घरात पाळीव प्राणी पाळण्याची हौस प्रत्येकालाच असते. कुत्रा आणि मांजर याबरोबरच पोपटसुद्धा पाळले जातात. जे अधिक हौशी आहेत, ते लव्ह बर्ड किंवा अजून एखादा महागातला पक्षीही पाळतात. त्यांना जीव लावतात, अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतात. त्यांचे लाड करतात. पण चीन हा असा देश आहे, की तिथे कधी काय होईल, आणि कोण काय करेल याचा नेम नाही. चिनमध्ये सध्या कोंबड्या घरात पाळण्याचा ट्रेंड (Chin trend) वाढला आहे. बरं, या कोंबड्या सर्वसामान्य नाहीत, या जगातल्या सर्वात छोट्या कोंबड्या आहेत. जगातील सर्वात लहान कोंबडी म्हणून त्यांची ओळख आहे. रुटिन कोंबडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या कोंबड्या स्टक या नावानेही ओळखल्या जातात. आपल्याकडे तितर नावाचे पक्षी आहेत. त्यासारख्याच या कोंबड्या आहेत. पण या कोंबड्या चिनमध्ये पाळीव प्राण्यांप्रमाणे का पाळल्या जात आहेत, याचे कारणही मजेशीर आहे. या कोंबड्यांची अंडी ह्दयविकार आणि मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर असतात. या छोट्या अंड्यांसाठी या छोट्या कोंबड्या आता चिनमध्ये पाळण्याचा ट्रेंड (Chin trend) वाढला आहे.
चिनमध्ये सध्या घरा-घरात माश्यांच्या टॅंकमध्ये किंवा बाहुल्यांच्या घरातही छोट्या कोंबड्या आळून येत आहेत. या छोट्या कोंबड्या म्हणजे लहान पक्षी आणि तीतर, या दोन पक्षांसारखा पक्षी आहे. या छोट्या कोंबडीपासून मिळणा-या अंड्यांनाही आता मोठी मागणी आली आहे. जगातील सर्वात लहान कोंबडी म्हणून या कोंबडीला आता चिनच्या प्रत्येक घरात पाळले जात आहे. ही कोंबडी सामान्य कोंबड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.(Chin trend)
रुटीन कोंबडी ही सर्वसामान्य कोंबडीपेक्षा आकाराने खूपच लहान असते. त्यांचा आकार अगदी तळहाताएवढा आहे आणि त्यांचे वजन 50 ग्रॅम पर्यंत असते. या कोंबड्या पाळण्यासाठी चिनमध्ये घरामध्ये बाहुलीसारखी लहान घरे, माश्यांचे टॅंक यांना मागणी आहे. या घरातमध्ये लावण्यासाठी बल्ब, आणि सजावटीच्या वस्तूंचीही मोठ्याप्रमाणात खरेदी केली जात आहे. या कोंबड्यांची खूप काळजी घ्यावी लागते. 35 अंश ते 38 अंश सेल्सिअस तापमान या पक्षांच्या पिल्लांसाठी अनुकूल असते. पूर्ण वाढ झालेल्या कोंबडीसाठी 20-30 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते. या कोंबड्यांची अंडी त्यांच्यासारखीच खूपच लहान असतात. मात्र इतर कोंबड्यांच्या तुलनेत या रुटिन नावाच्या कोंबड्या जास्त अंडी देतात. वर्षातल्या 365 दिवसांपैकी 300 दिवस या रुटिन नावाच्या कोंबड्या अंडी घालतात. पण ही अंडी खूप गुणकारी असतात. या कोंबड्यांचे फायदे खूप असले तरी त्यांच्यामुळे घाणही खूप होते. ती वारंवार साफ करावी लागते, अन्यथा त्याचा या कोंबड्यांना त्रास होतो. या रुटिन कोंबड्यांचा रंग पांढरा, तपकिरी असतो. त्यांना खाण्यासाठी छोटी फळे किवा फळांच्या सालीही दिल्या जातात. सतत काहीतरी खात रहाणा-या या रुटीन कोंबड्या त्यांच्या आकारामुळेच बहुधा घरातल्या लहान मुलांच्या अधिक लाडाच्या झाल्या आहेत. (Chin trend)
=============
हे देखील वाचा : ‘या’ देशातील लोक आता किडे-मुंग्या सुद्धा आवडीने खाणार, सरकारकडून तयार केला जातोय नियम
=============
काहींच्या मते रुटिन कोंबडीची पैदास ब्लू-ब्रेस्टेड बटेर आणि आशियाई राखाडी तीतर यांच्यापासून केली आहे. चीनमध्ये असे प्रयोग कायम केले जातात. त्यातून या रुटीन कोंबडीची जात तयार झाली आहे. (Chin trend) या कोंबडीपासून अंडी मुबलक मिळत असल्याने त्यांची मागणीही वाढली आहे. अनेक चिनी नागरिकांनी आपल्या घरातला एक कोपराच या कोंबड्यांना दिला आहे. सकाळची माश्यांच्या टॅंकमध्येही त्या सहजपणे सामावतात. माश्यांच्या टॅंकची किंवा बाहुल्यांच्या घराची सजावट या रुटीन कोंबड्यांसाठी खास केली जाते. फक्त 50 ग्रॅम वजनाच्या, आणि तळहातावर रहाणा-या या कोंबड्या घरात सहजपणे रहातात. मुख्य म्हणजे त्यांच्या अंड्यांचीही मागणी मोठी असल्यामुळे काही घरात या कोंबड्या पाळून त्यांची अंडी विक्रीसाठीही ठेवली जात आहेत. एकूण चिनमध्ये कधी काय होईल आणि कशाला मागणी वाढेल याचा नेम नाही हेच खरं
सई बने…