Home » एक डान्सिंग आजार, जो नाचवतो आणि जीव घेतो…

एक डान्सिंग आजार, जो नाचवतो आणि जीव घेतो…

by Team Gajawaja
0 comment
Dancing Disease
Share

सुमारे ५०० वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये एक असा आजार पसरला होता, ज्यामुळे ४०० लोकांना जीव गमवावा लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ह्या आजारात माणसं अचानक नाचायला सुरू करतात. आणि ते तोपर्यंत नाचतात जोपर्यंत त्यांचा जीव जात नाही किंवा ते बेशुद्ध होत नाहीत. पण या विचित्र आणि आगळ्यावेगळ्या आजाराची कारण काय होती ? तो कसा पसरला ? (Dancing Disease)

लोकं अचानक नाचायला सुरवात करतात, काही तास, काही दिवस, काही आठवडे नाचत राहतात. पायतून रक्त येतं, पण लोकं थांबत नाहीत. तहान भूक विसरून ते नाचत राहतात बेशुद्ध होऊन पुन्हा उठल्यानंतर सुद्धा नाचत राहतात त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, जातो पण कुठलाच उपाय त्यांना थांबवू शकत नाही. ना कोणत गाणं वाजत असतं ना कोणत संगीत तरी ते बेभान होऊन नाचत राहतात. कुणालाच कळत नाही त्या नाचणाऱ्या लोकांना झालं तरी काय ? हा कुठला आनंद आहे जो त्यांना नाचण्यापासून थांबू देतं नाहीये का त्यांना भुताने झपाटलय जो त्यांना नाचवतोय ? ही त्यांनी केलेल्या पापांची शिक्षा आहे का ? असे अनेक प्रश्न त्यांना पाहणाऱ्या लोकांना पडले. याच आजाराचं नाव होतं डान्सिंग प्लेग आणि या आजाराने लोकांना मरेपर्यंत नाचवलं.. हा भयाण साथीचा रोग कुठे पसरला आणि तो पसरण्याची कारणं काय होती ? डान्सिंग प्लेगचा इतिहास काय ? (Dancing Disease)

साल १५१८, फ्रान्सच्या स्टारबर्ग शहरात Frau Troffea नावाची एक महिला जी घरातून बाहेर येऊन एका चौकात बेभान होऊन नाचू लागली. सुरवातीला लोकांना वाटतं तिला काहीतरी खुशखबर मिळाली आहे आणि ती त्या आनंदात नाचतेत. पण काही तास गेले तरी ती तशीच नाचत होती. आता लोकांना वाटलं की ती नशेत आहे म्हणून नाचतेय. सकाळची संध्याकाळ होते तरी ती थांबत नाही. तिचा नवरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तरी थांबत नाही आणि अचानक ती बेशुद्ध होऊन खाली पडते, तिचा नवरा तिला उचलून घरी घेऊन जातो.. पण होतं काय टतर दुसऱ्या दिवशी ती न खाता न पिता पुन्हा नाचायला लागते. दोन तीन दिवस सलग असं होत राहतं. तिच्या नवऱ्याला तिची काळजी वाटते आणि तो तिला डॉक्टर कडे घेऊन जातो. आणि पाहतो तर काय की तिथे असेच नाचणारे आणखी ३०-३५ लोकं असतात. आणि अशा प्रकारे सुरुवात होते एका भयाण आजाराची ज्याचं नाव होतं डान्सिंग प्लेग !

महिन्याभरातच असं बेभान होऊन नाचणाऱ्यांची संख्या १०० च्यावर गेली होती. डान्सिंग प्लेग एक असा आजार होता ज्यामध्ये माणूस एकदा नाचायला सुरुवात करायचा आणि मग थांबायचाच नाही. तोपर्यंत जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही किंवा मरत नाही. नाचणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. जेव्हा नाचण्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला तेव्हा प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं. आधी डॉक्टरना वाटलं हा की एखादा नैसर्गिक आजार आहे, ब्लड प्रेशर वाढल्यामुळे हे होतयं. पण जेव्हा नाचणाऱ्यांची संख्या वाढून एकेकावर उपचार करणं अवघड जात होतं, तेव्हा डॉक्टरांनी सुचवलं की यांना असंच नाचू द्यावं जेव्हा ह्यांचं बॉडी टेंपरेचर कमी होईल, ते आपोआप थांबतील. तेव्हा नाचणाऱ्यांसाठी एक वेगळी सोय केली गेली. एका मोकळ्या जागेला डांस फ्लोर मध्ये बदलण्यात आलं काही Professional डान्सरस सुद्धा नेमले गेले जे ह्या नाचणाऱ्या लोकांसोबत नाचतील पण ह्याचा फायदा झाला नाही उलट आणखी लोकं यामुळे दगावली. (Dancing Disease)

त्याकाळात तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हत लोकं अंधविश्वासू होते, जेव्हा काहीच कळायला मार्ग नव्हता तेव्हा लोकांनी असच अंधश्रद्धा पसरवायला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सेंट वाईटस च्या श्रापामुळे होतयं. सेंट वाईट्स खूप वर्षांआधी फ्रान्स मध्ये एक संत होते. त्यांच्याबद्दल अशी मान्यता होती की ते नाचून गाऊन लोकांना आजारातून बरं करायचे. या अंधश्रद्धेमुळे लोकं नाचणाऱ्या लोकांना सेंट वाईट्स च्या प्रार्थनास्थळवर घेऊन गेले. त्यांच्या हातात क्रॉस देऊन त्यांना तिथे नाचवलं जाऊ लागलं आणि त्यांच्या अंगावर होली वॉटर सुद्धा शिंपडल जाऊ लागलं, ज्याने लोकं ठीक होऊ लागली.पण हा प्रकार कावळा बसायला आणि फांदी तुटायला असा होता, कारण काही लोकं काहीच न करता सुद्धा बरे होत होते.

====================

हे देखील वाचा : चक्क रोबोटनं केली आत्महत्या !

====================

काही वैज्ञानिकांनी या डांसिंग आजारच कारण गहू आणि मक्क्यावर आढळणाऱ्या Ergot Fungi Toxic या पिकांच्या जैविक आजाराला मानलं. हे फंगस डोक्यात जाऊन ड्रग्स सारख कामं करत, ज्यामुळे लोकांना हेलूसिनेशन होऊ लागतात आणि त्यांचा स्वतावरचा कंट्रोल सुटतो. पण ह्या थियरीला लेखक जॉन वॉलर यांनी पूर्ण पणे चुकीच मानलं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हा डांसिंग आजार जिथे सुरू झाला, तिथलचे लोकं खूप अंधश्रद्धाळू होते, दुष्काळ आणि अन्न कमतरतेमुळे त्यांच्या वर मानसिक परिणाम झालेला म्हणून ते लोकं अशा प्रकारे वागत होते. या लेखकाने या घटनेवर पुस्तक सुद्धा लिहिल आहे ”A Time To Dance A Time Time To Die’ आणि ‘The Dancing Plague: The Strange, True Story of an Extraordinary Illness’. (Dancing Disease)

अशा या भयानक डान्सिंग आजाराने ४०० जणांचा बळी घेतला होता आणि २ महीने थैमान घातल्यानंतर तो शांत झाला. पण मुळात हा आजार आणि त्याच कारण आजपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही, ते आजपर्यंत गुढच आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.