येऊ शकते, कारण मुंबईच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. मधल्या काळात चर्चा होती बघा.. २०५० पर्यंत मुंबई बुडणार.. हे प्रेडिक्शन होतं, कारण २०५० पर्यंत समुद्रपातळी ५० सेमी वाढणार आहे. पण त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तुवालूचं भविष्य धोक्यात तर आहे, पण त्यांचा लढा खरंच प्रेरणादायी आहे. भौतिक संरक्षण, डिजिटल नेशन, आंतरराष्ट्रीय कायदे, पर्यावरणीय टिकाव आणि ह्यूमन डेवलपमेंट यांचा मेळ घालून तुवालू आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी झटतोय.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics