Home » चक्क गायीची किंमत कोटींमध्ये…

चक्क गायीची किंमत कोटींमध्ये…

by Team Gajawaja
0 comment
Nelore Cattle
Share

गायीची किंमत किती असू शकते.  काही हजार, लाख. असा अंदाज तुमचा असेल तर हा अंदाज चुकीचा आहे.  कारण ब्राझीलमध्ये एका गायीची किंमत चक्क कोटींमध्ये मोजली गेली आहे. या गायीला राणी गाय म्हणतात.  ब्राझिलियन दुग्ध उद्योगात या गायीचा वाटा महत्वाचा आहे. या गायीला नेलोर गाय म्हणतात. व्हिएटिना-१९  या नावानंही या गायीची ओळख आहे. (Nelore Cattle)

या गायीची बोली चक्क ३६ कोटी रुपये एवढी लावली गेली आहे.  या व्हिएटिना-१९ गायीचा प्रजननासाठीही उपयोग केला जातो. पशुधन प्रजननाच्या इतिहासात, ब्राझीलच्या या पांढऱ्या नेलोर गायीला विक्रमी किंमत मिळाली आहे. यासाठी  ब्राझीलच्या राज्यातील नोव्हा इग्वाकू या मध्य ब्राझिलियन शहरात लिलाव झाला. यात ही व्हिएटिना-१९  गाय ३६ कोटींना विकली गेली. या घटनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे.  याच गायीची प्रजाती भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  (Nelore Cattle)

ब्राझिलच्या व्हिएटिना-१९ या गायीला राणी गाय म्हटले जाते. ही गाय बायोटेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनच्या आघाडीचे प्रतिनिधित्व करते. व्हिएटिना-१९ चे मूल्य तिच्या निर्दोष आनुवंशिकतेमध्ये आणि वंशावळीत आहे.  आश्चर्य असे की, व्हिएटिना-१९ मध्ये भारतीय वंश आहे. या नेलोर जातीच्या गायीचे वंशज आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील ओंगोल येथील गायींमध्ये आहे. 

ओंगोल गायी या प्रखर उष्णता आणि दुष्काळासारखी परिस्थिती सहन करु शकतात. हिच नेलोर गाय  १८६८ मध्ये ब्राझीलच्या किनाऱ्यावर नेण्यात आली. दोन बैल आणि ओंगोल जातीच्या दोन गायींनी नेल्लोर ते ब्राझील असा १३००० किमीचा प्रवास केला. तिथे या गायीचे व्हिएटिना-१९ असे नामांतर झाले. भारतातील कॅटल हसबंड्री या पुस्तकात या घटनेची नोंद आहे. १९६० पर्यंत या व्हिएटिना-१९ गायींची संख्या १०० झाली. आज ही व्हिएटिना-१९  गाय ब्राझीलची ओळख झाली आहे.(Nelore Cattle)  

आज, ब्राझीलमध्ये अनेक फार्म हाऊसवर या गायीचा राणी गाय म्हणून गौरव करण्यात येतो.  कारण या गायीचे दुध हे सर्वाधिक आहेच, शिवाय त्याची गुणवत्ताही सर्वोच्च मानली जाते. सद्यपरिस्थितीत व्हिएटिना-१९  ही ब्राझीलच्या पशु उद्योगाची आधारस्तंभ आहे. ब्राझीलमध्ये असलेल्या गोधनापैकी या गायीची संख्या ८० टक्के आहे.  याच व्हिएटिना-१९  गायीचा येथे प्रजननासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेच ब्राझीलच्या या गायीला प्रजननासाठी जगभरातून मागणी वाढली आहे. परिणामी तिची किंमत कोट्यवधीत झाली आहे.  ज्या भारतातून या गायीचे मुळ गेले होते, त्या भारतातूनही या व्हिएटिना-१९  गायीला मागणी आहे.(Nelore Cattle)  

व्हिएटिना-१९  गायीला मागणी वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे, कुठल्याही प्रकारचे हवामान असले, तरी ही गाय त्यात राहू शकते. ब्राझीलमध्ये अतिशय उष्ण हवामान ज्या प्रांतात आहे, तेथेही व्हिएटिना-१९  गायींच्या गोठ्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच थंड भागातही ही व्हिएटिना-१९ गाय चांगल्या पद्धतीने राहू शकते.  या गायीच्या जोरावरच ब्राझीलमधील फार्मची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या गायीला खायला हिरवा चारा हवा असेही बंधन नाही. व्हिएटिना-१९  गाय सुखा चाराही खाते. त्यामुळेच या गायींनी भरलेले फार्म हाऊस ब्राझीलच्या प्रत्येक प्रांतात आढळतात. या गायींची किंमत बघता, त्या फार्म हाऊसवर त्यांची मोठी बडदास्तही ठेवली जाते.  त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा रक्षकांचीही नेमणूक केलेली असते. (Nelore Cattle) 

==========

हे देखील वाचा : जान्हवी कपूर ते मलाइका अरोडा दररोज करतात तूपाचे सेवन, रहाल फिट आणि हेल्दी

==========

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. यासोबत ब्राझील हा जगातील सहाव्या क्रमांकाचा दूध उत्पादक देश आहे.  ब्राझीलचा जागतिक दूध उप्तादनात ५ टक्के वाटा आहे.  म्हणजेच ३२.९ दूध रोज एकट्या ब्राझीलमधून येते. यासोबत ब्राझीलच्या डेअरी उद्योगात गेल्या काही वर्षात लक्षणीय बदल झाले आहेत. दुग्धव्यवसाय हा तेथील प्रमुख व्यवसाय झाला आहे. (Nelore Cattle)

२०२३  मध्ये दुधाचे उत्पादन सुमारे ४.३ टक्क्यांनी वाढून २४.७ दशलक्ष मेट्रिक टन झाले. २०२४ मध्ये, यात दुप्पटीनं वाढ होण्याची आशा आहे.  या वर्षात ब्राझील दुग्ध उत्पादनात रशियावर मात करुन पहिल्या पाच दूध उत्पादक देशांमध्ये आपले स्थान पक्के करेल अशी आशा आहे.  हे सर्व व्हिएटिना-१९  गायीमुळे होत आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.