Home » बकिंघम पॅलेसला आता म्युझियम बनवण्याचा निर्णय

बकिंघम पॅलेसला आता म्युझियम बनवण्याचा निर्णय

by Team Gajawaja
0 comment
Buckingham Palace
Share

ब्रिटनमध्ये बकिंघम पॅलेस हा ब्रिटनमधील जनतेसाठी एखाद्या मंदिरासारखा आहे.   बकिंघम पॅलेस (Buckingham Palace) म्हणजे त्यांच्या राणी किंवा राजाचे निवासस्थान…ब्रिटनचे राजा आणि राणी 1837 पासून या राजवाड्यात राहतात.  मात्र ब्रिटनचे सध्याचे राजे चार्ल्स यांना हा अलिशान राजवाडा आवडत नाही.  या अलिशान राजवाड्याची भव्यताच त्यांना नकोशी झालीय.  राजवाड्याची निगा राखण्यासाठी होणारी आर्थिक तरतूद आणि तेथील परंपरा यामुळे राजा चार्ल्स यांनी बकिंघम पॅलेसला आता म्युझियम बनवण्याचा निर्णय घेतला आहे.  याद्वारे जनता थेट या राजवाड्यात येईल आणि ब्रिटनच्या राजघराण्याबरोबर त्यांचे ऋणानुबंध अधिक दृढ होतील असे राजा चार्ल्स यांना वाटते.   राणी एलिझाबेथ 2020 पर्यंत या पॅलेसमध्ये होत्या.   परंतु कोविड दरम्यान त्या लंडनमधील विंडसर कॅसलमध्ये स्थलांतरित झाल्या.  1703 मध्ये ड्यूक ऑफ बकिंगहॅमसाठी तयार झालेल्या या पॅलेसची सध्या दुरुस्ती चालू असून ती 2027 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.  परंतू हा पॅलेस दुरुस्त झाल्यावरही त्यामध्ये राहण्यास राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला तयार नाहीत.  त्यामुळेच हा अलिशान पॅलेस लवकरच म्युझियम  म्हणून रुपांतरीत होण्याची शक्यता ब्रिटनच्या वृत्तपत्रात व्यक्त होत आहे.  

ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर 73 वर्षीय राजा चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत.  राजा किंवा राणी जिथे वास्तव्य करातात त्या बकिंघम राजवाड्यात राजा चार्ल्स यांना राहायचे नाही.   राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला सध्या क्लॅरेन्स हाऊसमध्ये राहतात.  हे त्यांचे निवासस्थान बकिंगहॅम पॅलेसपासून थोड्याच अंतरावर आहे.  राजा आपले काम बकिंगहॅम पॅलेसमधून (Buckingham Palace) करत असून निवासस्थान म्हणून त्याचा वापर करीत नाहीत.  सध्या बकिंगहॅम पॅलेसचे नूतनीकरण सुरू आहे.  2027 मध्ये नूतनीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येते.  यानंतर राजा चार्ल्स या राजवाड्याचा उपयोग फक्त कार्यालय म्हणून करतील.  1837 पासून ब्रिटनच्या राजा आणि राणीचे अधिकृत निवासस्थान असलेल्या या राजवाड्याची भव्यता सर्वसामान्यांना दिपवणारी आहे. 

राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांना या भव्य राजवाड्यापेक्षा क्लेरेन्स हाऊस आवडले आहे.  चार्ल्स यांच्या जवळच्या व्यक्तीनुसार त्यांना मोठमोठे महाल आवडत नाहीत.  त्यांना आधुनिक काळात फार मोठ्या घरात राहायचे नाही.  राजवाड्याच्या देखभालीचा खर्चही तेवढाच मोठा आहे.  त्यापेक्षा राजा आणि त्यांची पत्नी यांना छोटे निवासस्थान पसंत असल्याचे त्यांचे स्नेही सांगतात.  यासंबंधात ब्रिटनच्या वृत्तपत्रात बातम्याही येत आहेत.   

बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) हा ब्रिटनच्या जनतेचा मानबिंदू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.   हे लंडनचे राजेशाही निवासस्थान आहे आणि युनायटेड किंगडमच्या राजाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.  वेस्टमिन्स्टर शहरात स्थित हा राजवाडा अनेकदा देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.  हा राजवाडा  म्हणजे 1703 मध्ये ड्यूक ऑफ बकिंगहॅमसाठी (Buckingham Palace) खाजगी मालकीच्या जागेवर बांधलेली एक मोठी टाउनहाऊस इमारत होती.  किंग जॉर्ज तिसरे यांनी 1761 मध्ये क्वीन शार्लोटचे खाजगी निवासस्थान म्हणून ही इमारत विकत घेतली आणि त्याचे राजवाड्यात रुपांतर केले.  तेव्हापासून हा राजवाडा राणीचे घर म्हणून ओळखला जातो.  1837 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणानंतर बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) हे ब्रिटिश राजाचे निवासस्थान बनले.  हा राजवाडा त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो.  या राजवाड्याची बाल्कनी सुप्रसिद्ध आहे.  ज्यावर संपूर्ण राजघराणे एकत्ररित्या बघण्याची संधी जनतेला मिळते.  दुसऱ्या महायुद्धात एका जर्मन बॉम्बने राजवाड्याचे नुकसान केले होते.  राजवाड्यात 775 खोल्या असून त्यातील बगिचा हा  सर्वात मोठी खाजगी बगिचा म्हणून ओळखला जातो.  राजवाड्याचील काही भाग हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जनतेसाठी खुला करण्यात येतो.   एवढा भव्य राजवाडा असल्यामुळे त्याच्या निगराणीसाठी कर्मचारीही तेवढेच आहेत, आणि त्यांची निवासस्थानेही राजवाड्याच्या आतल्या भागात आहेत.  त्यात 188 कर्मचारी शयनकक्ष, 92 कार्यालये, 78 स्नानगृहे, 52 मुख्य शयनकक्ष आणि 19 राज्य कक्षांसह 775 खोल्या आहेत.  वैशिष्ट्य म्हणजे यात पोस्ट ऑफिस, सिनेमा, जलतरण तलाव, शस्त्रक्रीया करण्यासाठी रुम आणि ज्वेलर्स वर्कशॉप देखील आहे. राजवाड्याच्या मागील बाजूस तलावासह लंडनमधील सर्वात मोठी खाजगी बाग आहे.  हिवाळ्याच्या मौसमात राणी किंवा राजा तिथे मोठी मेजवानी आयोजित करतात.  त्याला देशविदेशातील राजे आणि मातब्बर मंडळी उपस्थित असतात.  

========

हे देखील वाचा : पाकिस्तानच्या एकमेव डीजे आर्टीस्टला बलात्काराची धमकी…

========

आता या सगळ्या भव्यतेला सांभाळण्यासाठी आणि त्याची देखभाल कऱण्यासाठी तेवढाच खर्च येत आहे.  काळाच्या ओघात हा खर्च करणे राजघराण्याला परवडण्यासारखे नाही, असे मत राजा चार्ल्स यांचे आहे.  त्यामुळे या भव्य राजवाड्याचे रुपांतर म्युझियम मध्ये केल्यास ही वास्तू जनतेला बघता येईल, आणि त्यांची काळजीही घेता येईल, असे मत त्यांचे झाले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.