दुसरं महायुद्ध झालं आणि अमेरिका, चीन आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया सुपरपॉवर बनायचं होतं. मग अमेरिकेचं एकच टेन्शन सुरु झालं, अमेरिकेला रशिया-चीन त्यांच्यापेक्षा पुढे जाऊ द्यायचं नव्हतं आणि याचं काळात म्हणजे १९५३ मध्ये CIAने कॅनडातल्या काही संस्थांसोबत मिळून हा भयानक एकस्पेरिमेंट करायचं ठरवलं. या एकस्पेरिमेंटचं नाव होतं MK-ULTRA. यात माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवणं, हा त्यांचा हेतू होता. CIAने यासाठी गुप्त टीम बनवली, जी हा सगळा प्रकार टॉप सीक्रेट ठेवणार होती आणि CIA यासाठी कितीही किंमत मोजायला तयार होती. हा प्रयोग कॅनडातल्या मॉन्ट्रियलमधल्या एलन मेमोरियल इन्स्टिट्यूटमध्ये झाला. या एकस्पेरिमेंटमध्ये काय होतं, तर व्यक्तीला LSD, शॉक देऊन त्याचा ब्रेन वॉश करायचा आणि १९५३ मध्ये माणसांवर एकस्पेरिमेंट सुरू झाले. हा एकस्पेरिमेंट तब्बल २० वर्ष चालला. आता या MK-ULTRA मध्ये काय घडलं आणि त्याचे काय वाईट परिणाम झाले, हे जाणून घेऊ. (Secret Experiment)
तर MK-ULTRA या एकस्पेरिमेंटसाठी CIAने प्रसिद्ध स्कॉटिश-अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. डोनाल्ड इवेन कॅमरून यांना सिलेक्ट केलं. कॅमरूनने “psychic driving” नावाची टेक्नोलोजी डेवलप केली, ज्यामध्ये त्याचा विश्वास होता की, मेंदूच्या आठवणी पुसून त्यांना पुन्हा प्रोग्राम करता येऊ शकतं. त्याने मानवी मेंदूची कॉम्प्युटरशी तुलना करून हे सांगितलं होतं. जसं फाइल डिलीट करून पुन्हा रिकव्हर करता येते, तसंच मेंदूच्या आठवणींशी छेडछाड करून त्या पुन्हा बसवता येईल. आता हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी रिसर्च सुरू केला आणि १९५३ मध्ये काही माणसांवर प्रयोग सुरू झाले. वाईट गोष्ट म्हणजे, ज्यांच्यावर हे एकस्पेरिमेंट झाले, त्यांना काय चाललंय, याची काहीच कल्पना नव्हती. त्यांना काही सांगितलं गेलं नव्हतं.
आता कॅमरूनला खूप लोक हवे होते, म्हणून त्यांनी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटना फसवून एकस्पेरिमेंटसाठी तयार केलं. पेशंटना वाटायचं, डॉक्टर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, पण सत्य परिस्थिती काही तरी वेगळीच होती. आता या कामासाठी फक्त पेशंट पुरेसे नव्हते. त्यामुळे CIAने बाहेरच्या लोकांना शोधायला सुरुवात केली आणि फायनली त्यांना आयडिया आली. त्यांनी सेक्स वर्कर्सना एकस्पेरिमेंटमध्ये सामील करून घेतलं. आता LSD हा इतका भयानक ड्रग आहे की, यात माणूस आपला ताबा गमावतो, त्याला काय चाललंय, तो काय करतोय, काहीच कळत नाही. त्याला हेलुसिनेशन होतात, नसलेल्या गोष्टी ऐकू येतात.(Secret Experiment)
तर आता प्लान नुसार पहिली सुरु होणार होती. त्या लोकांना एका सब प्रोजेक्टमध्ये म्हणजे ऑपरेशन मिडनाइट क्लायमॅक्स मध्ये सेक्स वर्कर्सचा वापर करून काही न सांगता LSD दिलं जाणार होतं. काही सेक्स वर्कर्सणी हे काम केलं. काही वेळेस CIAने इतर गुप्त मार्ग वापरले, जसं की नॉर्मल ड्रिंक्समध्ये LSD मिसळलं आणि ते त्यांना प्यायला दिलं. काही मॅजिशियन्सचा वापर केला आणि काही स्मार्ट पद्धतीने त्यांना LSD दिलं.
आता एकस्पेरिमेंट तीन टप्प्यात झालं. पहिला टप्पा व्यक्तीला LSD देऊन त्याचा मेंदू कंट्रोलच्या बाहेर आणला जायचा. दुसरा टप्पा LSD चा प्रभाव झाल्यावर तीव्र इलेक्ट्रिक शॉक दिले जायचे, ज्यामुळे आठवणी पुसल्या जायच्या. व्यक्तीला कळायचंही नाही की त्याला करंट दिला जातोय आणि तिसरा टप्पा म्हणजे यात मेंदू रीप्रोग्राम केला जायचा. प्री-रेकॉर्डेड मेसेजेस ऐकवून वागणूक बदलली जायची. म्हणजेच त्याचं ब्रेनवॉशिंग केलं जायचं. (Secret Experiment)
आता याचा परिणाम काय झाला तर.. या सगळ्यामुळे व्यक्तीचा ताबा सुटला, ते सदम्यात गेले आणि त्यांना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) सारखा आजार झाला. त्यांना अंधाराची भीती वाटायला लागली, ते अस्वस्थ व्हायला लागले. एकदा २६ वर्षाची लिंडा मॅकडॉनल्ड डिप्रेशनमुळे कॅमरूनकडे गेली. त्याने तिच्या आजाराचा गैरफायदा घेतला. LSD आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन तिच्यावर एकस्पेरिमेंट केला. तिच्या मानसिक अवस्थेवर याचा खूप वाईट परिणाम झाला.
==============
हे देखील वाचा : Panar Leopard : ४०० मनुष्यबळी भारतातल्या सर्वात डेंजर बिबट्याचा दरारा!
==============
एकदा अमेरिकन CIAचे संशोधक फ्रँक ऑल्सन उपचारासाठी कॅमरूनकडे गेले. त्यांच्यावर गुपचूप LSD चा प्रयोग झाला. याचा इतका वाईट परिणाम झाला की २८ नोव्हेंबर १९५३ ला त्यांनी न्यूयॉर्कच्या एका हॉटेलच्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण यानंतर असा प्रश्न उभा राहिला, तो म्हणजे ही आत्महत्या होती की खून? CIAच्या अहवालात असं सांगितलं गेलं की, ऑल्सनला प्रयोगाची थोडीशी माहिती होती, पण LSD बद्दल त्याला २० मिनिटांनंतर सांगितलं गेलं. त्यांच्या आत्महत्येच्या प्रवृत्ती LSD मुळे वाढल्या असाव्यात, असं CIA ने मानलं. (Secret Experiment)
या एकस्पेरिमेंटचे इतके नुकसान झाले की, १९७३ मध्ये हा प्रयोग बंद झाला. पत्रकार जॉन मार्क्स यांनी सूचना अधिकार कायद्याअंतर्गत सुमारे २०००० कागदपत्रं मिळवली आणि MK-ULTRAचा पर्दाफाश केला. CIAने मान्य केलं की, त्यांनी २० वर्षं असे प्रयोग केले. काही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्यात आली.
1973 मध्ये CIA डायरेक्टर रिचर्ड हेल्म्स यांनी MK-ULTRAशी संबंधित बहुतेक कागदपत्रं नष्ट केली. पण काही कागदपत्रं वाचली, ज्यामुळे 1977 मध्ये सिनेट चौकशी झाली. CIAने दावा केला की 1973 मध्ये हा कार्यक्रम बंद झाला आणि त्यानंतर असा कोणताही प्रयोग झाला नाही. तसं बघायला गेलं, तर त्या काळात असे क्रूर ह्युमन एकस्पेरिमेंट भरपूर व्हायचे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics